Nojoto: Largest Storytelling Platform
akashjadhav9630
  • 70Stories
  • 93Followers
  • 551Love
    357Views

Akash Jadhav

I am writer. I love music. Reading books. travel.

  • Popular
  • Latest
  • Video
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

बघ सापडतोस का स्वत:च स्वता:ला
हरवून बसलायस तुझ्या तू सुखाला
नको नकोशी वाटते आता ही गर्दी
आपणच झालेत आता आपले दर्दी

रस्ता तोच तेच काम आणि साला तोच दाम
करावसा वाटतो आता या सर्वांना राम राम
ते जुने दिवस किती तरी बरे होते
आपल्या साठी आपले खोटे ही मघ खरे होते

आता खळखळून हसणे ही बघ बंद झाले
न पेलणारे असे खांद्यावर बघ हे ओझे आले
हल्ली ती नजरेतली गायब झाली आहे चमक
आता नाही राहिली शंब्दात ती पहिली धमक

सारं  गमावून काय करायचं रे हा मान
हल्ली थोडा तरी शिल्लक आहे का स्वाभिमान
नव्हते बणायची होती कुणाच्या हातची चावी
वाटतंय स्वता:च्याच  मुस्काटात एक लावून द्यावी

का ठोकतो मी नको त्याला पण सलाम
मला वाटतं झालोय मी माझाचं गुलाम
बघ सापडतोस का स्वत:चं स्वता :ला 
हरवून बसलायसं तुझा तू  सुखाला!! 
               -आकाश जाधव (कवी राज)

©Akash Jadhav #addiction
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

नजरेला नजर....... 
पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर
 मला पुन्हा सोडून जावं लागेल हे नवं शहर

पुन्हा नको तो बसवू पाहूस प्रेमाचा तो खेळ
नाही जमणार पुन्हा बसवायला तो जुना मेळ

अशी हास्य नको आणू गालातल्या गालात
नाही करायच आहेत मला तसे ते हालात

पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर
मला पुन्हा सोडून जाव लागेल हे नवं शहरं

हल्ली नाही आवडत मला ते गुलाबी अत्तर
गुलाब आणि काट्यामधे असु दे थोड अंतर

नकोत मला त्या पुन्हा सुखद श्रावणाच्या धारा
आवरुन घेतलाय मी कधीच तो सारा पसारा

पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर
मला पुन्हा सोडून जाव लागेल हे नवं शहर

                     -आकाश जाधव (कविराज)

©Akash Jadhav #Night
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

काही चं आराध्य दैवत आहे साई
माझ्या साठी सर्वस आहे माझी आई
नऊ महिने तिने गर्भात होते वाढवले
म्हणून तर मी हे सुंदर जग पाहिले
नाही तर पृथ्वी गोल कि चपट मला नसते उमगले!! 

तिच्या मुळे हे माझे अस्तित्व आहे
तिच्या मुळे च जगण्याला अर्थ आहे
तिच्या चरणी करतो मी हे जीवन अपर्ण
ति पहाते मला च पाहत नाही आता दपर्ण
कारण मी आहे  तिचेच तर प्रतिबिंब!! 

तिच्या पदरात आड लपतछपत होतो
बापापेक्षा आईवर जास्त प्रेम करतो
तिच्या चेहऱ्यावर एक नवे तेज होते
जगण्याला नवे कारण मिळाले होते
दु:ख जाऊन सुख तिच्या अंगणात 
हसत खेळत पुन्हा बागडत जे होते!!

©Akash Jadhav #MothersDay
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

वाद नको संवाद हवा.... 

का हवा हिंदू -मुस्लिम वरून वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
का घालता आपापसात आपल्या च देशात राडे
का करता स्वतः ला नको तिथे उघडे नागडे!! १!! 

तूमची जशी गीता तसचं त्याच कुराण
दोन्ही धर्मात दोघांना सर्वोच्च मान
तुझ्याकडे आहे पुजारी तर त्याच्याकडे काझी
का ठेवता दोंघामधे नको ती नाराजी!!२!! 

का हवा हिंदू मुस्लिम वरून वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
कुणी ठरवला त्याचा हिरवा तुझा भगवा
कुणी काढला हा नको तो फतवा
तू तुझ्या धर्मासी राखतो इमान
मग त्याला का ठरवतो तू बदनाम!!३!! 

तूला आवडतो मोहम्मद रफी त्याला 
आवडते मंगेशकर लता
तरीही का मग नाही तो 
वाद घालत बसता
तूझा आवडता जहिर त्याचा आवडता सचिन
तूला आवडे अजय -अतुल त्याला आवडे रेहमान !! ४!!

का हवा हिंदू मुस्लिम वरुन वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
तुझ्या अंगणी बघ  तुळशीची रास
पाच वेळची नमाज त्याच्या साठी खास
त्याच्या कडे बनतो गोड शिर खुरमा
तुझ्याकडे उपवासाला असतो तिखड उपमा !! ५!! 

त्याने केली तर ती ठरते टीका
मग तुम्ही का काढता त्याच्या चुका
तुला -त्याला प्रिय आहेत अब्दुल कलाम
कोणी कुणाला समजू नये इथे गुलाम
तु दोन्ही हातांनी करतोस नमस्कार
त्याची दुआ पण ठरते खूप असरदार!! ६!!

©Akash Jadhav #Mic
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

भर ले तू अब 
तेरे पंखों में उडान
तुझे आसमां तक 
पोहचना हैं
अब ये धरती तेरे लिए
कम पड़ रही हैं!! 

तूझे चार दिवारों में 
कैद होकर नहीं हैं रहना
हवा संग अपना
रुख़ तुझे बदलना है

किसी के बातों पर
तू यकीन मत कर
तेरा हौसला तू बुलंद रख
वक्त को तूझे अपने और
झुकाना हैं!! 

तू अपने वसूलो पे चल
दौनों हाथों से सब को
तुझे भर भर के देना है
तेरी झोली खाली हो 
पर दुआओं की कमी
कभी ना रहे गी!! 

भर ले तू अब 
तेरे पंखों पे उडान
तुझे आसमां तक 
पोहचना हैं
अब धरती तेरे लिए
कम पड़ रही हैं!! 

माँ बाप का रहेगा तेरे
सर पर आशिर्वाद
फिर कोई नहीं कर 
सकता तुझे बबार्द
तूझे रहना है 
सदा के लिए आबाद!! 
भर ले तू अपने 
पंखों में उडान!!

©Akash Jadhav #Sunrise
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

सारचं तुझ्या मना सारखे घडत नाही
काही ना इथे दुसरा पर्याय उरत नाही
आणि नंतर नशीबला दोष देऊन चालत नाही
चार बुक वाचूनही अर्थ लागत नाही
तेव्हा अनुभव च तुला मार्ग दाखवतो
भरकटलेल्या तुझ्या पावलानां
योग्य ति दिशा देतो!! 
-आकाश जाधव

©Akash Jadhav #alone
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

आजा लोट कर पिया.... 

आजा लोट कर मेरे पिया
तेरे बिन तरसे यहाँ मेरा जिया
सूनी सूनी कर गई जिंन्दगी 
तेरे बिना कैसे पुरी होगी 
हम दोनों कि कहानी!! 
आजा लोट कर पिया
 
 वो बारिश भी लोट आई हैं
संग धरती भी खुशी से महक उठी हैं
हर बार कि तरह मुझे तेरे संग बिना हैं
जो गिले शिकवे हैं उन्हें बूदों संग बहाना हैं
तेरे बिन तरसे मेरा जिया
आजा लोट कर पिया!! 
 
अपनी तकदीर मैंने तेरे नाम लिखीं
तेरे सिवा और कुछ  भी मेरा नहीं
जिस्म ही नहीं रूह भी हो गई तेरी
अब बची है जिन्हें के लिए सिर्फ सांस
आजा लोट कर मेरे पिया!! 
 
अब आईना भी हमसे नाराज रहता हैं
तूम को ही अब हर जगा ढुंढता रहता है
आजा लोट कर मेरे पिया
तेरे बिन तरसे मेरा जिया!!

©Akash Jadhav #us
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

तू नाय बजावला  मतदानाचा अधिकार
तुझ्या एका मता मुळे बघ कोसळले सरकार
तू नाय लावली बोटाला तुझ्या ती शाई
तूला फिरायची झाली होती लय घाई!! 

तुझ्या मुळे कोणाचं तरी स्वप्न संपले
त्यातले काही जण दारुच्या गुंत्यात भेटले
घर दार विकून तो येणार होता ना निवडून
तू त्याला च लावलस  का रे लाथाडून!! 

बाप साधा कार्यकता होता रे 
समाजातील साठी झटत होता रे
पोरांनी थोडा पुढचा विचार केला
शिक्षणाचा थोडा आधार घेतला!! 

त्याच्यांकडे आज काही नाही शिल्लक
आता तो थोडा स्वताला सावर तोय
आई बाप आणि  बायकोला
रडगाणे ऐकवत नाही जगाला!! 

जपून आहे ठेवला त्याने स्वाभीमान
झुकू दिली नाही बापाची मान
पुन्हा येईलच की तो नव्या दमाने
शिकलेल्या त्यांच्या या अनुभवाने!!
-आकाश जाधव...

©Akash Jadhav #Nature
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

बारिश और तेरी यादें
बहूत नेक थे मेरे इरादे
तुझे ना वो समझे
और हम थें तुझमें उलझे!!

©Akash Jadhav #sunkissed
bc6ebeb66fc6c96cce36137cba543c66

Akash Jadhav

तू गेल्यापासून काही च अडले नाही
तू गेल्या चे आता दु:ख ही उरले नाही

आठवणी तेव्हढ्या सोबत आहेत
पुढच्या प्रवासाला आधार देत
तूझे सारे सारे दावे फेल ठरले
तू ज्याच्या वर प्रेम केले 
त्याने ही तूला एकटे सोडले

सावली सारखी होती स माझ्या
तिही सोडून जाते आपल्या ला
अंधार दाडतो जेव्हा आपल्या बाजूला
तू गेल्यापासून काही च अडले नाही
तू गेल्याचे आता दु:ख ही उरले नाही

चंद्र असतो आज ही साक्षिला
मी जागतो पौर्णिमेच्या रात्री ला
हल्ली मैफलीत तूझी चर्चा नसते
माझ्या अंतरी अजूनही तूच बसते
मग मनाला हा प्रश्न पडतो
मी तुझ्या विना अपूर्ण
कि पूर्ण?

©Akash Jadhav #Time
loader
Home
Explore
Events
Notification
Profile