Nojoto: Largest Storytelling Platform
shitalsankhe6424
  • 55Stories
  • 254Followers
  • 595Love
    5.3KViews

Shital Sankhe

लिहिण्यासाठी आहे ...मी की , लिहीण्यातच आहे ...मी शोध घेत आहे . शब्दांच्या अथांग सागरात ...शब्दाचाच किनारा गवसत आहे .

  • Popular
  • Latest
  • Video
d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

जितके सहज राहता येईल तितके रहावे ...
दुसऱ्यांना सहज वाटावे म्हणून नाही तर , 
स्वतः ला सहज वाटावे म्हणून ... ☺️

    #शिवदुलारी

©Shital Sankhe thought 

#Memories
d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

चाफ्याच्या झाडा-पद्मा गोळे

चाफ्याच्या झाडा-पद्मा गोळे

d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

मैत्री

#MusicalMemories

मैत्री #MusicalMemories

d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

माझा शेतकरी बाप 

बाप माझा राबतो शेतात
अभिमान आम्हा वाटतो
जगाचा पोशिंदा म्हणून
मान ताठ आमचीही करतो

घाम गाळून धरणी मायेस 
सिंचन रक्तपाण्याने घालतो
कष्ट त्याचा धर्मच जणू
तो नित्यनेमाने माय पुजतो 

अन्नकणाचे महत्त्व जाणून 
भुकेसाठी ऊत्तर शोधतो 
वीतभर पोटासाठीच नाही 
आत्म्यापासून शेतात कष्टतो 

आभाळभर पाऊस त्याच्या 
नेत्रातूनही सांडत असतो 
विठूमाऊलीस वारंवार पाऊस 
साकडे घालून तोच मागतो 

हळव्या मनाचा बाप माझा
शेतात योद्धा म्हणून लढतो
पिक सोनसळी पाहून तो
धन्य ह्रदयापासून होतो

सौ.शितल हर्षल संखे
ता.जि.पालघर

©Shital Sankhe #शेतकरी_दिवस
d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

#संवेदना

संवेदना रूजावीशी वाटली 
तर, ती प्रस्तुत करत चालावे
नव्या पिढीला दोष देण्यापेक्षा
त्यांना जाणिवांनी भरावे

कळत नकळत संस्कारांची
पाळेमुळे खोलवर जातील
ओलावा संपण्याआधीची
वर्तवणूक मशागत करतील

आजूबाजूचे अवलोकन 
विचारांतून कृतीत साकारेल 
आकृतीबंध बदल होत मन
संवेदनक्षम कार्य करीत राहेल

उद्याची नको चिंता कुणालाही
बाळ आपला कसा वागेल
आज जे जे प्रत्यक्ष सामोरे
तेच तो उद्या करताना दिसेल 

संवेदनांनी जिवंतपणा
आपण सारे जपूया 
कधी एक आसू ढाळू अन्
कधी खुदकन हसूया

मोकळे होत जाऊन
मनापासून आनंदी जगूया
जगाचा विचार करण्याआधी
छोटं विश्व समृद्ध करूया 

©®सौ.शितल हर्षल संखे
             (शिवदुलारी)
             १८/१२/२०

©Shital Sankhe #शितल_काव्य

#Texture
d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

तीने जगावे कसे प्रश्न कधीच नव्हता
प्रश्न उपस्थित मात्र दुर्लक्षित होत गेले

दुनिया चुकीची नव्हती तरी विकृती होती
ती असुरक्षित भावनेने व्याकूळ चित्र दिसले

निष्ठूर होता राक्षस ती देवी म्हणूनही अपमानित 
सांगा आता कोणते ईश्वरही न्यायास धावून आले 

न्यायदेवते तुलाच आता साकडे समस्त लेकींचे 
 का असे गुन्हेगार मोकाट सुटले अन् असूर झाले

एकवार चिरडून टाक पुढे दहशत पसरू दे....
कित्येक मनिषा पुन्हा मिटल्या जाऊन संपले ...

दु:खी अंत:करण झाले साऱ्यांचे पण ठोस पाऊल 
कोण उचलणार ....?
जाब विचारायला कित्येक अबला बनून स्वर्गात जाणार ...

माणसातील देव असा कसा संपतो ...
अन् संपला तो तर माणूस जिवंत कसा राहतो .

विकृती जगायला नको ...विकृती हरायला हवी ...
तीने यातनांचे असहनीय कांड कसे असेल पाहिले 

स्वत:चा साक्षात बळी जाताना कसे असेल वाटले
संपव न्यायदेवते तराजूत तोलायचे ...
कडक शासन तातडीने लगेचच मिळू दे ....
दहशत त्या शासनाची अशी आता असावी 
पुन्हा कुणी अशा विचारानेही विकृती थरकाप उडावी ....

नि:शब्द व्हावेसे वाटून ...खूप काही दाटून आले
एका भगिनीला पुन्हा एकदा ...पुन्हा एकदा ...स्त्री म्हणून क्रुरपणे हरवले 😔


              सौ.शितल हर्षल संखे

©Shital Sankhe #Stoprape
d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

काचेवर पाय देऊनही भरभर होते चालले 
विव्हळणारी जखम सोसूनही मागे ना फिरले

काळाचे कालचक्र पटकन अचानक बदलले 
 पुढयात तेच काहीसे नर्तन करून सुखावले

हुंदडणारे मन बिचारे गदगद अलवार जाहले
वाकून नम्रपणे एक वृक्ष गोड फळांनी लगडले 

रूसायचे असते कधी मधी दैवावर ही हे पाहिले
दैव रूसलेला ही कधी मधी हसतो हे अनुभवले

 ©®सौ.शितल हर्षल संखे कविता

कविता

d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

हिंदी कविता
#Mylanguage

हिंदी कविता #Mylanguage

d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

गणेशा 

#LOVEGUITAR

गणेशा #LOVEGUITAR #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile