Nojoto: Largest Storytelling Platform

New दादोजी कोंडदेव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दादोजी कोंडदेव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दादोजी कोंडदेव.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा #शिवजयंतीच्या_शुभेच्छा

read more
१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी वर शिवतेज जन्मले,
शिवाई देवी वरून नाव त्यांचे शिवाजी ठेविले.
पिता शहाजी राजांकडून,राज कारभार,रणनीती संबंधी मार्गदर्शन लाभले,
तर सत्तेविरुद्ध आवश्यक शिस्तीचे शिक्षण माँ जिजाऊंकडून मिळाले.
शिक्षण,युद्धकला,राजनीती शास्त्र चे धडे दादोजी कोंडदेवांकडून मिळाले,
तर संत तुकाराम महाराजांकडून अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले.
स्वप्न पाहिले जे हिंदवी स्वराज्याचे,ते प्रत्यक्षात ही उतरविले,
कमी मनुष्यबळ तरीही गनिमी काव्यसह शत्रूंचे नामोहरण केले.
आदिलशाही,निजामशाही,मुघलशाही सर्वांशीच हिमतीने लढले,
आणि महाराष्ट्रात मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
.
.
ऐसा जाणता राजा माझा जो त्रिलोकी गाजला,
त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🚩🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ला झळकला १९फेब्रुवारी १६३० सालाला, जिजाऊच्या पोटी वीर बाळ शुर शिवराय आले जन्माला...! म #मराठीकविता

read more
शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

महाराष्ट्राचा आनंद मावेना गगनी
सह्याद्रीचा कानाकोपरा घुमला, 
भगवा झेंडा फडकला त्रिभुवनी 
शिवजन्माचा जल्लोष जाहला...! 

शुरवीर निधड्या छातीचे सुपुत्र 
राजे शहाजी जिजाऊचे महान,
रयतेचा वाली हिंदवी स्वराज्याचे 
आम्हाला तुमचा वाटे अभिमान...!

आई भवानीचा आशिर्वाद लाभला
सवंगडी अन् मावळ्यांसंगे खेळ,
दादोजी कोंडदेवांनी युध्दकलात
तलवार बाजीचा बसविला मेळ...!

हर हर महादेव गर्जना करुनी
पिंडीवरती रक्ताभिषेक केला,
गड- किल्ले जिंकण्याचा ध्यास 
रायगडावर झेंडा हो फडकला...!

इतिहास गौरवशाली ठरला एक
अन्यायाला वाचा शिवबा फोडणार, 
केला स्त्रीजातीचा आदर आपण
असे जिजाऊचे थोर हो संस्कार...! 

असा तेजपुंज मर्द मावळा शिवनेरीचा
घ्यावा मुजरा राजे आमचा चरणाला,
जाणता राजा प्रजाहितदक्ष शिवराय
यावे फिरुनी पुन्हा मागणे आपणाला...!

दरी खो-यातून नाद घुमे
लावली हो जीवाची बाजी,
कोटी कोटी कंठातून उमटे
जय भवानी ,जय शिवाजी...!

©Smita Raju Dhonsale शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज 

शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile