Nojoto: Largest Storytelling Platform

New देखिला डोळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देखिला डोळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देखिला डोळा.

Related Stories

    LatestPopularVideo

Mohan Somalkar

# डोळा #मराठीकविता

read more
डोळ्यात माझ्या भाव नवे...
ममता मायेची
गोड किती..!
पशुपक्षात दिसे
वात्सल्य प्रिती. !

डोळ्यात माझ्या भाव नवे
 प्राणिमात्रांत प्रेमळभाव !
माणसात कधी कधी
वाटे  त्याचा अभाव.!


आईच्या ह्रदयाला 
कोणत्याही पाझर फुटतो
जीव आपल्या पिल्यासाठी
प्रत्येक वेळी तळमळतो.!

जीव गुंतलेला 
काळजी मग तिचे रडते
पिल्यासाठी आई
बघा किती धडधडते..!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar # डोळा

Mrdurga rox

हमका देखिला ना,,,,, #Trending #trendingreels #viralreels #ViralVideo #viral #trendingaudio #कॉमेडी

read more

vishnu thore

रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू #nojotophoto

read more
 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू

अल्पेश सोलकर

नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

read more
नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल....पण
त्यादिवशी मला
 शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस..
 नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल..
पण
त्यादिवशी मला शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

vishnu thore

सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने #sharadpurnima

read more
सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने
दिला सोबत पहारा
लाट सुनामी झाल्यावं
नदी शोधते किनारा

लाज लाजते लाजेला
कुठे लपवावा डोळा
पैंजनाच्या चाहुलीने
जीव होतो येडाखुळा

रात पेंगत चालली
कूस झाली भरजरी 
जिथे विसावले श्वास
तिथे वाजल्या सतारी
-विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने

Santosh Jadhav

#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्

read more
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला
उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी
हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला 
स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी
लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा
तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी
खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी
कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! 

जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी 
आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी
तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट 
रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... !
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan
#आठवते का ताई तुला?
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्

vishnu thore

कुण्या लाजेच्या खातीर अशा जळत्या दुपारी कोण चालला फकीर गर्द उदीच्या वासाने लागे मनाला उकिर ऐन निजेच्या वख्ताला #मराठीकविता #AkelaMann

read more
कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला
डोळा कुरवाळे जाग
कोण दाराच्या आडून
घेते चाहुलीचा माग

भिक्षा सांडली झोळीत
पुण्य कुणाच्या नशिबी
देवा तुझ्या दलालाला
कसे म्हणावे हिशोबी?

हट्ट शाबूत ठेवतो
आसक्तीची दाहगाथा
स्पर्श संयमाच्या पुढे
उगी टेकवतो माथा

मन गारुड भयाचे
त्याला सोसवेना डंख
कुण्या लाजेच्या खातीर
त्याला फुटतात पंख
        -विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला

sandy

🤔 मन 🤔 काय करावं ह्या मनाचं काही कळत नाहीं... वया सोबतं रहायला याला जमतंच नाही... चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं... #story #nojotophoto

read more
 🤔  मन 🤔

काय करावं ह्या मनाचं 
काही कळत नाहीं...
वया सोबतं रहायला 
याला जमतंच नाही...
चाळीशी पर्यंत कसं 
सोबत  असायचं...

Prerana Jalgaonkar

बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे

read more
मध्यरात्र(लेख👆) बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे

Prerana Jalgaonkar

बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे

read more
मध्यरात्र(लेख👆) बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile