Find the Latest Status about जगावं कसं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगावं कसं.
Saniya Mujawar
#DearZindagi आयुष्य जगावं कस? स्वछंद फुलपाखरासारखं. हसून फुलांवर बागडावं. नेहमीच का कुडावं. स्वछंद उडावे आभाळात इंद्रधनूच्या रंगांना घेऊनि साथ. बदलणाऱ्या ऋतूंचा घ्या तूम्ही आस्वाद. उंच घ्या भरारी... बंधनाचे तोडून पाश. निसर्गाची घेऊन साथ. आनंद करा आत्मसात. आयुष्य जगावं असं. !! स्वछंद फुलपाखरासारखं ; हसून फुलांवर बागडावं.. नेहमीचं का कुडावं?... आयुष्य जगावं कसं?
Chetan Savkar
#Pehlealfaaz नमस्कार मित्र-मैत्रिणींनो दिवाळीनंतर आपण काही महत्वाच्या गोष्टींवर काम करणार आहोत.त्यासाठी आपल्याला एक होऊन काम करायचं आहे. युवा हाच देशाचा खरा आधार आहे. मेसेजला आपल्या प्रतिक्रिया देत जा.खूप विचारपूर्वक हे सर्व नियोजन आपण करतोय. कृपया स्टेटस वाचल्यानंतर प्रतिक्रिया कळवा.... कसं
Vishvambhar dhavale
कसं सांगू देवा तुला भेटायला आली ती मला वाट बघुन निघून गेली गावा..... काय वाटलं असेल तिच्या मनाला आता सतत प्रश्न मला पडावा......! का तर तिला शब्द दिला होता पुण्यात आल्यावर काहीतरी बोलेल तुला. काय बोलणार होती आता याचा अंदाज कसा बांधावा......! स्टेशनवर तिला भेटायला यावा तर फोन लावायला जावा तर नेमका चोरांनी चोरून न्यावा नेमकी रेल्वे सुटावा.....! काय नशीब माझं देवा तिचा नंबर माझ्या कडे माझा नंबर नाहीं तिच्या कडे असाच एकाने मिळवुन दिला होता. तो पण माझ्या कडून हरवावा.......! कसं असतं प्रेमात पडल्यावर अस होत. रेल्वे गेली निघून काय बोलायचं होतं गेलं राहून आत्ता भावा....! तुम्हीच सांगा काय असेल तिच्या मनांत दडलेलं......! कसं सांगू
sahil sawant
स्वलिखित कविता ॥असंच जगावं लागतं॥ त्यालाच जीवन म्हणतात ,जिथे हसण्यासाठी थोडंसं रडावंच लागतं । प्रत्येकाच्या खांद्यावर कुणाच्या तरी अपेक्षांची ओझी घेऊन इथे असंच जगावं लागतं ॥१॥ कुणालातरी पुढे जाण्यासाठी ,कुणाला तरी मागे खेचावंच लागतं। प्रत्येकाला काहिसं स्वार्थी बनून इथे असंच जगावं लागतं ॥२॥ क्षणभराच्या सुखासाठी दुःख ही तितकंच सोसावं लागतं । केवळ आशेच्या झुल्यावर स्वार होऊन इथे असंच जगावं लागतं॥३॥ माणूस म्हणून जन्माला आलात तर ,लोभी बनून काही ना काही मागावंच लागतं। हीच जीवनाची रीत आहे ,इथे असंच जगावं लागतं॥४॥ ©sahil sawant वास्तविक कविता, असंच जगावं लागतं ,
SUREKHA THORAT
अस्संही जगावं मन भरुन यावं ........... जरा तुझ्या पासुन दुर जावं तिथं तु नसावं मी असावी जिथं , माझी सावली ही नसावी तिथं, जाऊनी विसवावं या नजरेच्या पलीकडं ,,,, शुद्ध अशुद्ध निर्जीव विचारांत न वाहावं वेड्यासारखं निराशेची ज्योती आशेच्या ज्योतीत विराजमान व्हावी सुख दुःखाचा विसर पडावा कोणतीच भावना अन् मोह माया इच्छा साऱ्या लुप्त व्हाव्यात या देहांतुन जरा अस्संही जगाव मन भरून यावं मन स्थिर व्हाव अन् वेदनेला विचारांना इच्छेच्या दुनियेत मुक्त करावं जरा अस्संही जगावं मन भरून यावं शब्दाचे ओझे अपेक्षेचे स्वप्ने मान -अपमान तुझं माझं कठोरता निर्दयता यांचा झरा सूखुन मन आनंदान डोलावं जरा अस्संही जगावं मन भरुन यावं असली नकली दुनियेत स्वतःला सादर करावं विश्वासाचं पान विश्वासानं कोरावं तुझ्या माझ्या जगाच्या आशा अपेक्षांचं ओझं जरा नजरच्या मागं टाकुन विसावाव ........ जरा अस्संही जगावं मन भरून यावं.... ©SUREKHA THORAT अस्संही जगावं मन भरून यावं
शितल(गार्गी)
कसं सांगू तुला माझ्या मनातल्या भावना, कधी उमजेल तुला माहित नाही मला, मनातल्या एका कोपऱ्यात सतत तुझी आठवण असते, त्या कोपऱ्यात मात्र अंधाराचे दाट सावट असते, विखुरलेल्या आठवणी नाकोश्या ही वाटतात कधीकधी, विचार केल्यावर कळते आठवणीं शिवाय आहे काय माझ्याकडे, खूपदा प्रयत्न करतो हे मनातून काढण्याचा, पण मन मात्र रस्ता विसरत नाही त्या आठवणीं कडे जाण्याचा, चेहऱ्यावर हसू, डोळयात सारे दाटवून, मनाला पुन्हा समजावे लागते पुन्हा सारे विसरून.... कसं सांगू तुला...
kavee...
तक्रार लिहायचे खूप आहे लिहिण्यासारखे काही नाही आठवणी ही खूप आहेत पण सांगण्यासारखे काही नाही... जग आले जवळ माझ्या पण आपलं कोणी वाटत नाही गर्दी खूप दिसते पण माणूस कोणी भेटत नाही जग सुंदर दिसते पण चेहरा नीट कळत नाही भास खूप होतात पण खरं काही कळत नाही आसपास सगळेच होते पण जवळच कोणी वाटलाच नाही लोकांना मित्र कसे भेटतात माझी सावलीही रात्री टिकत नाही खूप झाले लिहून वाचणार तर कोणीच नाही तक्रारी कशाला मांडायच्या? ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...