Nojoto: Largest Storytelling Platform
rajaramnarayanka7019
  • 68Stories
  • 54Followers
  • 570Love
    556Views

राजाराम कंटे

  • Popular
  • Latest
  • Video
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

साद तुझी रे पडता कानी
       शहारून जाते मी मनोमनी
बंधन सारे तोडून येते
                  भेटाया तुजला मी मधूबनी.............

                       तुझ्या बासरीचे सूर जणू हे
                         खुणावती मजला क्षणोक्षणी
                             क्षणात मजला मी विसरुन जाते
                             धाव घेते तुझ्या अंगणी............

   तुझ्या प्रीतीचे वारे वाहता
हर्षुन जाते मी मनोमनी
वादळ मग तयांचे होते
               काहूर उठते माझ्या मनी.............…

                      तुज भेटता तृप्त होई 
                          युगायुगांची तृष्णा जीवनी
                          आता तुजला सांगून जाते
                   तुझीच रे सख्या मी 
                               तुझीच मी जन्मोनजन्मी..........
                                          @ राजाराम कंटे........

©राजाराम कंटे
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

तुझ्या शब्दांची गुंफण 
भूल पाडते मनाला
 अशीच बहरत जावी
 प्रीत क्षणाक्षणाला

तुझ्या कवितेच्या ओळी
 सदा मी गात राहाव्या 
 जणू चांदण्याना ही 
माझ्या अंगणात पहाव्या

तुझ्या कवितेत हरवून 
जावे माझे मन 
तुझ्या शब्दफुलांनी भरावे
 माझ्या कवितेचे अंगण

तुला शब्दाने बांधावे
 हृदयात असावी प्रीत 
तुझे स्थान तर हृदयात अन्
तू माझ्या ओठावरचे गीत

शब्दांनी शब्द जोडता 
वेड लागते जीवाला 
जणू एकरूप होऊन जाते
 जशी पार्वती शिवाला

©राजाराम कंटे #boat
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

 शब्दांची फुले वेचताना

कधी कवितेची माळ गुंफली

सारं काही अगदी नकळतच.....

एकांतात आठविताना

कधी काळजात शिरली

ते ही कसं नकळतच.....

मनाच्या आरशात डोकावताना

कधी भावनेत गुंफून गेली

अगदी कसं नकळतच.....

डोळ्यांच्या तिरांनी न्याहाळताना

कधी डोळ्यात भरून गेली

ते पण सारं नकळतच.....

अन् मग -

एकाकी फुलत गेलीस

माझ्या कल्पनेत विस्तारून

घेतलंस रूप तू पूर्णत्वाचं

सारं काही अगदी कळत नकळतच

एका कल्पनेतलं आणि त्या ही पलीकडचं.........

                        @  राजाराम कंटे.....

©राजाराम कंटे
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

 शब्दांची फुले वेचताना

कधी कवितेची माळ गुंफली

सारं काही अगदी नकळतच.....

एकांतात आठविताना

कधी काळजात शिरली

ते ही कसं नकळतच.....

मनाच्या आरशात डोकावताना

कधी भावनेत गुंफून गेली

अगदी कसं नकळतच.....

डोळ्यांच्या तिरांनी न्याहाळताना

कधी डोळ्यात भरून गेली

ते पण सारं नकळतच.....

अन् मग -

एकाकी फुलत गेलीस

माझ्या कल्पनेत विस्तारून

घेतलंस रूप तू पूर्णत्वाचं

सारं काही अगदी कळत नकळतच

एका कल्पनेतलं आणि त्या ही पलीकडचं.........

                        @  राजाराम कंटे.....

©राजाराम कंटे
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

हात तुझा हाती असावा 
विश्वासाने धरलेला
तू असाच सोबत राहा
 माझाच बनवून उरलेला

कधी न सुटावा
 हात तुझा हातातला
कधी न तुटावा 
संवाद आपल्या नात्यातला

तुझ्याच सोबतीने चालावी
 जीवनाची वाट
तुझ्याच डोळ्यात पहावी 
आयुष्याची पहाट

कधीतरी रात्री
 स्वप्नात असं तू यावं
 चांदण्याने भरलेलं आभाळ 
तुझ्या कुशीतून पहावं
                              राजाराम कंटे.......✍️

©राजाराम कंटे
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

तुझ्या शब्दांची गुंफण 
भूल पाडते मनाला
 अशीच बहरत जावी
 प्रीत क्षणाक्षणाला

तुझ्या कवितेच्या ओळी
 सदा मी गात राहाव्या 
 जणू चांदण्याना ही 
माझ्या अंगणात पहाव्या

तुझ्या कवितेत हरवून 
जावे माझे मन 
तुझ्या शब्दफुलांनी भरावे
 माझ्या कवितेचे अंगण

तुला शब्दाने बांधावे
 हृदयात असावी प्रीत 
तुझे स्थान तर हृदयात अन्
तू माझ्या ओठावरचे गीत

शब्दांनी शब्द जोडता 
वेड लागते जीवाला 
जणू एकरूप होऊन जाते
 जशी पार्वती शिवाला

©राजाराम कंटे #Youme
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

प्रश्न बणून राहू नकोस 
तू माझे उत्तर हो
 जीवनाच्या कुपीत माझ्या
 तू सुगंधित अत्तर हो

तुला शब्दात का बांधावे 
हृदयातील तु मित हो
 तुझे स्थान माझ्या हृदयात
 माझ्या ओठावरचे तू गीत हो

बंध जुळले तुझ्या ठायी
 तू मनातील आस हो 
तुझेच शब्द माझ्या ओठी
 तू जगण्यातील उल्हास हो

तू माझी प्रेरणा अन् 
तू माझे चैतन्य हो 
तुझ्या शब्दा वाचून माझे
 जग हे सारे शून्य शून्य हो

                            राजाराम कंटे.......✍️

©राजाराम कंटे
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

आठवतं का तुला 
खेळताना तुझा मी हात धरला 
खेळ संपला पण 
खेळाचा रंग मात्र बदलला 

आठवत असेलच ना तुला 
माझ्यासोबतचं चालणं
दुरूनच खुणावत होती ती 
मला वाटेवरची वळणं

बघ तुला  आठवतय ना 
 माळावरच्या झाडाखाली बसणं
 लटका राग आणून 
खोटं खोटं रुसणं

किती किती आठवू तुला
 तुझ्या आठवणी मनात भरलेल्या 
चांदरात सारी जागून 
पहाटेच्या स्वप्नातही उरलेल्या
                                           राजाराम कंटे.............

©राजाराम कंटे
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

मोसमी वारा
पांघरली दुलई
सजली धरा

टपोरा थेंब
बरसला स्वच्छंद
नवा सुगंध

चिंब भिजलो 
झिम्माड पावसात 
जाळी एकांत

©राजाराम कंटे
12cd2961500ec849e80f665f65f7dff1

राजाराम कंटे

चैत्र पालवी
वसंताची चाहूल
मनाला भुल

©राजाराम कंटे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile