Find the Best कविराज_धनंजय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकविराज की उपाधि, धडकन धनंजय के वीडियो, धड़कन धनंजय के गाना, धडकन धनंजय के बेवफाई गाना, इक़्बाल धनंजय के गाना,
कविराज धनंजय
आता मिटवून टाकू वाढलेला आपल्यातला दुरावा सांगण्या जगास प्रीत आपली हवा कशास कोणता पुरावा.? नको तोडू तू पाकळ्या फुलांच्या त्या गोड फुललेल्या घे मुठीत त्याला हलकेच प्रेमाविन तुझ्या त्या सुकलेल्या... नको देऊ तू अंतर चंद्रास त्या अमावस्येत लपलेल्या येऊ देत पौर्णिमेस थांब तू मिठीत धरेच्या त्या झोपलेल्या... उल्हासित आहे मी अलगद तुझ्या मिठीत येण्या मिटवून सारे रुसवे फुगवे नवप्रेमाने तुला जीवनात घेण्या... येशील ना तू.? अजुनही हाच प्रश्न आहे उरी नको लावूस बघण्या वाट तूच आहेस माझी प्रेयसी खरी... ©कविराज धनंजय #आता_मिटवून_टाकू #कविराज_धनंजय #walkingalone
#आता_मिटवून_टाकू #कविराज_धनंजय #walkingalone
read moreकविराज धनंजय
त्या उंच डोंगराच्या पायथ्याशी वाहणार्या त्या सरितेच्या उशाशी किती किती शोधले तुला नसतानाही पंख उडालो आकाशी..! होऊन दीनवाणा फिरत राहिलो स्वप्नाच्या जगी तुला शोधत राहिलो पापण्या आड झालीस तू मात्र अजूनही तुलाच बघत राहिलो..! आस होती माझ्या मनी मिठीत तुझ्या बंद व्हावा हा श्वास खोटीच ठरली तुझी वचने अन् तोडलास तू माझा विश्वास...! झोपडीत माझ्या एकटाच आता मी आठवणी उराशी बांधुन आहे झोपतो तू ये अथवा न ये सखे तरीही तुझी मी इथे वाट आहे बघतो...! उद्या मरेन जेंव्हा मी विरहाने किमान अग्नी तरी देहाला तूच द्यावा हीच ईच्छा शेवटची समजून एकदा तरी मला तुझा स्पर्श तो व्हावा...! अजुन काय मागणे तुला मागावे मिटलेले डोळे माझे डोळ्यांनी तू बघावे नाहीच भेटले जीवंतपणी प्रेम मेल्यावर तरी तू मला आपले समजावे..! ©कविराज धनंजय #किती_शोधले_तुला #कविराज_धनंजय #adventure
#किती_शोधले_तुला #कविराज_धनंजय #adventure
read moreकविराज धनंजय
मागे वळून पाहिले असता ते जुने दिवस आजही आठवतात आठवणीने जुन्या क्षणांच्या मनासंगे डोळेही ओलावतात... आठवतात अंगणातले ते जुने सारेच खेळलेले खेळ अजुनही तरळते ओठांवर मित्रमैत्रिणींसोबत खाल्लेली भेळ... किती सुरेख नि बरे होते ते जुने दिवस जगण्यातले दिसत होते प्रत्येकाचे चित्र सहज वागण्यातले... नव्हते काहीच कुणाकडे तरीही खूप काही होते सर्वांकडे हिरवळीसारखी माणुसकीही तेंव्हा मिळत होती जिकडे तिकडे... अजुनही वाटते प्रत्येकालाच यावे परत फिरून एकदा ते दिवस जगावे बालपण पुन्हा पुन्हा नक्किच असे होते ते जुने दिवस... ©Dhananjay #ते_जुने_दिवस... #कविराज_धनंजय
#ते_जुने_दिवस... #कविराज_धनंजय
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited