Find the Latest Status about ती वाचताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ती वाचताना.
sneha sadashiv parit
ती ....... गीत व्हावे तुझ्या जीवनाचे , कळी तू जशी उमलावी फुलासारखी नवी पहाट ही नव्या किरणांची तुझ्या अंगणी, स्वप्नही तुझे उमलावे नभासारखे, ओंजळ ही तुझी भरून वाहू दे अफाट स्वप्नांची, मुक्त होऊ तू स्वच्छंदपणे पाखरासारखी घे भरारी नभात ही अशी गरुडासारखी, घे फिरुनी स्वप्नाच्या नगरी परी बनूनी जगूनी घे जरा प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठीचा चुकु नको तू अशी, तुझ्या वागण्यामध्ये ही करू नको तू परिभाषा सुखाची कधीही न उलगडणारी....... ती....
Sachin Gharat
मंद झुळूक वाऱ्यासारखी शुभ्र बरसणाऱ्या झऱ्यासारखी निर्मळ वाहणाऱ्या सरितेसारखी पहाटेच्या सोनेरी किरणांसारखी पौर्णिमेच्या रुपेरी चंद्रासारखी अळवावरच्या दवासारखी ती यायची अन् निघायची सहवासाचा सुगंध असाच दरवळून जायची :- सच्चू ती....
hitesh savale
ती हो म्हणाली तर.. श्वासात ऑक्सिजन चा भास होईल.. ती हो म्हणाली तर.. हृदयातील ठोके अधिक जाणवतील.. ती हो म्हणाली तर.. अमावस्येला जणू चंद्राची कमी नाही भासणार.. ती हो म्हणाली तर.. रात्रीला झोप कमी अन तुझी आठवणच जास्त येईल.. पण... #ती
SMITA DUMBRE
#5LinePoetry जो उनकी आँखो से बायान होते है .... वो लफज शायरी में कहा होते है..... ©SMITA DUMBRE #ती
Monica Bora
ती प्रत्येक मनाचा एक कप्पा फक्त तिच्यासाठीच असतं प्रत्येकाच्या हृदयावर हक्क तिचाच जास्त असतो थकलेल्या मनाला विसावा तिथेच मिळतो भरकटलेली म्हणे तिथूनच सावरतात तीच्या सहवासाने अश्रूचेही मोती होतात प्रसंगी असंख्य प्रश्न सोडवणारी ती एक वटवृक्ष पण होते ती खरच जेव्हा निस्वार्थ असते तेव्हा दगडाचाही हिरा होतो ज्याला तिची सोबत मिळते त्याचा देवालाही ठेवा होतो पण जर ती स्वार्थी असेल तर माणूस स्वतःपासून दुरावतो जीवनाचा खरा आनंद त्याच्यासाठी मृगजळ ठरतो खरंच नशीबही नतमस्तक होते जिथे खरी मैत्री असते जी स्वतः वटवृक्ष बनून खऱ्या मैत्रीला जगवते. ©Monica Bora ##ती
Archana Deshpande-Pol
ती उदास होते थोडी परि पुन्हा नव्याने हसते आशेच्या किरणांसंगे ती स्वप्नं उद्याचे बघते. ती होते उधाण वारा ती होते लुकलुक तारा ओठात माळूनी गाणे पसरवते गंध पसारा. रंगात रंगुनी जाते स्वप्नांना कवेत घेते ती लहरत वाऱ्यावरती आभाळी विहरुन येते. काळोख्या काजळ रात्री ती लख्ख काजवा होते मिणमिणत्या अंधाराला ती तेजाळत मग जाते. ती स्वप्न उद्याचे जगते. ओठावर हसरे गाणे काळाच्या पडद्यावरती ती भविष्य रेखत जाते. राखेतुन पेटुन उठते ती होते भगवी ठिणगी ती विझल्या डोळ्यांमधल्या स्वप्नांना फुलवत जाते. सांजेला मावळताना ती मशाल घेते हाती ती आशा.. स्वप्न उद्याचे.. भाळावर मिरवत येते. ©अर्चना देशपांडे पोळ. ती..