Nojoto: Largest Storytelling Platform
jitendriyaoka1434
  • 66Stories
  • 13Followers
  • 858Love
    4.2KViews

जितू

  • Popular
  • Latest
  • Video
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची 
विनायकाला शिक्षा झाली दोन जन्मठेपेची 
जहाजामधे कोंबुन झाली पाठवणी कैद्यांची 
अंदमानचे कारागृह हे गुहाच ती मृत्यूची

जेलर तिथला बारी नामक महाभयंकर होता 
मनात नव्हते स्थान दयेला स्वभाव खुनशी होता 
काळकोठडी अशी जिथे ना प्रकाश वारा पुरता 
खराब किडके अन्न असे कैद्यांना खाण्याकरता 

छिलके कुटणे वळणे दोऱ्या शिक्षा कैद्यांसाठी 
गुरांपरी घाण्यास जुंपती तेल काढण्यासाठी 
कैदी कोणी काम न करता फटके पडती त्याला 
बेड्यांमध्ये शरीर जखडुन उभे ठेवती त्याला

पाण्याच्या विहिरींमध्ये तुकडा टाकुनि पावाचा 
पिता कुणी ते  त्यास सांगती धर्म भ्रष्टला त्याचा
विनायकाने बंद पाडले प्रकार सगळे असले 
धर्म असा ना भ्रष्ट होत हे पटवुन त्यांना दिधले

विनायकाच्या ठायी उत्तम लेखन प्रतिभा होती
कोठडीत ही सुंदर कविता लिहिल्या भिंतीवरती 
कैद्यांमध्ये फार विनायक प्रिय सर्वांना झाला 
पाहुनिया हे जेलर बारी खजिल शेवटी झाला

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

दारात आजही सडा फुलांचा पडतो
सोहळा नव्याने आठवणींचा घडतो 
ती पहिल्यांदा या घरात आली जेव्हा 
लावले तिने हे झाड फुलांचे तेव्हा 

मोगरा पाहता खुशित यायची स्वारी
आवडे तिला या गंध फुलांचा भारी
मी आजही जेव्हा सडा फुलांचा बघतो 
चेहरा तिचा मज फुलात साऱ्या दिसतो 

केसात माळता तिने फुलांचा गजरा
यायचा आमच्या गंध घराला हसरा  
मज दिसायची ती वनदेवीच्या वाणी
द्यायची रोज झाडास सकाळी पाणी 

ती गेली त्याला वर्षे काही झाली 
या घरास अवघ्या कळा उतरती आली 
पण बहर फुलांचा तसाच अजुनी आहे 
का गंध फुलांचा तिला शोधतो आहे

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

सावरकर हे कुटुंब अवघे देशास्तव झिजले 
तिन्ही स्त्रियांचा त्याग ऐकुनी मन हे गहिवरले 

गणेश पत्नी असे यशोदा वहिनी जी मोठी
येसूवहिनी माय जाहली असे दिरांसाठी
पतीस होता जन्मठेप ना परत कधी दिसले

विनायकांची पत्नी यमुना कष्ट फार झाले
जणू तिने अग्नीस आपल्या पदरी बांधियले
विरहाच्या ज्वालांनी जीवन ज्योतीसम जळले

नारायणची पत्नी शांता धैर्यवान नारी 
जावांसंगे दु:ख भोगले जीवनात भारी
देशासाठी पतींप्रमाणे सहन किती केले

घरातून बाहेर काढले त्यांस इंग्रजांनी 
गोठ्यामध्ये दिवस काढले तिन्ही माउलींनी
अन्न नसे धड खाण्याला ना वस्त्र नवे कुठले

त्याग असे यांनी जो केला तोड नसे त्याला
हात जोडुनी वंदन करतो त्यांच्या चरणाला 
देशासाठी जळुनी जिवन कृतकृत्य झाले

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

सावरकर हे कुटुंब अवघे देशास्तव झिजले 
तिन्ही स्त्रियांचा त्याग ऐकुनी मन हे गहिवरले 

गणेश पत्नी असे यशोदा वहिनी जी मोठी
येसूवहिनी माय जाहली असे दिरांसाठी
पतीस होता जन्मठेप ना परत कधी दिसले

विनायकांची पत्नी यमुना कष्ट फार झाले
जणू तिने अग्नीस आपल्या पदरी बांधियले
विरहाच्या ज्वालांनी जीवन ज्योतीसम जळले

नारायणची पत्नी शांता धैर्यवान नारी 
जावांसंगे दु:ख भोगले जीवनात भारी
देशासाठी पतींप्रमाणे सहन किती केले

घरातून बाहेर काढले त्यांस इंग्रजांनी 
गोठ्यामध्ये दिवस काढले तिन्ही माउलींनी
अन्न नसे धड खाण्याला ना वस्त्र नवे कुठले

त्याग असे यांनी जो केला तोड नसे त्याला
हात जोडुनी वंदन करतो त्यांच्या चरणाला 
देशासाठी जळुनी जिवन कृतकृत्य झाले

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

इंग्रजांस कळले सावरकर लंडनला आले 
रेल्वे स्टेशनवरती त्यांना अटक झणी केले 
भारतात न्यायचे ठरविले खटला चालविण्या
जहाज ते मोरिया निघाले भारतात येण्या 

कसे सुटावे कैदेतुन या विचार हा केला 
विनायकाच्या मनी धाडसी बेत पहा आला 
शौचकुपाच्या खिडकीची त्या फोडुनिया काच
खरचटले जरि अंग मारली उडी सागरात

उडी मारली कैद्याने हे शिपायांस कळले
धाडस बघुनी अचाट ऐसे सर्व थक्क झाले 
छोट्या बोटीतून तयांचा पाठलाग केला 
जहाजातुनी गोळ्यांचा मग माराही झाला

पोहत पोहत तरी पोचले पहा किनाऱ्याला 
म्हणू लागले फ्रेंच पोलिसा अटक करा मजला 
दुर्दैवाने फितूर पोलिस इंग्रजांस झाले 
ब्रिटिशांनी मग विनायकाला कैद पुन्हा केले

प्रयत्न फसला जरी असे कैदेतुन सुटण्याचा 
विचार  नव्हता कोणी केला अशा धाडसाचा
विनायकाने उडी मारली जी ही सागरात
अजरामर ती उडी आजही असे त्रिखंडात

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

संपत आले तेल तरीही
वात अजुनी जळते आहे
राख तिची होण्याआधी ती
शेवटची फडफडते आहे

प्रकाश देणे काम हे तिचे
निष्ठेने ती करते आहे
दिसतो आहे अंत तरीही
अंधाराशी लढते आहे

राख तिची होणार शेवटी
पुरते तिजला माहित आहे
जळणे हे कर्तव्य जाणुनी 
जीवन अर्पण करते आहे

जोवर जळते प्रकाश देते
जळून जाते दुसऱ्यासाठी
सदैव देते साथ दिव्याची
उरते मागे राख शेवटी

जणू सांगते जगताना हे
प्रत्येकाला भान असावे
स्वार्थ जरा सोडून आपला
परोपकारी आपण व्हावे

©जितू
  #DARKNESSANDFIRE
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

ram lala ayodhya mandir पूर्ण जाहले स्वप्न पहा हे अनेक शतकांचे
जाहले मंदिर रामाचे जाहले मंदिर रामाचे ||धृ||

शरयू तीरावरी अयोध्या पावन ही नगरी 
रामचंद्र हे इथे जन्मले कौसल्या उदरी
विष्णूंचा अवतार कराया हनन रावणाचे ||१||

वंदनीय ही रामांची हो असे जन्मभूमी 
जिथे जाहले राम भरत ती थोर पुण्यभूमी
रामराज्य हे इथे नांदले अपूर्व त्यागाचे ||२||

या भूमीवर केली स्वारी मुघल बाबराने 
मंदिर होते रामाचे ते पाडियले त्याने
प्रयत्न झाले थांबविण्या हे पतन मंदिराचे ||३||

पुन्हा बांधण्या मंदिर येथे यत्न किती झाले 
कित्येंकांनी जीवन दिधले शहीद ही झाले
उभे राहिले भव्य पुन्हा ते मंदिर रामाचे ||४||

अयोध्येत होईल साजरा उत्सव जन्माचा 
उच्चरवाने घोष करू रामाच्या नामाचा 
उधाण यावे पुन्हा मनी रामाच्या भक्तीचे ||५||

©जितू
  #ramlalaayodhyamandir
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

एकदा त्या भास्कराला मानवाचा राग आला
राग येता तापला तो खूप लालेलाल झाला
काय सांगू धावतो रे सारखा मी तो म्हणाला 
सारखा जाळून घेतो माणसासाठी स्वतःला

मानवाचे वागणे हे फार आता दुष्ट झाले
स्वार्थ त्याचा साधण्याला पृथ्विला विद्रूप केले
तोडली झाडे किती ती फार ना पाऊस येतो 
आज पाण्याच्या अभावी सारखा दुष्काळ होतो

वाढते जी उष्णता ही त्यात माझा दोष नाही
दोष सारा मानवाचा भ्रष्ट केले सर्व काही
आजही ना वेळ गेली वागणे आता सुधारा
मानवा हो आज जागा मी तुला देतो इशारा

वापरा पाणी जपूनी सांगतो मी झाड लावा
वाढल्याने उष्णता ही ना कुणाला ताप व्हावा
काय ते होईल सांगा मी चिडूनी बंड केले 
राग माझा वाढला नी धावणे मी बंद केले

©जितू
  #Morning
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू



घेतले कर्णास सोबत निज रथावर आग्रहाने
थांबवूनी मग रथाला परत थोड्या अंतराने
माधवाने हात त्याचा आपल्या हातात धरला
ऐक माझे शांततेने कृष्ण हे कर्णास वदला

कोण आहे जन्मदात्री हा तुला जो प्रश्न पडतो
गुपित हे ठाऊक मजला मी खुलासा आज करतो
कुंतिचा तू पुत्र मोठा ज्येष्ठ भ्राता पांडवांचा 
सांगतो हे सत्य आहे ऐक हिय्या कर मनाचा

ऐकता हे कर्ण सारे अंतरंगी क्षुब्ध झाला
तो खरा कौंतेय आहे जाणुनी हे राग आला 
बोलला मग माधवा हे माय ऐसी वागते का
जन्मल्या बाळास तान्ह्या माय कुठली त्यागते का

लोकलज्जेच्या भितीने कुंतिने मज त्यागलेले
मी असे राधेय मजला प्रेम राधेने दिलेले
लाभली मज साथ आहे नेहमी दुर्योधनाची
जागण्या त्या मित्रतेला साथ मी देणार त्याची

जाणतो मी नेमके हे आज सारे सांगता का 
पांडवांशी युद्ध ठरता संभ्रमी मज टाकता  का
आजवर जे होत आले त्यात माझा दोष नाही 
सोडणे दुर्योधनाला मी कधीही शक्य नाहीं

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू



घेतले कर्णास सोबत निज रथावर आग्रहाने
थांबवूनी मग रथाला परत थोड्या अंतराने
माधवाने हात त्याचा आपल्या हातात धरला
ऐक माझे शांततेने कृष्ण हे कर्णास वदला

कोण आहे जन्मदात्री हा तुला जो प्रश्न पडतो
गुपित हे ठाऊक मजला मी खुलासा आज करतो
कुंतिचा तू पुत्र मोठा ज्येष्ठ भ्राता पांडवांचा 
सांगतो हे सत्य आहे ऐक हिय्या कर मनाचा

ऐकता हे कर्ण सारे अंतरंगी क्षुब्ध झाला
तो खरा कौंतेय आहे जाणुनी हे राग आला 
बोलला मग माधवा हे माय ऐसी वागते का
जन्मल्या बाळास तान्ह्या माय कुठली त्यागते का

लोकलज्जेच्या भितीने कुंतिने मज त्यागलेले
मी असे राधेय मजला प्रेम राधेने दिलेले
लाभली मज साथ आहे नेहमी दुर्योधनाची
जागण्या त्या मित्रतेला साथ मी देणार त्याची

जाणतो मी नेमके हे आज सारे सांगता का 
पांडवांशी युद्ध ठरता संभ्रमी मज टाकता का
आजवर जे होत आले त्यात माझा दोष नाही 
सोडणे दुर्योधनाला मी कधीही शक्य नाहीं

©जितू
  #seashore
loader
Home
Explore
Events
Notification
Profile