Nojoto: Largest Storytelling Platform
gourishitole1326
  • 23Stories
  • 3Followers
  • 159Love
    101Views

Gouri Shitole

  • Popular
  • Latest
  • Video
381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी जगु शकत नाही. तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही. असं म्हणणारा तो जेव्हा त्याच्या प्रेमाचा निर्घृण खून करून तिच्या शरीराचे तुकडे करतो,तेव्हा कुठे जातं त्याचं प्रेम?

©Gouri Shitole #brokenlove
381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

युवापिढी
              झाली दिशाहीन,
           पैशांच्या  मागे धावत
       प्रसिद्धीच्या भोवर्‍यात लीन,
       विसरुन      जन्मदात्यासही
       स्वप्नवत    जगात    तल्लीन,
            स्वार्थी बनला युवक
              हा व्यसनाधीन,
                 युवापिढी
            झाली बुद्धिहीन.

©Gouri Shitole #Pencil मत्स्यकाव्य

#Pencil मत्स्यकाव्य #मराठीकविता

10 Love

381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

आई

बोबड्या बोलीचा पहिला शब्द आई,
प्रेमळ मायेचा हात आई,
भुकेल्या तान्हुल्याची हाक आई,
पाठीवर कौतुकाची थाप आई.

©Gouri Shitole #MothersDay
381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

माझे बाबा तुमच्यासारखं
ना कुणिच या जगात,
मन तुमचं लोण्यासारखं
वितळून जाई क्षणात.

मला वाटत राही सारखं
नशिबवान मी किती झाले,
दैवतासारखं माझे बाबा
मलाच हे लाभले.

©Gouri Shitole आठोळी

#BookLife
381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

लेक माझी
         सर्वांच्या लाडाची,
       गोड  बाहुलीसारखी, 
 भुर्‍या केसांची,मोठ्या डोळ्यांची,
 नजर  ना  लागो  कधी  तिला
 सतत   सावली  ही  आईची,
       बडबड  तिची  सदा
         खुप ती मायेची,
             लेक माझी
         आहे गं प्रेमाची..

©Gouri Shitole मत्स्यकाव्य

#Love

मत्स्यकाव्य Love #मराठीकविता

8 Love

381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

मुखवटा
          हा स्वार्थपणाचा,
        प्रत्येक  चेहर्‍यावर,
    विसर तुला माणुसकीचा,
    संधी  साधु  बनला  माणुस
    वापर  हा  करतो  नात्यांचा,
        गोड  बोलुन  सतत
        स्वार्थ साधण्याचा,
             मुखवटा
         चेहर्‍यामागचा.

©Gouri Shitole मत्स्यकाव्य

मत्स्यकाव्य #मराठीकविता

10 Love

381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

मेहंदी

आज तिच्या हातावर
 तुझ्या नावाची मेहंदी लागणार,
तिच्यासोबत तु आयुष्याची
नवी सुरुवात करणार,
माझं तुझ्यावरचं प्रेम
माझ्यापुरतंच राहणार,
माझं मन मात्र नेहमीच
तुझ्यासाठी झुरत राहणार.

©Gouri Shitole
381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

मेहंदी
आज तिच्या हातावर
 तुझ्या नावाची मेहंदी लागणार,
तिच्यासोबत तु आयुष्याची
नवी सुरुवात करणार,
माझं मन मात्र नेहमीच
तुझ्यासाठी झुरत राहणार.

©Gouri Shitole #shaadi
381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

तू  तेव्हा तशी

तू तेव्हा तशी
काळ्याभोर डोळ्यांची
गोर्‍या गालावरची खळी
मला भुरळ पाडायची

मनमोहिनी तु अशी
अप्सरा स्वप्न सुंदरी
अदा जीवघेण्या तुझ्या
नजरेचे तीर घायाळ करी

©Gouri Shitole #zindagikerang
381b3b99ab0c81bb69fb453777357e03

Gouri Shitole

निसर्ग संवर्धन

निसर्गाची किमया न्यारी,
जगण्यास देई नवी उभारी,
निसर्ग संवर्धनाचा आज
सकल्प करु आपण सारी.

©Gouri Shitole
loader
Home
Explore
Events
Notification
Profile