Find the Latest Status about dhk prashala pandharpur from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, dhk prashala pandharpur.
Pandit Nimbalkàr
ओढ तुझी पांडुरंगा शीर्षक - वारी यंदाची चुकली धाव घेई पांडुरंगा भक्ती अंतरी कोंडली साथ कोरोनाची येता वारी यंदाची चुकली ||धृ|| ओढ तुझी पांडुरंगा माझ्या मनाला लागली आली बघा एकादशी पायी दिंडी ती निघाली ||१|| हरी नामाचा गजर टाळ, मृदंगी चालला अश्व, झेंडे, वीणा, माळ टिळा कपाळी लावला ||२|| डोई तुळशी घेऊन मुखी भजन म्हणते मागे सोडून संसार विठ्ठू भक्तीत दंगते ||३|| भेट होता ज्ञान तुका थांबे पालखी दर्शना गाता अभंग संतांचे देव नाचतो किर्तना ||४|| मुकी झाले रे पंढरी चंद्रभागा ही रूसली दुर रुख्मिणी ती उभी तुझी माया का? आटली ||५|| धाव घेई पांडुरंगा भक्ती अंतरी कोंडली साथ कोरोनाची येता वारी यंदाची चुकली ||धृ|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #vitthal , #Vari , #pandharpur
#panditnimbalkar, #vitthal , #Vari , #pandharpur #poem
read moreTushar Thackeray
चंदनाचा टिळा मस्तकी गळा तुळशीची माळ , खंड ना पडो तुझ्या भक्तीस कधीही हिच ऐक मागणी माझ्या सावळ्या विठ्ठल. - Tushar Thackeray #pandurang #vitthal #pandharpur #ekadashi #tunedtusharthackeray
harshad kharade
Natural Morning युगानुयुगे आता माझे न जाणें राऊली , माझ्या मनाच्या गाभाऱ्यातच वसते माझी विठ्ठू माऊली - हर्षद खराडे har-sh 🙂 #vitthumauli#pandharpur
har-sh 🙂 #vitthumauli#pandharpur
read more