Find the Latest Status about a hindi poem on father from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, a hindi poem on father.
Nojoto Hindi (नोजोटो हिंदी)
Amit Kumar
shabdakar_poems
हसू लागलो रडू लागलो दिवस एकटा मोजू लागलो उडून गेल्या मुक्त पाखरणची उगाच अपेक्षा करू लागलो पैसा झाला मोठा नाही अर्थ रक्ताच्या नात्याला जन्म घेतला म्हणून लावला नायतर बाप ठेवला नावाला लांबलाय रस्ता चालायला पैशांची काठी आधाराला नाही जमलं पण पैशाला कसं थांबवणार झुरणाऱ्या मनाला बांधून नवीन घरटं पाखरं लागली संसाराला नाही अपेक्षा फार माझ्या फक्त एकदा हाल विचार या बापाला जपली तळहाताच्या फोडासारखी वाढवली जी फुलासारखी केला प्रयत्न बोलायचा तर बोलू लागली न बोलल्या सारखी झालीय सवय आता या अंधाराची या भिंतीची या आसवांची नाही इच्छा आता पुढच्या प्रवासाची डोळ्यात आस आता परतीच्या प्रवासाची -वैभव शेळके बापाच एकटेपण।मराठी कविता।marathi poem on father #मराठीकविता #father #baap