Find the Latest Status about पाऊस दिसतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊस दिसतो.
Devanand Jadhav
•पाऊस नि पाऊस• काय हो पाऊस होता तो यंदा त्यानं बळी राजाचा केला वांदा तो बसला होता डोळे लावून पण हा आला अक्कड घेऊन कुठे तो सर्वदूर बरसला तर कुठे कुठे काय रुसला कुणा देऊन गेला समाधान तर कुणाचं केलं घमासान पुढच्या फेरीत खुशीत आला सर्वदूर तो बरसून गेला बळीराजा तर हर्षून गेला नवी स्वप्ने रंगवत बसला अन् परतीचा पाऊस आला इथे तिथे तो चौखूर पडला कुठे पडला तो ढग फोडून कुठे बळीचे हृदय फाडून मात्र हाहाकार करून गेला काय तो यंदा पाऊस पडला ©•साहेबराव मुळे• बागवान नगर, शिरूर. ©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!
G.A. G.A
मोत की गाड़ी में जब भी सोना होगा न कोई तकिया न कोई बिछोना होगा बस आप जैसे दोस्तो की थोड़ीसी यादे होगी और समसान का एक छोटा सा कोना होगा © G.A. G.A दिसतो की यादे
dipak Rathod
मी पाऊस बोलतोय.... खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय, तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय, मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.... अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या, कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.... प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय..... कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय..... लेखक........ दिपक राठोड ©dipak Rathod मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal
Vishal Chavan
पाऊस... पाऊस जणू माझा, जन्मांतरीचा सखा आहे.. तरीही तो प्रत्येक वेळी, तेवढाच नवखा आहे... तसं तर मला, सगळ्याच सृष्टीचं अप्रूप आहे, पण पावसाचं मात्र, खरंच खूप आहे... पावसात मनमुराद भिजतो; गारठतो.. माझा कण कण पावसाला, कडकडून भेटतो... पाऊस पडू लागल्यावर, पावसा प्रमाणेच रडतो मी.. जे काही साठलय मनात,पाऊस पडताना बडबडतो मी... त्याला माझा दूत बनवून, मी तिच्या गावाकडे धाडतो.. तिनेच मला इकड धाडलंय हे सांगून, पाऊस डोळ्यांच धरण फोडतो. Vishaal/Aadinaath 08-07-21 ©Vishal Chavan #पाऊस
Vishal Chavan
पुन्हा पाऊस पुन्हा पाऊस झरू लागतो.. पाऊस जादू करू लागतो... मनाची सारी रिती डबकी.. पाऊस मला भरू लागतो.... पुन्हा मला पाऊस हेरतो.. पुन्हा मला पाऊस घेरतो... नव्याने आपलंस करण्यासाठी.. पाऊस मला, क्षणभर अव्हेरतो.. पाऊस खूप गोंगाट करतो.. पण मनीचे गुज ऐकून घेतो... लोक पाऊस, बघतात- ऐकतात.. पाऊस मला ऐकत बसतो... पाऊस मला माझा वाटतो.. तिच्या एवढाच ताजा वाटतो... हवं तिथं, हवं तेव्हा जातो... पाऊस मनाचा राजा वाटतो... Vishaal/Aadinaath 08-07-21 ©Vishal Chavan #पाऊस
Vrishali G
आता पाऊस येईल तेव्हा चेहेऱ्यावर थेंब झेलून आठवणींत आण माझ्या ओठांचा स्पर्श आता पाऊस येईल तेव्हा सोडून दे अनेक होड्या पाण्यात पोचेल एखादी माझ्यापर्यंत आता पाऊस येईल तेव्हा भिजून घे मनसोक्त आणि घे माझ्या मिठीची अनुभूती पाऊस...
Purva Deshmukh
ती चिंब ,तो चिंब दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब ओला थेंब ,ओली सर प्रीतीची रात, मिठितला बहर ढगाचे बन ,विजेचे तीर ओठांवर ओठ आणि श्वास ही अधीर मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा #पाऊस