Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5234345121
  • 112Stories
  • 78Followers
  • 755Love
    39Views

बी.सोनवणे

  • Popular
  • Latest
  • Video
a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

जीवनात कैकदा परीक्षा दिल्या, 
पण यश अपयश हे अपेक्षितच 
असे कदापि विचार नाही केला...!

©बी.सोनवणे #Moon
a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

अबोल्यात अशी राहू नको 
सये धडधडते ह्या हृदयी 
स्पंदनांचे ठोके...!!

©बी.सोनवणे #ValentinesDay
a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

अनुबंध 

हेच तत्त्व
जीवनाचे, 
अनुबंध
फेडण्याचे...! 

कसे फेडू
डोई बोझे, 
अनुबंध
ऋण ओझे...! 

स्वार्थ साधे 
लोभी असे, 
हव्यासाने
त्यात फसे...! 

सौख्यं हर्ष
जोडे बंध, 
आपुलकी
स्नेहबंध...! 

जीवनाचा
घ्या आनंद, 
अस्तित्वाचा
स्फूर्ती बंध...!

मौल्यत्वाचे
मर्मबंध, 
निःस्वार्थाचे 
अनुबंध....!

©बी.सोनवणे #apart

5 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

आयुष्य

हे आयुष्य 
समर्पित, 
तुझ्या प्रती 
ते अर्पित।। 

घडविले 
मज ज्यांनी,  
उपकार
बहुमानी।। 

वाटतोयं
मनी हेवा, 
संस्कारात 
जपे ठेवा।। 

लेखी हेचं
विधात्याचे, 
मांडलेत
आयुष्याचे।। 

तूच कर्ता
करविता, 
ना बाळगू 
अचंबिता।। 

तुझ्या हाती 
गड्या विश्व, 
मेहनत
हे सर्वस्वं।।

©बी.सोनवणे #apart

6 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

आभाळा एवढे तर नाही
पण सागराशी होतो एकरुप, 
अन् ते प्रतिबिंब न्याहाळता
असे दिसते ओ विद्रुप।

©बी.सोनवणे #sagarkinare
a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

#आई 

हंबरडा फोडूनिया 
रडतोय  ढसाढसा, 
दिसेनास त्यास आई
जणू झाला पोरकासा।।१।। 

किती ते हाल जाहले 
माई सांगावे कुणाला, 
सोडूनिया अशी गेली
अन् पडलो उन्हाला।।२।। 

किती कष्ट सोसूनीया 
वाढविले गं मजला, 
उपाशीच तू राहिली
माझे पोट भरायला।।३।। 

तुटतयं काळजात
खूप काही सोसले, 
राब राब राबूनिया
हाल अपेष्टा भोगले।।४।। 

कुणी फेडणार नाही 
अगं आई तुझे ऋण, 
कैक हे जन्म जातील
नियतीच्या नियमान।।५।।

माते थोर तुझे उपकार
तुझियाचं ठायी अर्पण,
जन्म मजला दिलास 
तुझ्या सेवार्थ जीवन।।६।। 

आई विना जगण्यास
नसे काहीच ओ अर्थ, 
मोल खूप जननीचे
नाही जात जन्म व्यर्थ।।७।। 

बी. सोनवणे
         मुंबई

©बी.सोनवणे #motherlove
a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

फकीर होऊनी आलोय तुझ्या दारी, 
खोल हृदयाचा गाभारा आता तरी...!! 

जीव तुझ्यात असा हा माझा गुंतला
वाटते मजला शेवटी आहे सरणावरी...!! 

दाटलाय कंठ जीव नकोसा वाटतो 
घाव कुणी रे केलायं काळजावरी...!! 

कळलेना कसे नशीबाने सोडली साथ 
अन् घात करूनीया बितली जीवावरी...!! 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे #AloneInCity
a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

अगं सखये आलेली माझ्या भेटीस, 
नकळत तशीच दूर सोडून गेलीस...!

©बी.सोनवणे

10 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

कोण परके अन् कोण आपले 
नातीगोती नाही ते सर्वच संपले...!! 

दिलेल्या शब्दाला पूर्वी मानायचे
मात्र हल्लीच्या गर्दीत कुठे हरवले...!! 

आपुलकी ही कुणासाठी ठेवायची
विश्वासा लायक कुणी नाही उरले...!! 

कुणावरी किती विसंबूनी रहायचे
धूर्त अन् कपटी भूवरी अवतरले...!! 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे #AkelaMann
a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।

©बी.सोनवणे आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।
#Love

आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। Love

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile