Nojoto: Largest Storytelling Platform

New गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया.

Stories related to गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया

शब्दवेडा किशोर

White #हे गणराया..पत्रास कारण की....
शब्दवेडा किशोर 
( चाल  :- लालबाग परळ या सिनेमा मधील पत्रास कारण की
या गीतावर आधारित माझा हा पाहिला गितलेखणाचा प्रयत्न )
हे गणराया..पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही
तुझ्या चरणाशी सुद्धा आता येण्याइतकी आमची लायकी नाही....
कलीच्या नजरेखाली आम्ही वाढतो आहे रोज इथं तुझे संस्कार आम्ही सदा जाळतो आहे
व्यसनाच्या आहारी जाऊन घरं उध्वस्त करतो आहे
आमच्या आया बहिणींची आब्रू रोजच आम्ही लुटतो आहे म्हणून 
तुझ्या सावलीत आमची अस्तित्व माया उभारायची आमची आता लायकी नाही
पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही....
कर काही चमत्कार अन् मरू दे आमच्यातला
हा दानवी भार जाळूनिया घे मायेने लेकरांना छातीशी तु
धर स्वतःची पुन्हा छाया आमच्या डोईवर तु
वचन देतो विघ्नहर्त्या आम्ही तुझ्या संस्काराची फुलं ओंजळीत ठेऊ
आया बहिणींना पुन्हा नवा सुरक्षित जन्म देऊ
देवा तुझी शिकवणीला आता आम्ही राखेत सडू देणार नाही
तुझीया चरणाच्या धुळीचं सत्व कडू होऊ देणार नाही
माफ करुनीया आम्हा चरणाशी घे रे तुझी कृपादृष्टी अशीच कायम आमच्यावरी ठेव रे
आता तुझ्या अस्तित्वाला आम्ही तडा जाऊ देणार नाही
तुझ्या रूपापासून स्वतःला तुटू देणार नाही हेच माघणं देवा तुझ्या समोर देवा मांडू शकत नाही 
म्हणून सांगतो की 
हे देवा श्री गणराया..पत्रास कारण की..बोलायची हिम्मत नाही..
तुझ्या चरणाशी सुद्धा आता येण्या इतकी आमची लायकी नाही..

©शब्दवेडा किशोर #गणराया

शब्दवेडा किशोर

White #विघ्नहर्ता श्रीगणेश 
शब्दवेडा किशोर
गणरायाची ओढ असे बघा किती गोड गोड
तयाच्या प्रितीला नसे कधी कसलीच तोड 
जोडूनिया कर फुले मन
त्यालाच अर्पण करतो सदा मी माझे जीवन
तोच असे दाता तोची मातापिता
तोच मज समजावतो सदा सुख दुःखाची वेळ
त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ
गजानना गणराया असा चालतसे सदा गजर नामाचा
हरे चिंता व्यथा साऱ्या क्षणार्धात
सोडव आमचा अहंकार वाचव तु आमचा संसार
क्षेम दे गणराया आम्हास सदा तू डोळे मिटून

©शब्दवेडा किशोर #गणराया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile