Nojoto: Largest Storytelling Platform

New 9890 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 9890 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 9890.

    LatestPopularVideo

Shiva Mishra

#AareyForest प्रकृति बचाओ बृक्ष लगाओ। Aayush shastri ji ठंडा पानी...9890065545 anddy dubey Peeyush Dubey Ñîhâľ Tiwari

read more
किसी रोज़ छॉंव की तलाश में  काटते रहोगे बृक्ष लकड़ी और फर्नीचर की तलाश में।
एक रोज घूमोगे वावलो की तरह छांव की तलाश में।

छांव क्या सांस भी मयस्सर ना होगी।
डॉ, के पास पहुँचोगे ऑक्सीजन की तलाश में।

हम यों ही पेड़ काटते जाएगे।
प्रकृति को कैसे बचा पाएंगे।

यदि ऐसे ही काटते रहे पेड़ तो एक रोज ऐसा भी आएगा।
हम तड़प तड़प कर मर जाएंगे पानी ,छांव,और सांस 
की तलाश में।
प्रकृति को बचाओ।वृक्षो को लगाओ।
@@शिवा मिश्रा #AareyForest प्रकृति बचाओ बृक्ष लगाओ।  Aayush shastri ji ठंडा पानी...9890065545 anddy dubey Peeyush Dubey Ñîhâľ Tiwari

Santosh Jadhav

#पाऊस आठवणींचा... पाऊस आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा.. थेंब थेंब सांगून जातो.. भाव तो बेधुंद मनींचा.. अजूनही स्

read more
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्पर्श तरूण तो.. 
तुझ्या माझ्या मिलनाचा... 
दूरदेशी जागवतो.. तो.. 
ध्यास मनी साजणीचा..! 

आठवतो तो पाऊस पहिला.. 
सुगंधाचा दरवळ ओला...
तहानेल्या या भूईला... 
अमृताचा स्पर्श झाला...
कोंब कोंब अंकुरला तो...
ऋणी झाला तो धरणीचा..
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 

खट्याळ ते थंड वारे.. 
शहारले अंग ते सारे... 
तुला मला भिजवून गेले.. 
प्रेमाचे ते रंग सारे...
रिमझिम तो गीत गातो...
बहर सोबती रातराणीचा... 
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #पाऊस आठवणींचा...
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्

Santosh Jadhav

#dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

read more
गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...! 

मी तुला चोरून पाहतोय हे हेरून तू होते बावरी... 
तू हलकेच वळून पाहत घाव घालतेस काळजावरी..! 

मी हरलो कि हरवून गेलो कळेना मला सुंदरी... 
मी भरुन पावलो कि भरकटून गेलो तुझ्या आहारी..! 

वाऱ्यावर केसांची तुझ्या हलचाल ती होणारी... 
कि हृदयावर माझ्या ती बट चाल करून येणारी..! 

जीव गेला मात्र जीवंतपणाची जाणीव उरी... 
बेसावध सावज मी अन् तू सावध शिकारी...! 

ते गूढ हास्य पाहून तुझ्या ओठांवरी... 
वाहावत जाणारा मी पुन्हा येतो काठावरी...! 

ना भाव तुझा,ना ठाव तुझा कळला मला आज जरी 
फिरूनी पुन्हा येईन मी फिरतो आता भले माघारी..! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #dilbechara
#गूढ

गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

Santosh Jadhav

#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्

read more
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला
उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी
हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला 
स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी
लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा
तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी
खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी
कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! 

जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी 
आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी
तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट 
रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... !
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan
#आठवते का ताई तुला?
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्

Santosh Jadhav

#पाऊस.. तो अन् विरहिणी..! पाऊस..तो अन् विरहीणी...! गार झोंबणाऱ्या वाऱ्याचे इशारे.. धारा होऊन थेंबांचे पहारे... चिंब चिंब रात्रीचे रोमरोम

read more
पाऊस..तो अन् विरहीणी...! 

गार झोंबणाऱ्या वाऱ्याचे इशारे..
धारा होऊन थेंबांचे पहारे... 
चिंब चिंब रात्रीचे रोमरोम शहारे.. 
वचन तू होते मला दिले रे..ये ना प्रियतमा रे...!

आठवणींनी थेंब भिजलेले...
वाट पाहून भाव विझलेले..
रात जागून स्वप्न निजलेले..
त्या स्वप्नांना तुझ्या मिठीने..जागव ना..जिवलगा रे...!

त्या पहिल्या भेटीचा विसर पडला रे.. 
त्या प्रणयगीतांचा शब्द शब्द विरला रे... 
हा एकांत कसा नशिबी आला रे..
माझ्याविना दैना तिथे..अशीच का तुझी सख्या रे...! 

हा भास का होतो तुझा... 
हा ध्यास का मजला तुझा... 
हा श्वास का जपतो तुला... 
मन मोडू नको.. तोडू नको विश्वास प्राणप्रिया रे..! 

का रे अबोल तू...असा पावसा..
असा रूक्ष हा...तुझा स्पर्श कसा... 
तू ही पलटला...पलटला तो जसा...
दोघे मिळून कसा खेळलात..जीवघेणा हा डाव रे..! 

शेवटची माझी एक विनवणी... 
पुन्हा जगू दे ते क्षण फिरूनी... 
फक्त एकदा या दोघे जमूनी... 
व्हा एकरुप जा बरसूनी... माझ्या प्रिया रे...! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. (20.08.20) #पाऊस.. तो अन् विरहिणी..!
पाऊस..तो अन् विरहीणी...! 

गार झोंबणाऱ्या वाऱ्याचे इशारे..
धारा होऊन थेंबांचे पहारे... 
चिंब चिंब रात्रीचे रोमरोम

Santosh Jadhav

#ऐसा लगता हैं... ऐसा लगता हैं...! ऐसा लगता हैं.. वक्त ठहरसा गया हैं.. खुदसे मिले एक अरसा हो गया हैं.. घर दफ्तर सा और दफ्तर घरसा हो गया है

read more
ऐसा लगता हैं...! 

ऐसा लगता हैं.. 
वक्त ठहरसा गया हैं..
खुदसे मिले एक अरसा हो गया हैं..
घर दफ्तर सा और दफ्तर घरसा हो गया हैं... 
सूकून से ज्यादा जरूरी शायद पैसा हो गया हैं...! 

ऐसा लगता हैं...
गाँव का हाल शहरसा हो गया हैं.. 
गाँववाले शहरी दौड में और गाँव ठहरसा गया हैं.. 
बदले नजारें गलियोंके मोहल्ला खंडहरसा हो गया हैं... 
इक्कीसवीं सदी में गाँव और शहर अब एक जैसा हो गया हैं..! 

ऐसा लगता हैं...
अब जीवन स्वर्गसा हो गया हैं...
विज्ञान से जीवन हकीकत में सपनोंसा हो गया हैं...
पर जीवन में अपनोंका का पता कहीं खो गया हैं... 
अपनों से ज्यादा यंत्रोंसे ईन्सान करीब हो गया हैं..! 

ऐसा लगता हैं... 
दुनियाँ के करवट लेने का वक्त अब करीब आ गया हैं.. 
मानवनिर्मित सुखों का अंत अब समीप आ गया हैं... 
इस वसुंधरा से एकरुप जीवन का दौर करीब आ गया हैं..
ईन्सान के ईन्सानियत का लूटा हुआँ वो दौर समीप आ गया हैं..! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. (19.08.20.) #ऐसा लगता हैं...
ऐसा लगता हैं...! 

ऐसा लगता हैं.. 
वक्त ठहरसा गया हैं..
खुदसे मिले एक अरसा हो गया हैं..
घर दफ्तर सा और दफ्तर घरसा हो गया है

Santosh Jadhav

#शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर #अनुभव

read more
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर पडले जथ्थे
आयुष्याच्या व्यवहाराचे पण सुटले नाही गुथ्थे..! 
कारखान्यांसारखी शाळामहाविद्यालये झाली गल्लोगल्ली 
प्रवेश फी ची हजारों कोटींची उलाढाल होते हल्ली 
जमत नसेल तर या शाळेत प्रवेश घेतलात कशाला..? 
तुमच्यामुळे नुकसान झालं सोडून दिलं मोठ्ठया माशाला..! 
भ्रष्टाचार इथेच शिकतात लहानपणीच मुले
कसा आदर्श मानतील छत्रपती आंबेडकर फुले..? 
भांडवलदार,कारखानदार शिक्षणसम्राट झाले
पालक आणि विद्यार्थी इथे गिर्‍हाईक बनून राहीले..! 
शिक्षण उच्च झालं शिक्षणाची मात्र घसरली पातळी 
सहनशक्ती सुटली मुलांनी आत्महत्येला दिली टाळी.. 
वह्या पुस्तके फळा खडू यांबरोबर महत्त्वाची असे छडी
म्हणून मुलांची भविष्याची आयुष्याची नीट बसे घडी..! 
अपवाद असतील काही शिक्षक,संस्थाचालक,शाळा 
जागा झाला समाज तर नक्की बसेल याला आळा... 
पुन्हा गुरूशिष्य परंपरा गुरूकुल शिक्षणपद्धतीकडे वळा
सरकारने दिला पर्याय तर या बाजाराला लागेल टाळा...! 
तीच शिस्त तोच जिव्हाळा तोच आदर देव माझे गुरू
अभ्यासातून आनंद आनंदातून शाळांचे मंदीर करू...
आनंदी शिक्षक,विद्यार्थी, शाळा,शिक्षणपद्धती उभारू
विद्यार्थी शिक्षक पालक सारे भारताला विश्वगुरू करू..! 
:jsantosh (संतोष लक्ष्मण जाधव) 
:9890064001.. (24/06/2020) #शिक्षणाचा बाजार...!
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile