Nojoto: Largest Storytelling Platform

Best असे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसेम्बली भाषा क्या होती है, असेंबली क्या होता है, असेंबली क्या है, असेम्बली भाषा है, असेंबली का हिंदी अर्थ,

  • 45 Followers
  • 149 Stories

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                             मित्रहो, आपण जर एखाद्या विषयावर वारंवार  संकल्प घोषणा करीत राहीलो तर त्याबाबत काही भरीव कार्य  होत असल्याचे वातावरण तयार होते. या संकल्प इरादा म्हणजेच संकल्पपूर्ती असे साध्या भोळ्या समाजातील मोठा घटक मानू लागतो. केवळ घोषणा म्हणजेच कृती असे चित्र तयार होते. विद्यमान सरकारनेअशा घोषणांचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे सरकार असंवेदनशील वाटण्यापेक्षा संकल्पशील असण्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे गेल्या  ३-४ आठवड्यातील सरकारी घोषणातून दिसून आले आहे. अॅड. के. एम. सूर्यवंशी

Yogesh Hiwrale

एक आठवण रोजची

read more
"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी,
आठवल्या तुझ्या नि माझ्या भेटी गाठी.

पाण्याचा बहाणा करून, कशी चोर पाउलांनी 
येत होतीस.
मी दिसताच, सोबत आणलेली घागर, रिकामीच
नेत होतीस.

तू शतदा केलास प्रयत्न, माझी वाट पाहण्याचा.
तू शतदा केलास प्रयत्न, माझ्या आधी येण्याचा.
प्रयत्न तुझा फसत असे,नदी काठी तुझ्या आधी
 मीच तुला दिसत असे.

राग ही तुझा किती देखणा असायचा 
माझ्या पायात रुतलेला काटा तुझ्या डोळ्यात सलायचा
सगळं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं आज
एकटाच होतो म्हणून नदी समोर वाटली थोडी लाज

तू  दिलेली रबराची अंगठी, अजूनही माझ्या, करंगळीत आहे.
सोनंचांदी,सगळं खोटं,हीच खरी संपत्ती माझ्या ओंजळीत आहे
आता कारणमीमांसा कशाला,होईल मोकळा, कधी हा श्वास
केव्हा तरी येईल दिवस तो,हीच एकमात्र  आस " एक आठवण रोजची

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ग्रामविकास बद्दल

read more
*सरपंच कसा असला पाहिजे? 
        1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 
2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 
3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा.  शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा  ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 
4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 
5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
बरेचदा आपण एखाद्याची स्थिती बघून त्याच्याविषयी नको ते विचार करायला लागतो. तो काय करतो, कसं करतो, कशाला करतो अश्या फालतू आणि निरर्थक बाबीकडे विशेष लक्ष देत फिरतो. ह्या धर्तीवर सगळे आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. ज्याचं त्यालाच माहित असतं. तो कसं दिवस काढतो ते. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. म्हणून कुणावरही हसण्याआधी, बोट उचलण्याआधी दहा वेळा विचार करा. कारण, कधीकधी माणसाच्या आयुष्यात असे काही आघात घडतात की, अवघ जीवन बदलून जाते. आणि प्रत्येकाच्या जीवनात असे काही गूढ असतात की, तो कुणाला सांगत नाही. बरेच लोकं समोर हसतात पण डोळ्यातून निघणारे  अश्रू लपवतात. माणूस परिस्थिती पुढे हतबल होतो. डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिजे तितकी सत्य  नसते. म्हणून कोणालाही काहीपण बोलण्याआधी खरंच विचार करून बोला. तुमच्या एका शब्दामुळे समोरच्याला खूप त्रास होऊ शकतो. (प्रीत )

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
आपल्याला आपली दुःख नेहमीच खूप मोठी वाटत असतात. आणि त्यामुळे आपण भरपुर तक्रारी सुद्धा करत असतो आपल्या आयुष्याबद्दल. परंतु हे असे काही चित्र येतात डोळ्यासमोर आपल्या जीवनात की, 
आपले दुःख त्यासमोर क्षुल्लक ठरतात. आणि 
असे चित्र आपल्याला काही काळ तरी 
आपले दुःख विसरायला भाग पडतात. कारण, 
आपले दुःख त्यांच्या दुःखासमोर फिके पडतात.. 
(प्रीत )

Keshav Suryavanshi

read more
माझे मत--माझे विचार                                                     मित्रहो,मी प्रथम इस्रोच्या संशोधकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.त्याचबरोबर चांद्रयान पाठविण्यापूर्वी सदर कसोटी उपक्रमासाठी , शुभ वेळेचा मुहुर्त पाहून ,चांद्रयानाला हार घालून, नारळ फोडून पूजा केली.ही अंधश्रध्दा नव्हे काय! असे हास्यास्पद कृत्य, वैज्ञानिकांच्या बुध्दीमत्तेचे तथा त्यांच्यातील  क्षमता विषयी संशय निर्माण करणारे आहे असे मला वाटते अॅड.के.एम. सूर्यवंशी

Vilas Bhoir

बंध नात्यातले!

read more
आठवणारे क्षण असे
धुक्याने पांघरलेले होते,
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते!   

कधी थोडं येईल सुख 
कधी थोडं येईल दु:ख
आठवणींचे असे कोडे 
मनामध्ये फिरत होते, 
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते ! बंध नात्यातले!

Meena

एक खिडकी तीला खंत आहे त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्या खिडकी समोरून कामावरून घरी जात असतात. मग विचार असा आहे की , वडील किंवा ती का भेटत नाही ' संवाद ' हे कारण. आहे म्हणजे, लेक घरी असताना खुप लाडाची असते

read more
लेक...... एक खिडकी
तीला खंत आहे 
त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही
ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते 
ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्या खिडकी समोरून कामावरून घरी जात असतात.
मग विचार असा आहे की , वडील किंवा ती का भेटत नाही
'  संवाद ' हे कारण. आहे
म्हणजे,   लेक घरी असताना खुप लाडाची असते

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile