Find the Latest Status about वाटते सानुली मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटते सानुली मराठी कविता.
Vilas Bhoir
New Year 2024-25 नवी नवी नवलाई ओठी आनंदाचे गाणे नवीन आले हे वर्ष जाईल का रे सुखाने एकामागे एक प्रश्न किती शोधावी उत्तरे संकटातल्या चाहुलीचे मागचे ते वर्ष सरे नववर्षाच्या येण्याने विश्व अंबरी उजळु दे सुख समृद्धी आनंदाचे स्वप्न रंगांनी भरू दे त्याच त्या आठवणींना थोडासा विसावा देऊ नवीन या स्वप्नांनी उत्तुंग भरारी घेऊ गतकाळाचा डोई भार विसरून जाऊ निराशा रुपरंग नवे नवेसे नव्याने जागवु आशा ~ विलास भोईर ©Vilas Bhoir #NewYear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता
#Newyear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता
read moreVilas Bhoir
White मी अनामिक तुझ्यासाठी तु ओळखीचा किनारा.... उधाणलेल्या सागरापाशी हा खेळ रंगला सारा.... ©Vilas Bhoir #love_shayari मराठी कविता
#love_shayari मराठी कविता
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे जन्म देणारी जन्मदात्री आहे ती नऊ महिने वेदना सहन करणारी वेदनारहित 'स्त्री' आहे ती.. फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री' जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती... प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ? प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती कळेलच किती कणखर आहे ती... नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे असू शकते .. परंतु, आनंदी राहण्यासाठी मनात असलेला मनासारखं जोडीदार आणि जोडीदाराचं प्रेम महत्वाचं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता
मराठी प्रेम कविता
read morekomal borkar
White महापरिनिर्वाण दिन मनुस्मृतीने तुला निच समजलं तुला दासी समजुन उपभोगल त्या मनुस्मृतीच दहन करून आम्हा स्त्रियांना सन्मान मिळाला तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? आरक्षण तुम्हालाच दिलं म्हणत कलम 340, 341,342लिहुन या संपूर्ण बहुजन समाजाला न्याय दिला म्हणून आम्ही डॉक्टर ,वकील, पायलट झालो तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? रूढी परंपरेने जखडलेल्या स्त्रीला कधी वारसाहक्काने नाकारले तर कधी समाजाने नाकारले त्या स्त्रियांना हिंदू कोटबील देऊन गुलामगिरीतुन मुक्त केलं तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? पाणी पिण्याची मुभा नव्हती चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन मानवमुक्तीचा लढा दिला , पुरूषांसमान हक्क देऊन प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया उच्च पदावर गेल्या तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल? शुद्र म्हणत मंदिराचा प्रवेश नाकारला काळाराम मंदिराचा सत्याग्रह करुन इथल्या मनुवाद्यांचा विटाळ दुर केला तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल? गर्भवती महिलेसोबत गर्भात असलेल्या बाळाची काळजी घेणारा कायदा लिहुन सर्वाना समता , स्वातंत्र्य, बंधुतेचा आधार दिला. संविधान देऊन या भारताला समतेचा थारा दिला तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. ? ©komal borkar #sad_quotes मराठी कविता
#sad_quotes मराठी कविता
read moreविवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)
White आई गं, उद्या लग्न आहे माझं, खूप घाल-मेल होतेय गं मनात, होईन का परकी मी ह्या घराला, लग्न लागल्या क्षणांत ? मीच निवडलाय माझा नवरा, चांगला वाटतोय सध्या, मलाच जबाबदार धराल का, जर वाईट वागला उद्या ? तू म्हणालीस, "सासुबाईंना तू तुझी आईच समज," वाटतं का गं तुला ते इतकं, सोप्पं आणि सहज ? पुसू शकेन का त्यांच्या पदराला, मी माझे खरकटे हात, भरवतील का आजारपणात, त्या मला मऊ मऊ भात ? माहेरी येईन तेंव्हा करेन का राज्य मी माझ्या खोलीवर घुसून ? का मी गेल्या गेल्या टाकशील माझ्या सगळ्या खाणा-खुणा पुसून ? येईल का माझी आठवण तुला जेंव्हा करशील नारळाची चटणी, विसरता येतात का गं कधी, दैनंदिन आठवणी ? तुम्हाला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून, मनातला गोंधळ लपवण्यासाठी बसलीये सजून-धजून. आई ह्यातलं काहीच मला तुला येणार नाही सांगता, बघ ना किती मोठी झालेय, तुझ्या अंगणात रांगता-रांगता ! घेऊन चाललीये मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई, अंगणातलं चाफ्याचं झाड मात्र कधी तोडू नकोस गं आई. जेंव्हा जेंव्हा त्या झाडाखाली, तू उभी राहशील, फुलांच्या मंद वासांतून तू पुन्हा मला अनुभवशील. सुखानी म्हणो, वा दुःखाने कधी माहेरी ही पोर आली, असु दे तिच्यासाठी जागा, त्या चाफ्याच्या झाडाखाली.......! ©विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶) #sad_shayari #VivekKanhekarWrites मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेम निरोप समारंभ मराठी कविता
#sad_shayari #VivekKanhekarWrites मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेम निरोप समारंभ मराठी कविता
read moresurajkumaregoswami
आयुष्यातील तुझ्या आठवणी माझ्या जगण्याचा श्वास आहेत क्षणोक्षणी तुझी आठवण म्हणून जगणं आणखी खास आहे.. ......... ©surajkumaregoswami मराठी प्रेम कविता कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस
मराठी प्रेम कविता कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस
read moreकाव्यात्मक अंकुर
निकट निर्मळ झाले मन मोकळे झाले बंध गुंतागुंतीचे नाते तोडून निकट झाले संबंध ©काव्यात्मक अंकुर #निकट #निर्मळ #नाते #संबंध #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #Love #marathi #Relationship छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कव
#निकट #निर्मळ #नाते #संबंध #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी Love #marathi #Relationship छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कव
read moreDevanand Jadhav
मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस लव्ह स्टेटस
read more