Nojoto: Largest Storytelling Platform

New माय मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माय मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माय मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

माय मराठी #poem

read more
*मोहरली लेखणी साहित्य समुह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:-माझी माय मराठी*
*काव्यबत्तीशी काव्य*
*वर्णसंख्या:-७/९/७/९*
-----------------
माझी माय मराठी
सर्व भाषेत ही *सुंदर,*
कित्येक बोली भाषा
सजले *अलंकार.*

लेखणी साहित्याची
शब्दांतून ही *प्रगटली,*
उमलते भावना
अलंकारात *बहरली.*

जगाच्या पाठीवर
अटकेपार *फडकला,*
आपुल्या मराठीचा
साहित्यात गौरव *झाला.*

कथा कविता आणि
गवळण शाहीरी *बाणा,*
जुगलबंदी रंगे
लावणीचा हा *नजराणा.*

उधळण करावी
मायबोलीवर *फुलांची,*
उंच भरारी घेत
माय मराठीच्या *प्रेमाची.*
-------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke माय मराठी

vishnu thore

माय मराठी....

read more
 माय मराठी....

कवी - के. गणेश

माय मराठी

read more
कागद नाही
पेन नाही,
उमटू लागल्या
ओळी..
साता समुद्राच्याही
पार
माझी मराठी
चारोळी..!

@kganesh माय मराठी

Rajashri Kokane

माय मराठी #@

read more
फुल

फुल  फुल फुलले गंध परिमळे 
रंग रंग नयनाने न्याहळले 

हळूवार वारा गात स्वरांना 
घालितो साद बंद हृदयानां

पायाखाली मखमल तृणांची 
स्मृतीनां त्या गोडी अमृताची

हात तुझा तो हाती अलगद
फिरावे मोरपीस मनावर जलद
                     राजश्री कोकणे@ माय मराठी #@

Rajashri Kokane

माय मराठी

read more
रात्र काळी नित निराळी 
रंग उधळते कातरवेळी
संग ना कोणी मन मुराळी
मौनात वाजते कृष्ण बासरी माय मराठी

Rajashri Kokane

माय मराठी

read more
मुक्ती 

आज मुक्त आहे येथे मी 
ना आसक्ती कोणती आहे जेथे मी
जाणले सर्व काही जाणण्यास योग्य 
तरी झहाले रिते मी ना राहीले कही संगती 

आले कोठून जाण्यास कोठे 
गोलच आहे जाणले त्या बिंदूठायी 
जेथे जोडले प्रथम आणि शेवट बंथ श्वासाठायी 
कोंडला श्वास केला मी मुक्त आनंदाच्या मोहासाठी माय मराठी

Rajashri Kokane

माय मराठी #poem

read more
पाऊस 
  
पहिलाच पाऊस पहिलाच थेंब 
मंद मंद वाऱ्यावरी इवलेसे कोंब
मातीच्या सुगंधाने मन ओलेचिंब 
बरसले  डोळे गाली ओघळले अश्रुथेंब

परतआठवांचे घालमेल चाले मना
चिखलातील रूतलेले पाऊलखुणा 
परत परत परतुनी पाहिल्या येताना
बरसणारी सर नेईल वाहुन मनीच्या मर्मखुणा माय मराठी

शुभम दि. कांबळे

माय मराठी

read more
हजार भाषा येती,
हजार भाषा जाती,
जीव जळतो फक्त,
माझ्या...
मायबोली मराठी साठी...

मधाहुनही अधिक गोडवा,
आहे जिच्या मध्ये,
कित्येक नात्यांना सांभाळण्याची,
ताकत तिच्यामध्ये,
जीव जळतो फक्त ,
माझ्या...
मायबोली मराठी साठी...

                    - शुभम दिपक कंबळे माय मराठी

कवी - के. गणेश

माय मराठी..

read more
माय मराठी..

माय मराठी माझी
शब्द सोनियांची खाण,
खोल अबोल भावनांची
माय मराठीला जाण..

माझ्या माय मराठीने
कैक चढउतार पाहिले,
किती पिढ्यांचे दुःख
शब्दा शब्दांतून वाहिले..

इथं दुःखानं भरलेली
जेव्हा ओंजळ सांडते,
माय मराठी माझी
कशी कवितेतून भांडते.!

                               @kganesh माय मराठी..

Rutuja kalkate

माय मराठी

read more
महाराष्ट्राची शान मराठी
महाराष्ट्राचा अभिमान मराठी
चंद्रहूनही शीतल मराठी
सुर्याहूनही तेजस मराठी
साद मराठी नाद मराठी
भाषांमध्ये अभिजात मराठी

शिवरायांच्या पराक्रमात मराठी
शम्भूराजांच्या पोवाड्यात मराठी
कित्येक शूरवीर घडले जेथे 
 ती हीच आमुची माय मराठी

काळ्या मातीचा सुवास मराठी
इंद्रधनुचे सप्तरंग मराठी
सह्याद्रीच्या कडेकपारीत
नाद घुमतो फक्त मराठी...

कवींच्या अलंकारात मराठी
ध्येयवेड्यांच्या रक्तात मराठी
कुसुमाग्रजांच्या 'कणा'त मराठी
खान्डेकरांच्या लेखनात मराठी

जिजाऊंच्या संस्कारात मराठी
सावित्रीच्या लेखणीत मराठी
बहिणाबाईंच्या काव्यात मराठी
रमाबाईंच्या संघर्षात मराठी

लोकमान्यांच्या 'केसरी'त मराठी
विवेकानंदांच्या चरित्रात मराठी 
आंबेडकरांच्या संविधानात मराठी
क्रांतिकारकांच्या वीरतेत मराठी 

अवघ्या जगात विख्यात माझी माय मराठी
महाराष्ट्राच्या अस्मितेत मराठी
मनामनात गुंजन करते मराठी

मायबोली समृद्ध करणाऱ्या
अवघ्या पुत्रांच्या 
जीवनात  मराठी
वर्णिता जिला शब्द अपुरे पडे मजला
अशी आम्हास लाडकी हि मराठी
खरोखर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
~ऋतुजा काळकाटे माय मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile