Nojoto: Largest Storytelling Platform
rukminisonewad5752
  • 25Stories
  • 14Followers
  • 191Love
    2.1KViews

Rukmini Sonewad

  • Popular
  • Latest
  • Video
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

पावसाळी मन



हे जगणे जणू पावसाळी झाले
ह्या पावसाळी पावसाने
क्षण भिजवले
मण भिजवले..
ह्रुदयातली स्पंदन भिजवले..
इंद्रधणू सारख जिवन रंगवले..
हिरव्यागर्द हिरवळीसम जगणे बहरले..
पानाफुलांत जणू भ्रमर गुंतले.
कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यासम 
सुख जणु पायाशी लोळण घ्यायला लागले..
कोकिळेच्या सुरा सम जिवन एक गाणे भासू लागले..
पावसाच्या दिवसांत तन ,मण न्हाऊन निघाले..
हे जगणे जणू पावसाळी झाले..

©Rukmini Sonewad #पाऊस
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

एक हात शिकण्याचा !
एक हात संस्कार 
आणि विचार जोपासण्याचा..


👐🙏गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🤲

©Rukmini Sonewad #guru
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

आपलीच माणसं अशी का बदलतात ??


आपल्याच माणसांनी चारचौघात मनगटाला धरून भांडाव पण
पाठीमागून खंजीरचा मार देऊ नये..
आपल्याच माणसातल प्रेम संपल तरी चालेल,
पण द्वेषाचा वणवा पेटू नये..
आपल्याच माणसातली आपुलकी संपली तरी चालेल
पण माणुसकी संपूच नये..
समज - गैरसमज प्रत्येक नात्यात होतात
पण एका गैरसमजामुळे टोकाचा निर्णय घेऊ नये..
आयुष्याच्या प्रवासात नवीन लोक नक्कीच भेटतात..
पण ज्यांच्यामुळे अर्धा प्रवास सुखकर झाला त्यांना विसरू नये. 
आपल्याच माणसांनी हाताला धरून चालायला शिकवलेल असत
पण मोठ झालं की त्यांनाच पायात पाय घालून पाडू नये..
आपल्याच माणसातला संवाद संपला तरी चालेल
पण नात संपू नये..
जवळचा माणूस दूर गेला तरी चालेल पण
जवळच्या माणसाने दुसऱ्या दुरच्यासाठी 
वाहत जाऊ नये..
आपलीच माणसं
जवळ येतात
अन् दूरही जातात..
आठवणींची पुंजी बनून ह्रदयात राहतात तर
डोळ्यातल्या आसवांचा पूर ही होतात..
बदल हा निसर्गाचा नियम आहे 
म्हणून ऋतू बदलतात. 
उन्हाचे चटके बसल्यानंतर 
पावसाच्या पाण्याने तृप्त करतात
तर थंडीत गारवा देतात 
काही बदल चांगले असतात .
पण
आपलीच माणसं अशी का बदलतात..?

©Rukmini Sonewad people 

#friends
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

कळतं कसं नाही !

शोधत आहे काहीतरी पण नक्की काय हरवल तेच  आठवत नाहीं..
आठवन येतील कोणाची तरी पण नक्की कोणाची  येतीय तेच आठवत नाही..
बैचेन होतंय मन पण बैचेने मागचं कारण उमजत नाही..
ध्येया कडे वाटचाल केलीय पण वाट मात्र संपत नाही..
गरिबीचा चिखल की श्रीमंतीचा पैसा खर समाधान 
कशात असेल ते समजत नाही.
हातात सर्व काही असताना देव खाऊ देत नाही अन् 
हातावर पोट असनाऱ्यांच पोट कधी भरेल कळत नाही..
अंडा आधी की कोंबडी याच कोड काही केल्या सुटत नाही.
माणूस चंद्रावर गेला तरी चिमणीचा खोपा त्याला जमला नाही..
देव पाहतो म्हणे सर्व काही मग  ,
अंधळ्याचा डोळा अन् लंगड्याचा पाय देव का बनत नाही..?
ऋतू चक्र बदललं की निसर्ग  त्याचं रूप बदलतो मग 
माणूस त्याची स्वभाव का बदलत नाही.?
जाती आणि धर्माच्या पलिकडे  माणुसकीचा धर्म असतो 
तो धर्म माणूस का स्वीकारत नाही..? 
आस्मानी संकटात देवीला आवाहन केले जाते , 
पुरुष आणि स्त्री चा भेद करताना स्त्री ही पुरुषापेक्षा कणभर श्रेष्ठ असते 
याचा विचार का केला जात नाही.?
दिव्याखाली अंधार असतो तर मग समई ला प्राधान्य का दिलं जात नाही ?
शिक्षण वाघिणीच दूध आहे तर मग घरच्या 
वाघिणीला शिक्षण रूपी दूध का दिलं जात नाहीं?
प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाने भोगायचे असते,
आपण नशीब बदलू पण प्रारब्ध नाही.
आधी सर्व पिढीला होत आता घडीला राही.
कळत कस नाही , जवळच होत सर्वकाही...

©Rukmini Sonewad #Women #Emotion
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

जिंदगी

जिंदगी छोटीसी  हैं,  
मगर जिंदगी के हर पल में
मैं खूश हूँ . !!

बिता हुवा कल और कल की यादें 
ओ बचपण की सुकुनशी यादों में ही
 मैं  खुश हूँ ..!!

ज्यादा खिलोने नहीं थे बचपण मे मेरे पास 
मगर आज  जिंदगी के हर एक खेल मे  ही 
मैं  खुश हूँ .. !!

कोई नाराज हो  जाता हैं मेरी बातोंसे..
मगर उस नाराजगिसे  ही  
मैं खुश हूँ ..

कोई परेशान हैं मेरे जिंदगिका सच जाणनेसे
मगर जिंदगिकी हर कडवी वास्तविकता में भी 
मैं खुश हूँ .!!

किसीको मिलने की चाहता हैं मेरी, 
लेकिन .. !!
कभी ना कभी जरुर मिलेंगे इस सोचमे ही 
में खुश हूँ ..

कोई किसी का नहीं होता , सब कहनेकी बात हैं अपना दर्द अपना होता हैं खुद्द सहकर 
में खुश हूँ ..

अकेली चल रही हुं पानेको मंजील,
कोई हस रहा हैं मुझपे,
कोई मेरे काबिलियत पर कर रहा हैं शक,
कोई देख रहा हैं नजारा तो किसिसे मील रहा हैं दुवा़ंँवो का सहारा..
मेरी जंग समाज से  नहीं खुद्दसे हैं और 
मैं मेरी जंग में भी खुश  हूँ..

सारी दुनिया जोर जोर से कहती हैं की तू  हार जायेगी ,
लेकीन मेरे माँ बाप ने धीरे से कहा़ँ हैं ,"बेटा तु कोशिश जारी रख एकदिन जरूर जित जायेगी..
माँ बाप का आशिर्वाद औंर उनके साया के साथ 
में खुश हूँ ..

©Rukmini Sonewad #vacation
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

स्त्री योनीत जन्म मिळाला म्हणून म्हणून फक्त तिनेच का पेलावं स्त्रीत्व ?
कळायला हवा पुरुषी होत चाललेल्या 
समाजाला स्त्री असण्याचा अर्थ ..
निभावायला हव प्रत्येकानेच आपापल्यापरीने स्त्रीत्व
स्त्री देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही..
आनंदाचा शोध घेत जगणं आणि जगवण,
त्यागाची मूर्ती बनुन कर्तव्य निभावण,
संकटात ढाल होऊन कुटुंबाचं रक्षण करन
तुफानी वादळातही कमरेला पदर खेचून
टिकून राहणं..
खूप कठीण असत उदरात नविन जीव वाढवण..
स्त्री असणं म्हणजे ,
नात्यांच परीघ जतन करन..
स्वतः राब राब राबून कुटुंब 
सुखात ठेवणं..
भेसळ होत चाललेल्या समाजात 
मायेचं पवित्र झरा आटू न देणं..
स्त्री असणं म्हणजे,
अंगणातली तुळस शाबूत ठेवण,
घराची रोषणाई टिकवण.
नवऱ्याची आई अन् सासूची लेक बनून राहण.
स्त्री म्हणजे त्याग, संवेदना, प्रेम , आणि काळजी.
आठवण , साठवण , , तळमळ, मरण आणि झुरण..
पुरुषही पेलू शकेल का अस स्त्रीपण..
जशी स्त्री निभावतिय सहज पुरुषपण..

©Rukmini Sonewad #Woman
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

♥️स्त्री  जन्मा तुझी कहाणी... 🧡

जन्मजात आंदण घेऊन येते सोसन्या स्त्री -कळा   
पायवाट तुडवून फुलवि  संसाराचा मळा..
मूठभर पैशात विकत घेते सर्वासाठी आनंद लळा 
तिच ही व्हावं कधी कौतुक म्हणून महिला दिन साजरा होऊ लागला..
शिवबाला बाळकडू देऊन जिजामाताने  इतिहासच पान अजरामर केल 
झाशीची राणी ने मातृत्वसव रानांगणावर युद्ध जिंकलं.. 
द्रौपती असो की सीता त्यांचं युग त्यांनी गाजवलं.. 
रुक्मिणी असो की सत्यभामा अन मीरा असो की राधा 
नातं तिच तिने चोख निभावलं... 
पृथ्वी वरून झेप घेऊन चंद्रा ला ही स्पर्श तिने केला 
आकाश घेऊन कवेत सार तिच्या हिम्मतीचा झेंडा तिने रोवला.. 
खांद्याला खांदा देऊन तीने वर्दीतली धडाडी मारली 
काळ्या असो की पांढऱ्या कोटातली जबाबदारी तिने स्वीकारली
सौभाग्यच भान ती जपते टिकवूनी कुंकू किंवा टिकली.. 
ना ती माहेरची असते ना सासरची तिच्या मुळा ची माती कुठली 
जिथं रोवाल तीला तिथं बाग तिची फुलते 
स्त्री देह आहे तिचा देविच  रूप ती असते 
पदोपदि तिच्या कार्याचा, त्यागाचा अन बाईपनाचा 
सन्मान व्हावा हिच आस मनी बाळगते..

©Rukmini Sonewad
  pic :my mom... 
माझ्या आयुष्यात मोलाची जबाबदारी बजावनाऱ्या माझ्या आईस, ताईस, मैत्रीनिस अन तमाम महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

pic :my mom... माझ्या आयुष्यात मोलाची जबाबदारी बजावनाऱ्या माझ्या आईस, ताईस, मैत्रीनिस अन तमाम महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

♥️स्त्री  जन्मा तुझी कहाणी... 🧡

जन्मजात आंदण घेऊन येते सोसन्या स्त्री -कळा   
पायवाट तुडवून फुलवि  संसाराचा मळा..
मूठभर पैशात विकत घेते सर्वासाठी आनंद लळा 
तिच ही व्हावं कधी कौतुक म्हणून महिला दिन साजरा होऊ लागला..
शिवबाला बाळकडू देऊन जिजामाताने  इतिहासच पान अजरामर केल 
झाशीची राणी ने मातृत्वसव रानांगणावर युद्ध जिंकलं.. 
द्रौपती असो की सीता त्यांचं युग त्यांनी गाजवलं.. 
रुक्मिणी असो की सत्यभामा अन मीरा असो की राधा 
नातं तिच तिने चोख निभावलं... 
पृथ्वी वरून झेप घेऊन चंद्रा ला ही स्पर्श तिने केला 
आकाश घेऊन कवेत सार तिच्या हिम्मतीचा झेंडा तिने रोवला.. 
खांद्याला खांदा देऊन तीने वर्दीतली धडाडी मारली 
काळ्या असो की पांढऱ्या कोटातली जबाबदारी तिने स्वीकारली
सौभाग्यच भान ती जपते टिकवूनी कुंकू किंवा टिकली.. 
ना ती माहेरची असते ना सासरची तिच्या मुळा ची माती कुठली 
जिथं रोवाल तीला तिथं बाग तिची फुलते 
स्त्री देह आहे तिचा देविच  रूप ती असते 
पदोपदि तिच्या कार्याचा, त्यागाचा अन बाईपनाचा 
सन्मान व्हावा हिच आस मनी बाळगते..

©Rukmini Sonewad
  pic :my mom... 
माझ्या आयुष्यात मोलाची जबाबदारी बजावनाऱ्या माझ्या आईस, ताईस, मैत्रीनिस अन तमाम महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

pic :my mom... माझ्या आयुष्यात मोलाची जबाबदारी बजावनाऱ्या माझ्या आईस, ताईस, मैत्रीनिस अन तमाम महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

Pain & Art
if  a grave  conversion with mighty past
is designing your future chart then 
become a sound in the silence vast
and  convert your pain into art..
what else you wann say?
I'm fine, Good was my day..
Well..
Fake smile's, nothing much
Didn't really laugh as much
O dear,
what if you didn't do your best
just go home & take some rest.. 
Remember,
Past is not decide now
wake up tomorrow taking a vow
you must remove the dirt of past..
paint, write or play 
but
Develop an art, there will forever Last..

©Rukmini Sonewad #Inspiration 
#motivation
7223c37884f0447aaf409b7f6a673521

Rukmini Sonewad

मी खिडकीतून पाऊस बघतीय, 
अन कोसळतोय मात्र तो. 
वीज माझ्यात चमकतीय, 
अन गडगटाड अनुभवतोय तो. 
पाऊस अचानक थांबतो 
भानावर येते मी, 
अन समोरच्या गॅलरीत 
चिंब भिजलेला दिसतोय तो, 
वाऱ्याचा स्पर्श त्याला स्पर्शून 
माझ्या कडे आला.. 
लाली माझ्या वर चढली 
अन बेभान तो झाला... 

✍️rukssonewad

loader
Home
Explore
Events
Notification
Profile