Find the Latest Status about मनीची रिक्षा कार्टून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनीची रिक्षा कार्टून.
Archana Pol
मनीची फजिती कपाटातल्या मेव्यावरती मनीमाउने स्वारी केली दुपार पाहुन सामसूम ती दबके पाउल टाकत आली थकुनी आई जरा झोपली बाबा पेपरमध्ये गुंग चिंगी, गोट्या पडवीमध्ये पत्ते खेळत होते दंग आजी पोथी वाचत बसली हळूच तेव्हा मनी सटकली खिडकीमधुनी घरात शिरली स्वारी फडताळावर चढली. फडताळावर चढता चढता फुलपात्रांची चळत घसरली वाट्यांचीही धांदल झाली आई चिडून धावत आली. गडबड ऐकुन मनी पळाली काही नाही खैर म्हणाली इकडुन तिकडे धावत सुटली चिंगी गोट्या हसू लागली. मान वाकडी करुन म्हणाली उगाच का ही उठली आई कपाटातला मेवा नाही फटके उगाच बसले बाई. ©Archana Pol मनीची फजिती