Find the Best तिचा_तो_डे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sandeep A More
#तिचा_तो_डे तिचा दिवस मोळी जमा करण्यात आणि तिचा भार उचलन्यातच सरतोय, प्रपोज डे,रोज डे,आणखी ते सारेच डे, तिच्यासाठी अनभिज्ञच तिला फक्त आयुष्यच्या दोरीवरचा कसरतींचा तो प्रत्येक डे आठवतोय..! विटभट्टी वर मातीचा लगदा जनावरासारखा तुडवून तिच्या नक्षीदार हातांनी तयार झालेला तो आयात तिचं भविष्य ठरवतोय, घामाच्या थेंबानेच तिची तहान भागवनारा तिच्या आयुष्यातला तो प्रत्येक डे तिला आठवतोय..! आईच्या दवापाण्याचा,बापाच्या देशीसाठीचा अन भुकेच्या खळगी साठी तिचा दिवस रोज धडपडतोय, तिच्या दारिद्र्याचा फायदा घेवून तिच्याकडे फिरकलेल्या नजरांनी तिच्या अब्रूची किंमत शुन्य केलेला, तो प्रत्येक डे तिला घाबरवतोय..! तिला तो प्रत्येक डे आठवतोय..! तिला तो प्रत्येक डे आठवतोय..! -संदीप मोरे,नाशिक ©ग्रंथावली काव्यरेषा #तिचा_तो_डे
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited