Nojoto: Largest Storytelling Platform

New नाम पर अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाम पर अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाम पर अभंग.

    PopularLatestVideo

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

balaji boinwad

अभंग##

read more
अभंग

बुध्दी हाची प्रपंच! या जडजीवा!!
दोर धरता सहज!अध्यात्माची!!
बघता आयाम! शाश्वत विज्ञानी!!
फेडता ऋण! संवर्धित वसुंधरा!!

© balaji boinwad #अभंग##

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
भावभोळा हरी (अभंग*)
 
भावभोळा हरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । श्री श्रीहरी ।।०१।।

क्षणाक्षणां ध्यान । तुझे रे केशवा ।
तुझाच माधवा । देह माझा ।।०२।।

उभा वारकरी । देह दिधलासी ।
खड़ा ठाकलासी । भक्तजना ।।०३।।

हरी हरी घोष । मनी रात्रंदिनी ।
संत शिरोमणि । तू विठ्ठला ।।०४।।

तुझ सम सारे । रंजले गांजले ।
मज् जवळीले । बां विठ्ठला ।।०५।।

भावभोळे रुप । अनंत ते कोटी ।
नाम घोषओठी । हरी हरी ।।०६।।

वाहिला हां देह । भयमुक्त श्राप ।
तूच मायबाप । अनंताचा ।।०७।।

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #अभंग

HANAMANT YADAV (कवीराज)

अभंग #Music

read more
विठ्ठलाची बाधा...

वारा देही संचारला । तगमग ही उरीची।
        बाधा झाली बाधा झाली।मज विठ्ठलाची ।।धृ।।

घुमावया लागे मन। विस्कटला पंचप्राण।
        भांभावला आत्मभान। हाक विठ्ठलाची ।।१।।

नामरूपी भस्म ल्यालो। आत्मरूपी शुद्धी प्यालो।
          मोह मायेचा भंडारा‌ । आस विठ्ठलाची ।।२।।

बरळलो सार्थ वाणी । ब्रम्हानंदे पाणी पाणी ।
म्हणे कवीराज ऐसी । धून विठ्ठलाची ।।३।।

कवीराज अभंग

राजेंद्रभोसले

अभंग
हृदयी आकळे। दुर्जना नाकळे।
कोंडले सावळे। परब्रम्ह।।धृ।।

दावूनी कोहळे । पापिया आवळे
टपले कावळे। अधर्मीया।।1।।

विटेवरी रजा। हर्ष हास्य वजा।
महामारी सजा। पामराशी ।।2।।

राजे म्हणे येथे।दुःख जीर्ण तेथे।
गुरुकृपे नाते। अखंडची।।3।।

कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.नं.-9325584845 #अभंग

#nojoto2020

HANAMANT YADAV (कवीराज)

अभंग.... पांडुरंग #कविता

read more
पांडुरंग.... (अभंग)

जपीला प्रभाते। तोची म्या विट्ठल।
पंढरीचा सखा। पांडुरंग ।। ध्रु।।

जीवा लागी भेटी। जन्माचिये गाठी।
राही उभा पाठी। पांडुरंग ।।१।।

चंद्रभागा तीरी। ऊभा वारकरी।
नामघोष करी। पांडुरंग ।।२।।

कविराज पाही। पंढरीत राही।
तोची लवलाही।पांडुरंग ।।३।।

कविराज।©
८६९८८४५२५३ अभंग.... पांडुरंग

balaji boinwad

अभंग #Love

read more
अभंग
 सदा सावध राहावे ! बुध्दीक्षीन लोकांपासुनी !!
हेची असावे ध्यानी ! नाही कुणाचेच कुणी !!
चढता योग्य-अयोग्य निवडोनी ! धैर्यरुपी पाऊले !!
बुध्दी आपुलीच खरी ! भोग भोगाची पायरी !!



@@बालाजी बोईनवाड@@

© balaji boinwad अभंग
#Love

Rajendrakumar Jagannath Bhosale

क्षणभंगुर रे सुख ,जाई कळीकाळ दुःख
पाहता विठ्ठल मुख,आवडीने ll धृ ll

जरी संसाराची कोडी, लाभे परमार्थ जोडी
असे भजनाची गोडी, अनंताची ll1ll

ओलांडीले मोक्ष रेघे, जपी नाम मनो वेगे
कृपासिंधु विणी धागे,  स्वमायेचे ll2ll...

©rajendrkumar bhosale #अभंग

#farmersprotest

Kisan Atole sir

अभंग #krishna_flute #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile