Find the Latest Status about वेळ नसतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळ नसतो.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Dk Patil
Dhanraj Gamare
cjcjffjfjfjfjfjpfjfjfkgkfgfkfkfk ©Dhanraj Gamare जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गझल काव्य संध्या व बुककट्टा टीम ( पिंपरी चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे कवी संमेलन २०२४
Supriya Yewale
ह् #Raat वेळ आपल्याला संधी देते तर त्या संधीचा आपण उपयोग करायचा असतो
Supriya Yewale
आजची खरी परिस्थिती लोक वेळेनुसार बदलतात आणि बरच काही शिकवून जातात वेळ हा खूप किमती असतो तर त्यामुळे कोणाला जर वेळ द्यायचा असेल विचार करून द्यावा वेळ हा आपल्या कामासाठी त्याचा उपयोग करून त्या कामातून आपली ओळख स्वतःची निर्माण करा कारण वेळ ही खूप किमती आहे वेळ गेलेली परत येणार नाही शेवटी हेच बरोबर आहे वेळ हाच पैसा ©Supriya Yewale #samay वेळ हाच पैसा💯🤞
Supriya Yewale
काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण वेळेचा उपयोग करून आपलं साम्राज्य उभा करणं हे तर आपल्या हातातच असतं एक एक मिनिट वेळ हा महत्त्वाचा असतो त्यामुळे आपल्या कामावर प्रेम करा स्वतःवर पण प्रेम करा जर तुम्ही स्वतःला ओळखलं तर तुम्ही जिंकलात आपल्या स्वतःचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे सुप्रिया येवले📑✍️😊💯🤞 ©Supriya Yewale #PhisaltaSamay वेळ हा खूप महत्वाचा
Dileep Bhope
गेली दूर निघून तेव्हाच कळते आनंदाचीही ती एक वेळ असते! ©Dileep Bhope #वेळ
Sangeeta Kalbhor
एक श्वास.. विषय नाहीच घोळवायचा मला पुन्हा पुन्हा तोच तो कायं करु पण सांग ना विचारात विचार येतोचं तो असं नाही की नाही करत प्रयत्न मी दूर ठेवण्याचा नकळत येतो आपसूक विचारात विचार तुझ्या असण्याचा लबाड नाहीत माझे शब्द जे उमटतात असेच काही बाही आठवताच तूला मग जीवाची होते लाही लाही अंतःर्मुख होऊ लागलेयं मी जंजाळ सगळा सुटत चाललाय एक श्वास तुझ्यासाठीचा आणिकच घट्ट उठत चाललायं..... मी माझी..... 06/10/2023 वेळ....11.37 am ©Sangeeta Kalbhor #kinaara एक श्वास.. विषय नाहीच घोळवायचा मला पुन्हा पुन्हा तोच तो कायं करु पण सांग ना विचारात विचार येतोचं तो असं नाही की नाही करत प्रयत्न म