Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाटते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाटते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसैन्यात का जावेसे वाटते, वाटते का, आमदार जलेसर का वाटते, का वाटते, भिती का वाटते,

  • 19 Followers
  • 66 Stories

Shankar Kamble

शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा
परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा..

थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी?
गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी..

पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे
दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे?

सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा
कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा..

हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा
पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा..

निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे
वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे?

©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम

sandeep wagh

नाही बोलायचं ठरवलं,तरी पण...
रोज रोज बोलावंसं च वाटत......
काय आहे तुझ माझ नात.......
खरच..मलाच कळत नसत....!
sandeep wagh #ठरवल्यावर  #पण  #तुलाच  #बोलावं #वाटते #मन 
#Confusion

Sagar Anant Jog

read more
"रोज रात्री पपांना मी मम्मी वाटते"
तुमची मुलगी असूनही 
ही भीती का माहिती 
मला का वाटते......


तुमच्या शुक्राणूच्या पूर्तिमुळे 
हे जिवन मला मिळाले आहे 
स्त्री फक्त बलात्कार घडून आणण्याचा "साधन" 
हे मात्र मला आता कळले आहे.......


आज कुठल्या परक्या माणसासोबत मैत्री करने 
हे माझी चुकी असू शकते 
ही खंत मी आता 
माझ्या मनात बाळगत आहे......

कारण पुरुष हा प्राणी 
हवस वृत्तीचा असतो 
याची सांगड माझ्या विचारांनी 
माझ्या हृदयाशी घातली आहे ".......

जरी ही कोणा एकाच्या 
हातुन वाचली तरी
दुसरा नराधम भर रात्री कोठेतरी लपुन
माझी वाट बघत आहे
पण या हरामखोरांच्या अश्या वागण्यामुळे
मुलींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे........

कोण सांगेल यांना की
यांच्या अश्या वागण्यामुळे 
समाजावर आघात होत आहे
पण हा क्रूरी बाप तर
तिचा जन्म होताच तिच्या
ईज्जतीची फिकर करुन  
तिचा गळा दाबुन
तिला मारत आहे...........


Stop child abuse.....


- सागर अनंत

Meena

read more
मनातले सारे बोलावं वाटते

       भाव ते इशाऱ्याने समजावे वाटते

        बोलून सारे दाखवावे वाटते

       का कोणास ठाऊक जगात एकटेच आहोत असे वाटते

       बोलायला वेळ नसतो,क्षण भर विसावा हा झोपेचा असतो

          जिवनात काहितरी राहिले आहे असेच वाटते

           गुंतले माझ्या साठी, आणि मीच नाही

           मांडून बसले पसारा ,खेळायला सोबत कोणीच नाही

          थोडासा जीव मुठीत, कोपऱ्यात बसून राहिला

          त्याला रंगवताना हात ,कोपरा भर रंगला

         कसे कळेना ,स्वप्न नको मला 

         सत्यातली  साथ  हवी मला

         भातुकलीचा खेळ नको मला

        तुझा हात हाती हवा...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile