Find the Latest Status about माळ लोळती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माळ लोळती.
उमा जोशी
तुटलेली मौतिक माळ सगळे मोती ओघळले मी ओवायाला जाता सारेच पुन्हा ते गळले एक एक मोती म्हणजे दवबिंदू आठवणींचा विरघळून मोती गेले पडता किरण प्रकाशाचा गोठले हुंदके जेथे पाऊल स्मिताचे पडले त्या हलक्या स्मित रेषेने दुःखाचे काटे गळले मी डाव मांडुनी बसले भूतभविष्याचा सगळा एक एक करून सारे हे अनुभव झाले गोळा ओवून तयांना साऱ्या मी पुन्हा माळ बनवली तेव्हा इतके हे घडले भेळ अनुभवांची झाली ०६/११/२०२२ @ १९:०० ©उमा जोशी #उद्धववृत्त २-८-४ #माळ
vidya,s world
मन माळ रान.. ओलावा शोधत फिरते.. स्वार्थी या जगात.. निस्वार्थ नजर एक शोधते.. कित्येकदा फसते .. घायाळ होऊन बसते.. तरीही नव्या उर्मिने पुन्हा.. वाऱ्यावर सैर पळते.. मन माळ रान... ओलावा शोधत फिरते.. जुळते अन् जुळवून घेते.. ममतेसाठी झुरते.. प्रेमासाठी आसुसते.. कधी वेडे ,कधी शहाणे.. करते कित्येक बहाणे.. कधी हळवे हळवे.. कधी शीळे हून कठोर.. रंग मनाचे आगळे... आपलेच हे तरीही.. आपल्याहून वेगळे.. मन माळ रान.. ओलावा शोधत फिरते.. स्वार्थी या जगात.. निस्वार्थ नजर एक शोधते.. .... विदया ©vidya,s world मन माळ रान... #SAD
pooja d
तो माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणे,, 108 मण्याची माळ जपतो म्हणे..... Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी
Vinod Umratkar
तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine
pooja d
मण्याची माळ मोजताना मी होत पाहिलेलं,, तुझ्या व्रत, वैकल्याच आत्ताच कळलं...... तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine
अल्पेश सोलकर
अश्रूंची माळ जीवनाच्या गळ्यात कायम असते.. कधी सुखाचे तर दुःखाचे बनून आयुष्याला जगणं शिकवून देते सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे विषय : "अश्रूंची माळ" #अश्रूंचीमाळ हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #collab #yqtaai
sandy
आठवणींना जीवापलीकडे जपलंय... त्यांना मोत्यांसारखा, आयुष्याच्या धाग्यात विणलंय !!! एक तरी चकाकला, की बाकीचे पण आकर्षीत करतात... या माझ्या
अल्पेश सोलकर
देणार्याने देत जावे..... - विंदा करंदीकर (पूर्ण कविता caption मध्ये 👇) देणार्याने देत जावे देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी
Prerana Jalgaonkar
संध्याकाळ होताच खिडकीतून पहायचं चिंटूकल्या पिंटूकल्या इमारतीतल्या, क्रेनच्या दिव्यांनी आभाळ चमकून जातं... संध्याकाळ जसे गडद रात्रीचे रूप घेते तेव्हा ते दिवे आणखीन चमकत राहतात... एक लुकलुकणारा दिवा पाहिला की नजर लागलीच दुसऱ्या दिव्यावर गेलीच पाहिजे... कोण जाणे चिंटूकले पिंटूकले टीमटीमणारे दिव्यांची ती माळ जणू मला त्याच्या आठवणींसमान वाटतात.. तो सोबतीला नसतानाही त्याच्या आठवणी दिव्यांप्रमाणे माझे मन लख्ख करून जातात... --प्रेरणा #आठवणी1 #yqtaai #bestofyqmarathiquotes #kavita #marathikavita #आठवण संध्याकाळ होताच खिडकीतून पहायचं चिंटूकल्या पिंटूकल्या इमारतीतल्या