Find the Best गझल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकिसी शायर की गझल, तीना जी की गझल, तिने परवीन की गझल, ताहिर चिश्ती की गझल, आठवले की गझल,
Anil Sapkal
White अनिल सपकाळ ८८७९१३८६८६ अनिल ©Anil Sapkal पैलतीर.. #poem #कविता #गझल #शायरी #मराठीप्रेम
पैलतीर.. #poem #कविता #गझल #शायरी #मराठीप्रेम
read morealone
White किती हा तुझा मोठा डाव होता.. तुझ्या प्रेमात मला हरवण्याचा तुझा वेगळाच डाव होता... तू जिंकूनही हरली आणि मी तुझ्यासाठी हारलो.. हाच फक्त माझ्या प्रेमातला फरक होता...😭💔❤🔥❤🩹 ©alone #love_shayari #प्रेम_आणि_प्रणय #मराठी #शायरी #गझल #alone
#love_shayari #प्रेम_आणि_प्रणय #मराठी #शायरी #गझल #alone
read moreaaj_ki_peshkash
Shankar Kamble
गझल... जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले ©Shankar Kamble #MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य
#MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य
read moreShankar Kamble
जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो आत पेटला जाळ तरी राख उद्याची वाहत बसलो दबा धरून बसलेल्या श्वानांच्या झुंडी जागोजागी लचके तोडून कशा हसती पाठ शांतीचा सांगत बसलो जात माझी तोलतो "तो "पारड्यात ठेवून माणुसकीला माप भरण्या माणुसकीचे मीच मला मग कापत बसलो पोतलेला रंग निखळतो खपली उडते पुन्हा पुन्हा पाया खचला तुझाच वेड्या दोष घराला देतं बसलो विरक्तीचे हे भस्म लिंपूनी सोहळा झाला देखणासा पोळे पाहून मधुर घटाचे एकाक्षाने सेवत बसलो डोळ्यांच्या खाचा झाल्या मन पाझर पाझर आटले खणतोय पुन्हां तळ आता बळ उसने मागत बसलो चूल आहे विझली माझी काळोख दाटला भवती चिमण्यांची फडफड नुसती सूर्यास ऐकवीत बसलो पायांना माहित कुठले? वाटेचे बंड अघोरी धुडकावून रुळल्या वाटा पथ नवीन शोधत बसलो ©Shankar Kamble #Parchhai #गझल #मराठीप्रेम #मराठीविचार #मरण #चीता #भस्म #जीवन #मृत्यू
#Parchhai #गझल #मराठीप्रेम #मराठीविचार #मरण #चीता #भस्म #जीवन #मृत्यू
read moreShankar Kamble
कसे ओळखावे तुला भेटल्यावर? कसे शांत होणार रान पेटल्यावर? दवाचे सडे आज भिजले अवेळी नको पान तोडू पुन्हा जोडल्यावर.. गेले लयास मोठे स्वप्नातले मनोरे तलवार म्यान केली खिंडीत गाठल्यावर.. जुजबी बनाव होता जगण्यातला कसा हा गिळले वादळांनी पंख दोन्ही छाटल्यावर.. फिरूनी कितीदा गिरवतोस काय पुस्ती? होतात खुणां गहिऱ्या पुन्हा खोडल्यावर.. जुळवून आज घेते सुखाचे उखाणे अडवतो उंबरा का माप ओलांडल्यावर? भरभरून श्वास आता लाभले परंतु ठेवू कशात भरुनी क्षणगंध सांडल्यावर? ©Shankar Kamble #walkingalone #तू #भेट #भेटली_ती_पुन्हा #भेटतुझीमाझीस्मरते #गझल #मराठीशायरी #कवी #मराठीकविता
Shankar Kamble
वेदनेचा बाजार मांडला दुःख विकण्या सांगतो मी भार दाटला पुन्हा ढगाला डोळ्यांत पाऊस मागतो मी पेटलेल्या उन्हांत आता झाड सोसते तप्त झळाला आठवून मग उंबऱ्याला जीव उगां का जाळतो मी? मतलबी दुनियेत होते पायपुसणी भाबड्याची कातडी जपतो स्वतःची पारखून जग वागतो मी टांगली कित्येक स्वप्ने का नव्याने न्याहाळतो? देवून चकवा पांगलेल्या पाखरांना भांडतो मी माखलेल्या गर्द हळदीचा गंध ना लाभला रंगल्या मेहंदीतल्या हातांस दूर पाहतो मी सळते जीवांला जाळतेही पुन्हा पुन्हा ती सांगते ही भंगलेल्या राऊळाच्या पायरीला थांबते मी उघड्यावरचा असा पसारा आज वाटतो आवरावा गाठोड्याचा भार शिरावर मूकपणाने चालतो मी ©Shankar Kamble #Past #गझल #वेदना #दुःख #जीवन #जगणे #जगणं #सांजवेळ
Shankar Kamble
*न केलेल्या गुन्ह्याची रोज शिक्षा भोगतो मी* *देवून श्वास उसने मरणांस रोखतो मी* *सांगून गूज कानी अंधार पेटलेला* *चेतवू नको स्मशाने राखेत शोधतो मी* *डोळ्यांत दाटलेल्या सरी कैक शांत गहिऱ्या* *बरसू नको अवेळी वळीवास सांगतो मी* *संवाद साधण्याला प्रतिसाद सादास द्यावा* *भाषा अबोल आहे मौनास जाणतो मी* *मातीत पेरलेल्या अंकुरास धाप लागे* *तोडून नाळ ओली प्राणास शिंपतो मी* *पानांस गर्द हिरवा माखून साज रंग* *भाळी उदास रेषा कुंकास रेखतो मी* *लपेटून नशिबाच्या लक्तरात आयुष्याला* *दोष कोणता ?कुणाचा? कोड्यात गुंततो मी* *जपले उरांत त्यांनी कवटाळूनी घराला* *केल्या उभ्याच भिंती दगडांस भांडतो मी* ©Shankar Kamble #Travel #गझल #गझलेची #जीवन #माणूस #जीवन #अनुभव #धोका