Nojoto: Largest Storytelling Platform
akshaybhosale3854
  • 5Stories
  • 15Followers
  • 23Love
    79Views

Akshay Bhosale

लेखनी अंतर मनातली..

  • Popular
  • Latest
  • Video
efa1b76e3036e76d1408301da310da78

Akshay Bhosale

#SayNoToDomesticAbuse
efa1b76e3036e76d1408301da310da78

Akshay Bhosale

स्ञि..
अगं माझे पोरी,
बाई जातीचा जल्म ईथ, गुलाम हायं बग...
गोर गोमटं रूप तुझं,
आयन्यात दडवं बग,
नागीणी सारखी या जगात
सळ सळं बग...
अगं माझे पोरी,
बाई जातीचा जल्म ईथ, गुलाम हायं बग...
गरीब अडानी गाय,
दावनीची गुलाम हायं बग,
शिक्षणाची कास धरून,
तु वाघीन हो बघं....
अगं माझे पोरी,
बाई जातीचा जल्म ईथ, गुलाम
हायं बग....
मोकाट भटकनाऱ्या लांडग्या-हांडग्यांची शिकार हायं
बग,
त्या शिकाऱ्यांची तु शिकार कर
बग,
PSI, IPS पोलिस अधिकारी हो बग...
अगं माझे पोरी,
बाई जातीचा जल्म ईथ, गुलाम हायं बग...
नात्या गोत्यांची मन जपत,
स्वप्नि अधुरी हायं बग,त्या
स्वप्नस्पुर्तीची तु, उंच भरारी घे बग...
अगं माझे पोरी,
बाई जातीचा जल्म ईथ, गुलाम हायं बग...
तुझं अस्तित्व तुला, घडवायच हायं बग,
जिजाऊ,साविञी झाशीच्या राणी सारखी,स्ञि स्वतंत्र्य हो बग...
         ‌‌
                  अक्षय भोसले

©Akshay Bhosale जल्म बाईजातीचा..

#sagarkinare

जल्म बाईजातीचा.. #sagarkinare #मराठीकविता

3 Love

efa1b76e3036e76d1408301da310da78

Akshay Bhosale

मत मत मत तुझ नको विकु लेका,
बाटली मटना पाई असा, नको झुकु लेका...
मत मत मत तुझ नको विकु लेका,
अंबानीला आहे तोच, अधिकार आहे तुला
येवढा मोठा धनवान तु, कसा विसरलास लेका....
मत मत मत तुझ नको विकु लेका,
तुझ्या एका बोटावर्ती तो ,आमदार  आहे लेका
तो झुकायचा सोडुन, तुचं झुकतोस लेका....
मत मत मत तुझ नको विकु लेका,
दारू,झुगाराचे अड्डे या, भडव्यांचेच आहेत लेका
तुझ्या बान याच्या पाई, घरं दारं विकली लेका....
मत मत मत तुझ नको विकु लेका,
दुष्काळ ग्रस्त निधी यांनी,चाटुन पुसुन खाल्ला लेका
अन् इकडे कर्ज -नुकसानापाई, शेतकरी फासाव लटकले लेका...‌‌
मत मत मत तुझ नको विकु लेका,
तुझ्या मुला-बाळांच शिक्षण, यांनी माघ केल लेका
अन् बाल मजुरी करायला यांनी, भाघ पाडल लेका....
मत मत मत तुझ नको विकु लेका,
येवढी माघाई वाढवली की, जगनं मुशकील झालं लेका
खोटी आश्वसने झाडुन, तुला पार लुटला लेका....
मत मत मत तुझ नको विकु लेका,
येवढ तुझं वाटुळ,तुचं केलंय लेका
मत तुझं विकुन,पायव दगड पाडलास लेका.....
 मत मत मत तुझ नको विकु लेका,
बघं पुन्हा आलं इलेक्शन, तोच नेता उभा
आला आता दारात तर,काड झोडपुन त्याला.....
अन् मत मत मत पुन्हा नको विकुस लेका,
तुझ्या एका बोटावर्ती, देशाच अन् तुझ भविष्य आहे लेका
चल वाचवुया आपला भारत देश, उमेदवार सच्चा देऊन
अन् लोकशाहीचा आदर राखुन,मतदानाचा हक्क बजवु लेका....
                कवी/अक्षय भोसले
                      (बारामती)

©Akshay Bhosale मतदान..

5 Love

efa1b76e3036e76d1408301da310da78

Akshay Bhosale

पोशिंदा जगाचा.
आज मनात सलतय, काळीज रडतय
दु:ख हे कसलं,जिवास छळतय

हे कळना काय,काय नशिबी हाय
सावकारी कर्ज,डोक्यावं हाय

वावर हाय पर,पाऊस नाय
कोरड्या रानात,पेरायचं काय

कर्ज ही माफ नायं,सरकारला जाग नाय
फाशी ईना पर्याय,उरलाय काय ?

आता दाराकड पावलं,टाकना पाय
पोटा-पाण्याचं, करू म्या काय ?

भाता ईना चुल्यावर,शिजतय काय
कसाबाच्या दावनीला,हंबरते गाय

काय करू म्या जीवाला झोपचं नाय
मुला-बाळांच माझ्या,व्हया-जायाच हाय

आता खचलो पार म्या,थकलो हाय
देवा पोशिंदा जगाचा,बघ उपाशी हाय...

©Akshay Bhosale #Travelstories
efa1b76e3036e76d1408301da310da78

Akshay Bhosale

*.....  *...... *ती* *..... *.....*

अर्ध्या वाटेत माझी, सोडुनी साथ गेली
नागीनी सारखी माघे, सोडुनी कात गेली,

नको नको ते बोलुन, रागात फार गेली
काळजावरी माझ्या ती, घालुनी घाव गेली,

शब्दांच्या तलवारीने मन माझं, चिरूनी गेली
रक्ताळलेल्या मनाला, तीथेचं सोडुनी गेली,

स्वप्नांना साऱ्या माझ्या, लावुनी आग गेली
हसऱ्या सुखात माझ्या, उधळुनी राख गेली,

गेली ती गेली,  पण आठवणी सोडुनी गेली
अन् त्या आठवणींनी माझी, आज बरबादी फार केली,

हातातला हात माझ्या, सोडुनी दुर गेली
अजनबी पाखराशी, जोडुनी नातं गेली,

अखेरच्या श्वासा पर्यंत, वाट तीची मी पाहीन
डोळ्यात तीच्या प्रेम, पाहुनी प्रान सोडीन,

जळत्या ही चिते मधुन, तीलाचं पाहतं जाईन 
फुडचा ही जल्म माझा, तीच्याचं साठी जाळीन.

            Akshay D. Bhosale
             
             Baramati.

©Akshay Bhosale #sagarkinare


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile