Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7652408472
  • 29Stories
  • 230Followers
  • 210Love
    0Views

Sandeep A More

पाण्यासारखी नितळ असावी कविता, शब्दा शब्दांत असावी कविता....

  • Popular
  • Latest
  • Video
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

पाँझिटिव्ह होऊन मरण्यापेक्षा 
जगन्याला पाँझिटिव्ह करा.
जिवंत रहाने सोपे आहे हो,
परंतू आयुष्याला जगता आलं पाहिजे.

#घरात_रहा #सुरक्षित_रहा.

Sandeep A More

© #warrior
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

पाँझिटिव्ह होऊन मरण्यापेक्षा 
जगन्याला पाँझिटिव्ह करा.
जिवंत रहाने सोपे आहे हो,
परंतू आयुष्याला जगता आलं पाहिजे.

#घरात_रहा #सुरक्षित_रहा

Sandeep A More

© #India
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

जिंदगी राख जैसी होती है..
जलकर भी हवा की रूख से उडान भरती है..!

-संदीप मोरे

© #जिंदगी

#coldnights
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

#तिचा_तो_डे

तिचा दिवस मोळी जमा करण्यात आणि तिचा भार 
उचलन्यातच सरतोय,
प्रपोज डे,रोज डे,आणखी ते सारेच डे,
तिच्यासाठी अनभिज्ञच 
तिला फक्त आयुष्यच्या दोरीवरचा कसरतींचा
 तो प्रत्येक डे आठवतोय..!
विटभट्टी वर मातीचा लगदा 
जनावरासारखा तुडवून तिच्या नक्षीदार 
हातांनी तयार झालेला
तो आयात तिचं भविष्य ठरवतोय,
घामाच्या थेंबानेच तिची तहान भागवनारा तिच्या 
आयुष्यातला तो प्रत्येक डे तिला आठवतोय..!
आईच्या दवापाण्याचा,बापाच्या देशीसाठीचा अन
 भुकेच्या खळगी साठी तिचा दिवस रोज धडपडतोय,
तिच्या दारिद्र्याचा फायदा घेवून 
तिच्याकडे फिरकलेल्या नजरांनी
तिच्या अब्रूची किंमत शुन्य केलेला,
तो प्रत्येक डे तिला घाबरवतोय..!
तिला तो प्रत्येक डे आठवतोय..!
तिला तो प्रत्येक डे आठवतोय..!

-संदीप मोरे,नाशिक

©ग्रंथावली काव्यरेषा #तिचा_तो_डे
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

*ही जिंदगी*

ओसरन्याची कला तिला जमलीच नाही..
ती फक्त मनभरून ओसंडण्यात मशगूल आहे..
जिंदगी आजही एकटीच पळतेय,नक्षीदार पाऊलखुनांना मागे उमटवट....!
डोंगराएवढे तर तिचे पाय मजबूत आहे,परंतू
चालतांना पायात गुंता करायला लागली आहे..
सुर्याला सावली खाली उभं करून 
चटके झेलत....!
तिचं नसलेलं अस्तित्व सिध्द करन्याची परिक्रमा करत आहे,
ही जिंदगी कधी मेंदूने रडते तर कधी मनाने हसतेय..
या दुनियादारीच्या दरबारावर
माथ्याला थोडंस झुकवत झुकवत...!!

-संदीप मोरे,
आशा ट्रेडर्स,नाशिक

©ग्रंथावली काव्यरेषा jindagi

#walkingalone

9 Love

168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

sandeep more #WorldEnvironmentDay
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

#बापमाणूस

सोडून जाता दुरदेशी मला...
विसरू कसा मी माझ्या बा-ला...
खांद्यावर घेवून..हाताचा करूनी झुला...
चिंध्यांचे जोडूनी तुकडे संसार नित्य केला...
राब राब राबूनिया बीया सोबत घाम पेरला...
कोरड्या धरणीला रक्ताचा सडा वेढला...
ओल्याचिंब उशिला प्रश्न करत
 राहिला,
धरणीला माय अन आभाळाला बाप म्हनत राहिला..
उन्हात दगडा सारखा राबत राहिला,
जबाबदारीचं ओझं हुंदक्यांखाली दाबत राहिला,
तळहाताच्या घट्यांमध्ये भविष्य शोधतांना पाहिला,
माझा बाप घामाच्या पाण्याने धरनीची तहान जपतांना पाहिला,
टाचा उंच करूनही भेगा मात्र लपवत राहिला.,
स्वत:शी जगन्याची कुस्ती खेळत राहिला,
अन एके दिवशी
आकाशालाच गवसनी घालायचे ठरवून राख होवून निशब्द झाला,
लेकरायची काळजी घे धरणी मायेला ठनकाउन सांगून गेला..
   सोडून जाता दुरदेशी मला...
विसरू कसा मी माझ्या बा-ला...

-संदीप मोरे,नाशिक #बापमाणूस
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

#बापमाणूस
सोडून जाता दुरदेशी मला...
विसरू कसा मी माझ्या बा-ला...
खांद्यावर घेवून..हाताचा करूनी झुला...
चिंध्यांचे जोडूनी तुकडे संसार नित्य केला...
राब राब राबूनिया बीया सोबत घाम पेरला...
कोरड्या धरणीला रक्ताचा सडा वेढला...
ओल्याचिंब उशिला प्रश्न करत
 राहिला,
धरणीला माय अन आभाळाला बाप म्हनत राहिला..
उन्हात दगडा सारखा राबत राहिला,
जबाबदारीचं ओझं हुंदक्यांखाली दाबत राहिला,
तळहाताच्या घट्यांमध्ये भविष्य शोधतांना पाहिला,
माझा बाप घामाच्या पाण्याने धरनीची तहान जपतांना पाहिला,
टाचा उंच करूनही भेगा मात्र लपवत राहिला.,
स्वत:शी जगन्याची कुस्ती खेळत राहिला,
अन एके दिवशी
आकाशालाच गवसनी घालायचे ठरवून राख होवून निशब्द झाला,
लेकरायची काळजी घे धरणी मायेला ठनकाउन सांगून गेला..
   सोडून जाता दुरदेशी मला...
विसरू कसा मी माझ्या बा-ला...

-संदीप मोरे,नाशिक #बाप माणुस
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

#भाकर
मिळवण्या भाकर भुकेची इथे
 गाऱ्हानी किती सोसावी,
भाकरीची किंमत घामाच्या
 थेंबा थेंबाने मोजावी..!!

चव भाकरीची कष्टाच्या झळा 
झेलनाऱ्यालाच  कळावी,
खाणाऱ्या जिभेने किंमत 
तिची ओळखावी..!!

पोट जरी हितभर,काम करी दिसभर
 खळगी मागेल तितकी खावी,
कांदा  नी भाकर मी भुकेचा चाकर 
भुकेची उजळनी शिकवावी..!!

भाकरीची ना चिंता मी मोठा तालेवार
 का तिची किंमत करावी,
पोटाला पडता पिळ भाकरिनेच
 तिची किंमत ठरवावी..!!

भाकरी देणारी माझी काळी आई
कष्ट तिचे ठाई ठाई भुकेलाच 
तिची चव कळावी..!
सुत शेतकरी तिचा न्याहरीला 
खावून चटनी भाकरी,
उरलेल्या भुकेचा प्रश्न तुमचा
 आमचा जगी तोच सोडवी..!!

कवियित्री-शोभा डी निकम #भाकर
168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

#जगात आई लय  भारी

आई ही सर्वांची
 सुंदर, थोर अन मौल्यवान.....
आई म्हणजे घराची
 शोभा, मान अन  सन्मान.....
 पण त्यापलीकडे ही आईची
 थोरवी किती ही महान...... 
इतिहास साक्षी देतो त्यांच्या कार्याची
 रोजचंच करते आई तुला प्रणाम.....
 शिवाजी महाराजांना घडवणारी 
 स्वराजदाता, राजमाता थोर जिजाई .....
 दीनदुबळ्या , असह्यांना मदत करणारी
 उदारमनाची , अन्नदाता अहिल्याबाई .....
 आपल्या बाळासह प्रजेसाठी लढणारी
 झुंझार ,प्रेरणादाता राणी लक्ष्मीबाई .....
 तान्हुल्या बाळाच्या ओढीने जीवघेणा गड उतरणारी
  हिरकणी बनी साक्षदाता ममतेची जाईजुई .....
 शिक्षणाची ज्योत घराघरात पोहोचवणारी 
 स्फूर्तीज्योत , शिक्षणमार्गदाता
  शिक्षणमार्गदत्त  सावित्रीमाई.....
 बहुजनहितासाठी त्यांचे हृदय जपणारी
 त्यागमूर्ती, बहुजन मुक्तीदाता माता रमाई .....
 अखंडपणे रुग्ण सेवेत व्यस्त असणारी
 शांतता पुरस्कर्ती मदर तेरेसा सेवादाई .....
 या सर्वांचाच गुण असणारी 
 जगात लय भारी माझी जन्मदाता  आई .....
             कवयित्री - निकम  शोभा दौलत. { येवला } #MothersDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile