Nojoto: Largest Storytelling Platform
kk1665056123751
  • 9Stories
  • 15Followers
  • 47Love
    0Views

K.K.

  • Popular
  • Latest
  • Video
297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

सतत काही न काही मागणी करणाऱ्या लोकांना आपण टाळतो. कोणालाही त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही. पण तरीही जग अशा लोकांनी भरलेले आहे.याउलट "देणाऱ्या" लोकांशी मैत्री, जवळीक करायला सर्वांनाच आवडतं.आणि त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान, प्रेम, सौख्य आपणही इतरांमध्ये आनंदाने वाटतो...🙂
या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. मला जगाकडून काय मिळतंय ? (मागणारे) आणि मी जगाला काय देऊ शकतो ? (देणारे) असा विचार करणारे ! मागणे हे नैसर्गिकतःच आपल्यामध्ये असते.मागण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत आणि ते देण्यापेक्षा नक्कीच सोपे असते...😅
आणखी एक गोष्ट ! काही लोक देतात पण मोजून मापून ! दिलं की लगेंच किती आणि कधी परत मिळणार याची गणितं सुरु होतात. याला "देणे" म्हणत नाही हा व्यवहार झाला.या वॅल्यु मधूनच "वॅल्युएबल" (Valueable) हा शब्द तयार झाला आहे हे विसरू नका ! Valueable म्हणजे मौल्यवान बनायचं असेल तर "द्यायला" शिका !..😇
उगाचंच मी खुप काम करतो म्हणून माझा पगार वाढला पाहिजे असा आक्रोश करण्यात काहीच फायदा नसतो.तुम्हाला जे हवंय ते जग तुम्हाला देत नसून, तुम्ही किती वॅल्यु देता त्यावर अवलंबून असतं...💙😇
K.K...✍

297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

प्रवास या जीवनाचा...

आयुष्याचा प्रवास हा असा टप्पा आहे की, त्यात कधी शुभेच्छा तर कधी शिव्या आणि शाप देखील असतात. 
आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा एक प्रवास असतो. या प्रवासात कधी वेगळ्या वाटा, कधी चढ, तर कधी उतार या गोष्टींचा प्रवासही असतो.
आयुष्य हा एक रंगमंच आहे की, जिथे अडचणी येतात, दुःख येतात वारंवार अपयश येतं..पण त्या अडचणी आपण फेस करून जेव्हा पुढे जातो तेव्हा त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळतं.. 😇
आयुष्यात कधी संकटे तर कधी संकटांची फौज असते.. पण नजर तर आपल्या ध्येयावर किंवा लक्ष्यावर असेल तर हा आयुष्याचा प्रवास जगण्याची मजाच वेगळी असते. तुमच्यात तो आत्मविश्वास आहे, तुमच्यात प्रचंड साहसही आहे. शोधा तुम्ही स्वतःला शोधशील तर कळेल की या प्रवासात जगण्याची मज्जा वेगळी असते.

 केदार के.कुलकर्णी.
        ( क.कवितेचा,श.शब्दांचा ).. ✍️ प्रवास या जीवनाचा...✍

प्रवास या जीवनाचा...✍ #story

297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

हसता हसता कधी, रडायचं नसतं,
असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...
सतत आलं अपयश, म्हणून थांबायचं नसतं..

असतील काटे जरी या वाटेवरी
पुढे पुढे चालायचं असतं, 
कुणी कितीही, काहीही बोललं तरी "थांबायचं" नसतं..
असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं..

रोजचं जगणं, रोजचंच मरणं, आली आयुष्यात जरी संकटे, खंबीरपणे "लढायचं" असतं, असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...

यशाचा किरण एकदा, या आशेने कायम रहायचं, प्रयत्नरूपी ईश्वराचे बळ, देईल जिंकून सारे जीवन, असे हे जीवन सारे, इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...❤😊

@श.शब्दांचा,क.कवितेचा...K.K..😇 "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...✍😇

"आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...✍😇 #Quote

297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

मनामध्ये रूचले काही, मनामध्ये  रूतले काही, मनामध्ये सुचले काही मनात असती काही, असंख्य वेळा चालते काही, ते असती या कवितेतूनी  ।। 
केदार कुलकर्णी...✍
297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

आयुष्य एक प्रवास.

आयुष्यावर बोलू काही,आयुष्याला वेळ द्या.काही सकारात्मक बदल करूया आयुष्यात...
आतातरी खरच जगायची वेळ आलीय...

ती कशी दिसते बघ,तो असाच का आहे,तो किती उंच आहे,माझ्याच बाबतीत अस का ?? अशा तक्रारी करणं,बंद करा !!! 
तुम्ही असाल छोटे पण मनाने तर मोठे आहात ना !

टेन्शन घ्यायच नाही आणि द्यायच पण नाही.
काळजी करून प्रश्न सुटत नाहीत.जिथे अडचणी असतात तिथे उपायही असतात फक्त आपल्या चिंतेने तो अजूनच धुसर होत जातो !! त्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणि समोरच्याला धीर द्या, सगळ नीट होईल,आणि तुमच्या हातात नसेल काही तर जिथे सगळ त्याच्या हातात आहे तर थोडी फार श्रद्धा,विश्वास त्याच्यावर हि ठेवा.पण श्रद्धाच ठेवा,अंधश्रद्धा नको कारण मंदिराच्या दानपेटीत शंभर रुपये टाकण्यापेक्षा मंदिराबाहेरच्या भुकेल्याला जीवांना दिलेला दहा रुपयाचा बिस्कीट पुडा हि तुम्हाला मानसिक शांतता देवू शकतो आणि मनाला समाधानही मिळेल...!!

पैसा सगळे कमावतात,पण त्यापेक्षा तुम्ही नाती कमवा,प्रेम कमवा कारण त्याची गरज जास्त आहे सध्याच्या जीवनात....
पैशाने तुम्ही नसाल श्रीमंत पण समाधानी नक्की बना,बघा किती छान वाटतय !! फक्त तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका !!आयुष्य खूप छोट होत चाललय उगाचच आपल्या  इगो,टेन्शन,स्पर्धा,वर्तवणुक यामध्ये गुंतू नका !!
जिथे उद्याचा भरवसा नाही तिथे तुमच्या आयुष्यभराचा पैसा,प्रतिष्ठा काय कामाला येणार....???

जे आहे त्यात समाधानी राहायला  शिका...!! 😊        
छोटसं आयुष्य आपल,प्रत्येक दिवस आनंदी बनवा.! युनिक बना...!
तुमच आयुष्य तुम्हीच बनवायचय...!
तर उठा आणि हसत हसत जगा...!
जे आहे ते छानच आहे आणि तुम्हीच ते अजून सुंदर बनवणार आहात !!  #जीवन आनंदाने जगा..😊   
                          
केदार के. कुलकर्णी....✍😇 आयुष्य एक प्रवास....✍😇

आयुष्य एक प्रवास....✍😇 #Quote #जीवन

297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

अंधारातूनी एक प्रकाश येई...
ती म्हणजे दिवाळी...
सत्य,सुंदर मनाने,आपुलकीने,
करूया साजरी ही दिवाळी...
दिसती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद चोहीकडे,
पणती चा प्रकाश पडती चोहीकडे...
तेव्हा दिवाळीची पहाट ही उजडेल,
येऊया सारे एकत्र,करूया साजरी दिवाळी....✍🎇

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.मस्त राहा,आनंदी राहा,निरोगी राहा.दिवाळीत प्रत्येक क्षण आनंदाने जगा.चेहऱ्यावर सदैव हसू असूद्या आणि हा घरात आपण फराळ करतो ते जर राहिला तर टाकून न देता गोरगरिबांना द्या.आपले बहीण,भाऊ,माता समजून त्यांना मदत करा,आपल्यामुळे ते सुध्दा आनंदी राहतील.आपण आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...✍😊

 #आपलाच,केदार कुलकर्णी...😎
#थोडंसं_समाजासाठी..💚 दीपावली विशेष....✍️💚

दीपावली विशेष....✍️💚 #poem #आपलाच #थोडंसं_समाजासाठी

297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

भेट ती पहिली...

काय भेट होती ती...
त्यावेळी दोघेही अनोळखीच...
त्या दोघांचा भेटण्याचा असती पहिला दिवस...
वाढदिवस असती तिचा त्यादिवशी...
दुपारची वेळ होती ती...
सूर्याची ती नाजूक किरणे आणि नभ येती दाटूनी... 
गाडीवर असती दोघे जण आणि आमचे ते ऐकमेकांचे बोलणे... 
वेळ कसा जाई नसे ठाऊक...
सायंकाळची वेळ येती...
पक्षी परत घरी फिरण्याची ती वेळ...
नाजुक सूर्याची किरणे पडती अंगावरी....
माझ्या खांद्यावरी तिचा हात आणि तो वाहणारा मंद वारा...
 जो चोहीकडे असे आणि तिच्या केसांभोवती फिरत असे....✍✍ भेट ती पहिली...

भेट ती पहिली... #poem

297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

Mobile वर भावना लिहिता लिहिता कधी आयुष्य त्यात गुंतून गेलं कळलंच नाही...
297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

जीवनात कितीही अडचणी येऊद्या त्या जीवनाच्या अडचणीत आपल कोण आणि परक कोण हे
आपल्याला समजत..त्या अडचणींना तोंड देऊन पुढे जायचं असत..अशा वेळेस आपल्याला कोणी अनोळखी भेटतात तर कोणी आपलेच असतात..महत्वाचं म्हणजे आपल कोण हे आपल्याला समजत.."कधी वाईट वेळ आपल्याला काही चांगल्या लोकांना भेटण्यासाठी पण येत असते"...

जीवन आणि आयुष्य असा रंगमंच आहे..इथे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात..दुःख
येतात..पण हा प्रत्येक व्यक्ती दुःख आणि अडचणीचा सामना करतो..त्या अडचणी फेस करून
पुढे जातो..त्यातून त्याला आयुष्यात काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं..

"यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं. दुःखा मागून सुखं हे असतच.यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि आपण समाधानाची व्याख्या स्वतः ठरवतो"..

आज जरा आयुष्य आणि जीवनाविषयी बोलू वाटल म्हणून  हा छोटासा लेख लिहिला..

केदार के.कुलकर्णी..
श.शब्दांचा,क.कवितेचा..✍ आयुष्यावर बोलू काही...

आयुष्यावर बोलू काही... #Quote


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile