Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshkharat5703
  • 353Stories
  • 1.6KFollowers
  • 6.5KLove
    1.8LacViews

कवी - के. गणेश

झिजते माझीे लेखणी.. पाहता डोळ्यात तुझ्या पाणी.!

https://www.facebook.com/k.Ganesh007

  • Popular
  • Latest
  • Video
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

केवढा आधार | आजच्या घडीला ||
उद्याच्या पिढीला | संविधान ||

जिंदगीचं आपुल्या | खणखणतं नाणं | 
सुखाचं गाणं | संविधान ||

हुकमी देशात | स्वाभिमानी बाणा |
उंचाविते माना | संविधान ||

महिलेचा खांदा | पुरुषासमान |
हक्काची कमान | संविधान ||

शाळेत शिकाया | पहिलेच पान |
आमुचा अभिमान | संविधान ||

दुष्काळी राज्यात | गरिबांची आशा |
भाकरीची भाषा | संविधान ||

सगळ्यांना देतंया | सारखा आदर |
बहुजनांची कदर | संविधान ||
_____________________________

©कवी - के. गणेश कविता

#Friend
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

भाषण
#RepublicDay2021
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल..

जसजसे हे दुःख जेव्हा पचत जाते
अडचणीवर मात करणे सुचत जाते

ऐतखाऊ जीवनाला त्याग मित्रा
भोगल्यावर वेदना पण रुचत जाते

भाकरी अन तेल चटणी गोड  मानू
हाव सुद्धा सरण अपुले रचत जाते

बंगल्याला रंग चढता लाल हिरवा
झोपडी ती का उगा रे? खचत जाते

झिंगलेल्या आज इथल्या माणसांना
बघ गणेशा सरळ इच्छा लुचत जाते
--------------------------------
© कवी गणेश खरात
     ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल..

आजची ही हार माझी अंत नाही
खेळतो मी जीवनाशी खंत नाही

तत्व सारे पाळतो मी वागताना
दाखवाया बेगडी मी संत नाही

झुंजला जो वेदनेच्या कारणांशी
गौतमाची ती कथा रे, दंत नाही

वेळ जाते, वेळ येते सावल्यांची
धावणारा काळ सुद्धा संथ नाही

उधळतो मी रोज आता शब्द माझे
वाटतो पण, मी तसा धनवंत नाही
""""""'''''"""""""""""""""""""
     © कवी के. गणेश
        ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल
#sorrow
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल


आज साऱ्या फुगवट्यांचा भास आहे
बातमीला संशयाचा वास आहे

रंगवूनी आकड्यांचे खेळ सारे
ढापलेल्या आशयाला फास आहे

रोजगारी कोंडली हो जायबंदी
कोरडा रे भाकरीचा घास आहे

माध्यमेही आजची हो वांझ झाली
गाय व्याली भोंगळी ती कास आहे

वास्तवाचे भान नाही वाहिनीला
मालकाच्या दावणीला दास आहे
------------------------
             © कवी के. गणेश
               ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल

#AloneInCity
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल

हसावे असे की, खुलासा असावा
मनाला मनाचा, दिलासा असावा

घडावे असे की, रमावे तुझ्यातच
जिवाला सुगावा जरासा असावा

गुलाबी हिवाळा, शहारे तनाला
उबेला उन्हाचा, कवडसा असावा

जुळावे असे की, मिळावे जिवाने
सुगंधी लळा हा, हवासा असावा

जगावे असे की, नको ते दिखावे
तुझ्याही गळ्याला, उसासा असावा
__________________________
                  कवी के. गणेश
                   ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल

#NatureLove
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

उंच मोठ्या आशयाची गझल होते
कोंडलेल्या भावनांची मजल होते

©कवी - के. गणेश #Bicycle
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रानात सावलीला भरपूर वाव आहे
साऱ्याच माणसांची शहरात धाव आहे

शहरात गोठली हो नातीच माणसांची
विरहात माणसांच्या पेचात गाव आहे

सैराट वागण्याने बदलून काळ गेला
प्रेमात भावनेला बाजार भाव आहे

सोडून माय-माती, माणूस पांगला हो
चंद्रास गाठले तो फसवाच आव आहे

खवळून सागराला तोडून झाड झुडपे
वेगात सोडलेला मोकाट घाव आहे

लावून शोध सारे ओढून रोग काही
बेजार माणसाला भलताच ताव आहे

खोप्यात पाखरंही नांदून गोड गाती
प्राण्यात माणसाचा उलटाच डाव आहे
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
          ©® कवी के. गणेश
                ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल


कुण्या पाखराची मला आस आहे
जणू रान माझे इथे ओस आहे

कुणाला कळेना व्यथा ही जिवाची
सकाळी-दुपारी उगा भास आहे

नभी चांदण्यांनी निखरते निशाही
कुणाची प्रतीक्षा मला खास आहे

दिवे लावणीला दरवळे बगीचा
अनोख्या फुलाचा अलग वास आहे

जगाया दिसेना सहारा नि छाया
अजूनी जिवाला किती त्रास आहे
-----------------------------------
                   ®  कवी के गणेश
                      ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश

loader
Home
Explore
Events
Notification
Profile