Nojoto: Largest Storytelling Platform

New असे वाटते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असे वाटते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असे वाटते.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#romanticmusic या जगामध्ये प्रत्येकाला असे वाटते मलाच आहे ओ दुःख #मराठीविचार

read more

अल्पेश सोलकर

असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी..🥰

read more
एकांत क्षणी .. कधी तरी ..अस वाटत.
इकडे मी, मध्ये लेखणी, आणि तिकडे, तू, असावी
जी मला प्रेरणा देणारी ,माझ्या लिखाणावर प्रेम करणारी. 
प्रेमाने कौतुक करणारी..आणि मनाला लागणार असेल तर..
पटकन डोळे भरून घट्ट मिठी मारणारी...
..असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी.. असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी..🥰

Jk

#Dream असे वाटते मज #JKpoetess #मराठीकविता

read more
असे वाटते मज 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

झुळझुळणाऱ्या त्या झऱ्यांचे 
खळखळणारे पाणी पाहून 
किलबिलणाऱ्या पक्षांसोबत 
नाचनाचूनि गाणे गाऊन 
दूर सारेन पर्वत सारे 
जे देती मजला ललकारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

फेसळणाऱ्या त्या लाटांचा 
अथांग असा हा सागर पाहून 
सागरातील माशांसोबत 
हितगुज सांगून जावे वाहून 
दूर सारेन तुफान सारे 
जे रोखतील माझी वाट वाहणारी 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांचा 
चमचमणारा रुबाब पाहून 
आकाशातील ताऱ्यांसोबत 
जावे चमकून, त्यांच्या सवे राहून 
दूर सारेन तो धूमकेतू 
जो रोखेल माझी वाट चमचमणारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

 - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #Dream 
असे वाटते मज 
#jkpoetess

Mrunali Parkar

तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.

read more
काळोखी रात्र आहे... तरी  चांदण्यांची साथ आहे.. 
निरव शांतते सोबत मंद वारा गात आहे.. 
तुझी सोबत आणि, हाती तुझ्या माझा हात आहे. 
निशब्द मी आहे... निशब्द तू आहेस. 
तुझ्या डोळ्यातील प्रेमळ भाव.. घेतो माझ्या मनाचा ठाव आहे. 
उजळू लागलाय हळू हळू तो चंद्र ही.. जो आपल्या नात्याचा साक्षीदार आहे.. तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.

SP

असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉 #poem

read more
असे वाटते उडत राहावे 
उडताना मला कोनिणा पहावे
त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख
उडून सारे शहर फिरावे....

असं वाटते उडत राहावे 
फुलपाखरू होऊन बाग फिरावे
त्याचे काही रंग घेऊन 
जीवनही रंगून जावे....

असे वाटते उडत रहावे 
पाखरू होऊन रान फिरावे
पाहता सौंदर्य वनाचे 
मन गहिवरून यावे....

असे वाटते उडत रहावे
सारंग होऊन जग फिरावे 
पाहता साऱ्या डोंगर दऱ्या
छोटे छोटे ते क्षण टिपावे
असे वाटते उडत राहावे 
उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे 
उडताना मला कोनिणा पहावे.....
लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का असे वाटते मला,अंधारलेल्या जगी माझ्या,
लेखणीच्या प्रकाशाचा एक कवडसा आला.
त्याच प्रकाशाचे दिशेने वाटचाल करीत,YQ चा मंच गाठला.
का असे वाटते मला,
शक्य नव्हते कधी मी लिहिणे,तरी एक प्रयत्न केला.
तुमची सोबत म्हणूनच इथं पर्यंतचा प्रवास झाला.
का असे वाटते मला,
अशीच सोबत तुमची नेहमीच मला लाभावी,
तुमच्या मुळेच मला ही लेखनाची आवड असावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का असं वाटते मला..
#काअसंवाटतेमला

हा विषय
Swati kannake यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaboratin

read more
पाहताना तुला,नेहमीच मला असे वाटते,
जसे सौंदर्य तुझे दिवसेंदिवस खुलत जाते.
मनाला भावतेस तु,खुप आवडतेस तु,
चोरून पाहताना तुला,अतिसुंदर दिसतेस तु. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पाहताना तुला...
#पाहतानातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaboratin

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते. #मराठीकविता

read more
चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते. #मराठीकविता

read more
डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते. ते नयनरम्य दृष्य पाहून असे वाटते की, फेसळलेल्या दुधाचे तुषार उडत आहे. 

चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते.

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते. #मराठीकविता

read more
चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile