Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3245949934
  • 32Stories
  • 5Followers
  • 285Love
    234Views

रविंद्र भालेराव

  • Popular
  • Latest
  • Video
2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

White 
कविता - माणुसपण 

निःशब्द भावना, निःशब्द वेदना
कोणाचंच कोणाला मन जाणवेना

मी आणि माझे, मला नको दुसरा
कोणालाच कोणाला मिळेना आसरा

गेले दिवस दुःखाचे,आता सुखात रमले
खरे सुखाचे साथीदार मात्र मागेच राहिले

चार जन पंगतीला खाई सोन्याचा घास
शिळ्या भाकरीचा होता तेव्हा ध्यास

झाला कोंडमारा भावनांचा किती देवा
माणसाला माणुसपण आतातरी देवा

कवी=रवी भालेराव सर

©रविंद्र भालेराव
  #Moon
2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

दिवाळी ✨️

दिवाळी सोशितांची 
काबाड कष्टकऱ्यांची
दिवाळी श्रीमंतांची
ऐश आरामाची...
दिवाळी झोपडीतील गरीबाची,
पणतीच्या उजेडाची
दिवाळी माडीतील धनीकांची
रोषणाईच्या दिव्यांची...
दिवाळी भुकेल्या जीवांची
अश्रुंच्या धारांची
दिवाळी समाधानी माणसांची
करंजा चिवड्याची...
दिवाळी फाटक्या चिंधी ची
दुर्बल घटकांची
दिवाळी नवनवीन कपड्यांची
मध्यम वर्गाची...
दिवाळी जीवंत भावनांची
हळव्या मनाची
दिवाळी गोठलेल्या संवेदनांची
हरवलेल्या माणुसकीची...
दिवाळी सत्यवचनी माणसाची
दानशूर बळीराजाची
दिवाळी खोट्या आतिशबाजीची
बदलणाऱ्या मुखवट्यांची...

Happy Diwali
कवि -रवी भालेराव सर (जि प प्राथ शाळा महालवाडी

©रविंद्र भालेराव
  #BehtaLamha
2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

💐संगीत....संगीता💐

सौंदर्याचे रूप तुझे
तार छेडती संगीताचे
त्या सौंदर्याच्या आरशात
नाव झळकते प्राचीचे

ती निशब्द भावना बोलत नाही
संसार भार झेलत राही
         तारुण्याची ती सुंदरी
कुणापुढे झुकत नाही

रूपवान गोरीपान,
सडपातळ उंच कमान
केस लांबसडक छान
अधीर नयन नाजूक तन

निर्मळ सुंदर तिचे अंतःकरण
प्रेमळ स्वभाव जिंकते मन
ताल,लय संगीताचे गाणं
निसर्गाचे हिरवळ रान

©रविंद्र भालेराव संगीत संगीता

#thought

संगीत संगीता #thought #मराठीप्रेम

0 Love

2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

मायेचा हात हातात होता तेव्हा जबाबदारीच ओझं कधी वाटलं नाही.आज तो हात हातात राहिला नाही आणि ओझं मात्र झेपत नाही.

©रविंद्र भालेराव #Love

12 Love

2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

हॉटेल संगम

श्रावण ऑफर 

वाढदिवस,फ्रेंड्स पार्टी करीता विशेष ऑफर

अनलिमिटेड व्हेज थाळी....150.....100

©रविंद्र भालेराव #Morning

10 Love

2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

कविता -- तू

तू कितीही विसर मला,
          मी तुला विसरणार नाही
काळजात कोरलय तुला 
              खेळ भावनांचा खेळणार नाही

तू जीव माझा,तूच माझी प्रीत
              निशब्द तू झालीस कळेना मज रीत

तू अबोल नारी, तू आहेस खरी
तुझ्याप्रेमात मी करतोय वारी

तूच माझी प्रेरणा,तूच माझा विश्वास
अटकतो सखे तुजसाठी श्वास

तू नाही होणार माझी
      माहीत आहे मजला
    सुखी असावं तू
                हीच शुभेच्छा तुजला

तू मैत्रीण खरी
    तू ज्ञानाची परी
          तुझ्यासाठी पुरते
                   माझ्या मैत्रीची शिदोरी

                                                

                        कवी- रवी भालेराव, चंदनापुरी #standAlone
2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

आज दि.16.1.2021 रोजी कनोली गावचे सुपुत्र आकाश दिघे,गौरव दिघे व बापू पवार या मित्रांचे वाढदिवस 'संगम हॉटेल,रायतेवाडी फाटा,ता.संगमनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी कनोली गावचे व पंचक्रोशीतील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
      संगम परिवारातर्फे उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले.चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन सर्व मित्रांनी हॉटेल संगम परिवाचे आभार व्यक्त केले
           *गार्डन फ्री* उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉटेल संगम परिवाचे सर्वत्र कौतुक होत आहे

   *संगम हॉटेल ची विशेष     वैशिष्ट्य*  

1.फॅमिली रेस्टॉरंट सुसज्ज बैठक
2.प्रशस्त सिलिब्रेशन गार्डन
3.प्रायव्हेट बैठक रूम
4.चविष्ट जेवण 
5.मुबलक पाणी
6.स्वच्छ सुंदर हॉटेल
8.तत्पर सेवा
9.माफक जेवण दर
10.स्त्री, पुरुष बाथरूम, टॉयलेट सुविधा
 
🙏

7 Love

2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

💐बदल💐
 
💐अवेळी येणारा पाऊस हवामानातील बदल आणि दुरावलेली  मानवी मन वर्तनातील बदल दर्शवतात💐


GOOD MORNING #Sunrise

8 Love

2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

💐💐तुमची चूक नसताना ही तुम्हाला जेव्हा चुकीचं ठरवलं जात, तेव्हा होणारे दुःख तुम्हाला तुमचं मन बदलायला मजबूर करते.💐💐 #coldnights
2ea4b83dbc93f782ac32d01332809ae1

रविंद्र भालेराव

💐💐अशा व्यक्तींना विसरु नका,जे तुमच्या सुख दुःखाचे साक्षीदार आहे.बाकी दुनिया तर फक्त स्वार्थासाठी चिकटलेली असते.💐💐 #walkingalone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile