Find the Latest Status about नवे गाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नवे गाने.
Vilas Bhoir
नवी नवी नवलाई ओठी आनंदाचे गाणे नवीन आले हे वर्ष जाईल का रे सुखाने एकामागे एक प्रश्न किती शोधावी उत्तरे संकटातल्या चाहुलीचे मागचे ते वर्ष सरे नववर्षाच्या येण्याने विश्व अंबरी उजळु दे सुख समृद्धी आनंदाचे स्वप्न रंगांनी भरू दे त्याच त्या आठवणींना थोडासा विसावा देऊ नवीन या स्वप्नांनी उत्तुंग भरारी घेऊ गतकाळाचा डोई भार विसरून जाऊ निराशा रुपरंग नवे नवेसे नव्याने जागवु आशा ~ विलास भोईर ( नवे वर्ष नवी आशा ) ©Vilas Bhoir नवे वर्ष
Komal Barge
हरवल्या वाटा, हरवले सर्व, कसे सुरू करावे आता नवे हे पर्व.. चुकताना पडलो, पडताना हरलो, पण त्यातून ही सावरायला लागलो.. दिशा हरवली, हरवले सर्व, कसे सुरू करावे आता नवे हे पर्व.. आयुष्याच गणित सोडवायला गेलो, सोडवता सोडवता मात्र एकटाच राहिलो... सुचत नव्हत काही आठवतंच राहिलो, हे करताना भावनांचे बंध विसरून गेलो.. नाही कोण सोबत हे सांगत राहिलो, नव्या पर्वाचे शोध स्वतः मध्ये शोधात गेलो.. हरवल्या वाटा, हरवले सर्व, कसे सुरू करावे आता, नवे हे पर्व.. ©Komal Barge नवे पर्व #Rose
Komal Barge
#IndiaFightsCorona पिढी न पिढी बदलत गेलं, नव्या सुविधाचं जग आलं... सांगावा सांगण्यासाठी केला कबुतराचा वापर, ते जाई लोकांकडे आरपार.. ते बातमी जगभर फिरवत गेलं.. दिवसेंदिवस शोध लागत गेला, त्यानंतर टेलिफोन आला.. लांबूनही आपल्या माणसांचा आवाज ऐकायला मिळाला... दिवसेंदिवस प्रगती झाली, त्यातूनच मोबाईल ची उन्नती आली.. जग बदलत गेलं लोकांच्या सुविधेसाठी, पण लोक वापर करत्यात स्वतःच्या टाईमपास साठी... असं कसं हे कलियुग आलं, भल्या -भल्यांना बदलून गेलं.. ©Komal Barge नवे शोध #IndiaFightsCorona