Nojoto: Largest Storytelling Platform
anitagujar2346
  • 4Stories
  • 33Followers
  • 16Love
    0Views

Anita Gujar

  • Popular
  • Latest
  • Video
7804e7dc73189e189414c608dea91ae3

Anita Gujar

🙏वेड्या मनाला कळावे🙏

देवाजीच्या देव्हाऱ्यात
दिव्यापरी मी जळावे
भक्तीतच दडे मुक्ती
वेड्या मनाला कळावे ||१||

मार्ग शोधता सुखाचा
वाट माझीच चुकली
मोह मायेत फसलो
संधी सोन्याची हुकली ||२||

ज्याने दिले सर्व काही
नाव त्याचे ओठी नाही
अश्रू दाटले लोचनी
ठेचाळलो ठायी ठायी ||३||

आतातरी पाय माझे
आज मंदिरी वळावे
त्याच्या कृपेनेच सारे
आता ग्रहण टळावे ||४||

लाभलेल्या या जन्माचे
देवा सार्थकच व्हावे
सेवाव्रत अर्पिताना
माझे प्राण कामी यावे ||५||

सौ.अनिता गुजर

©Anita Gujar वेड्या मनाला कळावे

#alonesoul

वेड्या मनाला कळावे #alonesoul

7804e7dc73189e189414c608dea91ae3

Anita Gujar

शुभ दिपावली

शुभ दिपावली

7804e7dc73189e189414c608dea91ae3

Anita Gujar

नवपरिणीता नवपरिणिता तू विश्ववमोहिनी रंभा रतीहून अती देखणी नक्षत्रांचे तेज लोचनी जणू लाखाची हिरकणी । माझ्यासाठी तू माहेर सोडलं हिरव्या चुड्यान हात तुझं भरल माझ्या नावाला नाव तुझ जोडलं बांधल गळ्यात सोन्याचं डोरल । वास मोगऱ्याच्या गजऱ्याचा भिनला सडा फुलांचा शेजेवर पडला रंग इश्काचा डोळ्यात चढला चंद्र पुनवेचा ढगाआड दडला । काया तुझी ग संगमरवरी जसा आरसा छान बिलोरी काय केलीस जादू सुंदरी नव्या नवतीची काया मोहरली । तुझ्या दिलाच्या सिंहासनी दे स्थान मजला साजणी ये ना प्रीतीच्या  अंगणी होऊनी शुक्राची चांदणी । मंत्रमुग्ध मी झालो पुरता पाहुनी हा मौलिक ठेवा तुजसवे संसार करावा हेच मागणे आता देवा । सौ. अनिता गुजर

7804e7dc73189e189414c608dea91ae3

Anita Gujar

 नवपरिणीता
नवपरिणिता तू विश्ववमोहिनी
रंभा रतीहून अती देखणी
नक्षत्रांचे तेज लोचनी
जणू लाखाची हिरकणी ।

माझ्यासाठी तू माहेर सोडलं
हिरव्या चुड्यान हात तुझं भरल

नवपरिणीता नवपरिणिता तू विश्ववमोहिनी रंभा रतीहून अती देखणी नक्षत्रांचे तेज लोचनी जणू लाखाची हिरकणी । माझ्यासाठी तू माहेर सोडलं हिरव्या चुड्यान हात तुझं भरल #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile