Find the Latest Status about नेला टिकट मूवी रवि तेजा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेला टिकट मूवी रवि तेजा.
Rohidas maharaj Sanap
पुण्यवंत पाताळलोकी नेला । दरीद्री तो भाग्यवंत केला । चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तीवानाचा अपमान केला ॥ १ ॥ धुंद झाला तुझा दरबार ॥ धृ ॥ वैरियासी दिधली मोक्षसिद्धी । कपटीया दिधली महानिधी । सेवकाच्या ढुंगना न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी ॥२॥ पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली । कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली ॥३॥ सत्ववानाचा बहु केला छळ । कीर्तीवानाचे मारीयेले बाळ । सखा म्हणवीशी त्याचे नाशियेले बळ । जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ गा ॥४॥ श्री हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव ) मो .9822888295 ©Rohidas maharaj Sanap #पुण्यवंत पाताळलोकी नेला