Find the Latest Status about गुळाचा गणपती या म्हणीचा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुळाचा गणपती या म्हणीचा अर्थ.
Durga Deshmukh
*बाप्पास निरोपाचं पत्र* गणपती बाप्पा मोर् या पुढच्या वर्षी लवकर या असा निनाद आज सकाळपासुन कानात घुमत आहे • आज सकाळपासुन सगळ्याची लहान मोठ्याची, घरादारात गणपती बाप्पा तुम्हाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच धामधुम सुरु आहे. कोणी तुम्हाला गाडीत बसवण्यासाठी गाडीची सजावट करत आहे. गुलाल उधळण होत आहे. तर कोठे तुम्हाला तुमचे आवडते मोदक तयार होत आहेत. आज तुम्ही एक वर्षासाठी आमच्या पासुन दुर जाणार खर तर तुम्ही येऊन दहा दिवस झाले. तुमच्या सोबतचे हे दिवस किती आनंदात गेले. रोज तुम्हाला मोदक तयार करणे तसेच तुमचे आवडते फुल तुम्हाला देणे. जसे काय तुमचे सर्व लाड पुरवण्यात दहा दिवस संपुन गेले. तुम्ही घरात आल्यावर खुप आनंदाचे वातावरण तयार झाले होते .सर्व वाईट विचार संपले होते मुलांना तर तुमचा खुपच लळा लागला होता. आज तुम्हाला निरोप देणे फार जीवावर येत आहे. माझ्या झाडावरची फुले तुमची वाट पहात रहातील. घरातील तुमची रहाण्याची जागा येण्याची वाट पाहिल. त्यामुळे तुम्ही लवकर या. आम्ही तुमची दहा दिवस केलेली सेवा गोड मानुन घ्या व जाताना तुम्हाला नमस्कार करत आहोत आम्हाला आशिर्वाद देऊन लवकर या. वाट पहात आहे दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गणपती बप्पा लवकर या
nitin bille
'निरोप आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
HANAMANT YADAV (कवीराज)
आरंभ तू, प्रारंभ तू। हे मोरेश्वरा, हेरंब तू। बुद्धीदायका, तू विनायका, तुझा डंका तिन्ही लोकी वाजला... घोष मोरया मोरया गाजला... मोरया... मोरया... कवीराज गणपती
Jayshree Hatagale
Waise to har roj mai aapko yaad karata hoon.... aap jab aate ho to meri khushi ka koi thikana nahi hota. aap muze bahot achhe lagate ho. aap mere friend Ganesha ho. -Sairaj #गणपती बाप्पा
R.K.
आला आला आला आपला गणपती बाप्पा आला, सारे चला नाचू गाऊ पावसात बेभान होऊ, दुनियेच्या टेन्शन ला करू राम राम, घेऊन सकाळी सकाळी गणपतीचे नाव। R.K. #गणपती #गणेशोत्सव
HANAMANT YADAV (कवीराज)
गणपती स्तवन। आरंभी वंदीतो गणा। शिवसुता तुला निर्गुना। ॐ कार रूप सगुणा। गौरीनंदना।। धृ।। इया कार्याची सिद्धी। तुची देई बा बुद्धि। व्हावी लेखनास वृद्धी।तवकृपेने।।१।। ऐसा मांडीला अट्टहास।देई दृष्टि पामरास। अज्ञानाच्या महामेरुचे।अज्ञान संपवावे।।२।। कवीराज तुझाचीअंश।मांडीतो जो सारांश। द्यावा त्यास तथ्यांश। स्वहस्ते।।३।। कविराज। 8698845253 गणपती स्तवन।
Naveen Ojha
कर विनाश बुराई का बनाया जिन्होंने खूबसूरत ये जहान रहे वो सब के favourite बच्चों से भी मिला जिनको अटूट प्यार सुनते है वो विनती सदा फिर चाहें ना रखो तुम उनका मान तभी तो कहलाऐ गणपति बप्पा वो सबसे महान।।। गणपती बप्पा
Ritika Waghamare
तूच परिपूर्ण आहेस आम्हांस एक वरदान, नाही आम्हांस कोणतीच उपेक्षा स्वःस्वरूपी दर्शवतोस जीवन जगायचे रहस्य , नाही मनी आता कोणताही उन्माद विशाल कान जणू आम्हांस जाणवती ग्राहयशक्तीची जाण तीक्ष्ण , सुंदर नैन भासी जशी तीक्ष्ण अन्वेषी दृष्टि विशाल महाकाय अन् सवारी मूषक सांगती अंकुश ठेवण्यास या चंचल जीवनास एकदंत वक्रतुंड नाव अनेक पण तूच एक सुखकर्ता घंटी वाजे मंदिराची पण तू तर निद्राहीन आहेस भोग भोगायास आले मनुष्यास केलेल्या पापाचे परतफेड म्हणूनि पाहावयास मिळतो निसर्गाचा रौद्रवतार आता तरी बुद्धी दे रे गणराया, रक्षा कर रे तुझ्या भक्तांची विनाश कर या राक्षसवृत्तीस घेऊनि तुझे मनुष्यरूपी अवतार हे विघ्नहर्ता, माझी तुझ्यावरती श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही विश्वास आहे माझा पण अविश्वास नाही हे गणपत्ती बाप्पा , रोज कोटी भक्त तुला घालती लोटांगण त्यात माझी भर कुठे, म्हणूनी एकच मागणे बुद्धी दे रे गणराया तुझ्या या भक्तांस माणुसकीची जाण होऊ दे प्रेम आनंद , सुख याचा वर्षाव होऊ दे संकटास सामना करायचे बळ येऊ दे सृष्टीची निर्मीती पुन:प्रस्थापित लाभो दे नात्यात गोडवा अन् शत्रूततेचा ऱ्हास होऊ दे एवढेच मागणे निरंतन बुद्धी दे रे गणराया अन् बुद्धी दे रे गणराया. - रितीका वाघमारे # गणपती #ganesha
NEERAJ SIINGH
चले आते है मेरे भोले जब जब पुकारा कभी राम कभी कृष्ण कभी गणपती कभी शक्ति बनकर प्रेम ऐसा की बच्चों को कभी रुकने झुकने नहीं देते हर वक्त साथ खड़े हैं वो रहते है प्रेम को अनूठा शिव से कौन जाने चाहे लाख़ खड़ा हो जग रूठा एक शिव के प्रेम में ये जग झूठा जलती है लौ एक अंदर शिव की जो इसे समझें वो है प्रेम में #neerajwrites गणपती