ओलांडूनी सार्या मर्यादा तोडूनी तू सार्या बंधनांनला स्वच्छंदी बागडणार्या फुलपाखराप्रमाणे आकार दे तुझ्या जीवनाला होऊन गेली ती जिजाऊ शिवबाची जननी स्त्रीच होती ती लक्ष्मीबाई झाशीची राणी तू ही घे उंच भरारी त्या विशाल गगनी कोणी बोले स्त्री ही आहे पुरुषाच्या हातातली कटपुतली कोणी बोले चूल आणि मूल यासाठीच तर ती जन्मली मोडून काढ हा समज आणि दाखवून दे तू या जगाला तुझी ही ओळख वेगळी पुकारूनी बंड फोड वाचा तू अन्यायाला धुडकावूनी सार्या मनातल्या भीतीला दाखवूनी दे तू तुझी नारीशक्ति या जगाला... 📝 धनश्री निंबाळकर काळे... सोलापूर