Nojoto: Largest Storytelling Platform

New बेभान वारा पावसाच्या धारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बेभान वारा पावसाच्या धारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेभान वारा पावसाच्या धारा.

    PopularLatestVideo

Amita

ऋतू बेभान #मराठीकविता

read more
ऋतू बेभान....

सुख शांतीचे आवार, त्यात बरसला अंगार
न जाणे काय होते, त्याच्या मनीचे विचार..
  
एकाएकी नभी येती, कृष्णमेघांचे आरव
नको कोसळू तू फार, तुज हस्तांचे आर्जव..

पण पाऊस पाऊस, गेला धरेवर ऊतू
शिवारात , अंगणात, कोपला धुंद ऋतू..

धुंदीची बरसात, मस्तीचा गडगडाट
थेंबांच्या घुंगरांनी, वनी केला थयथयाट..

कुठे आभाळ फुटलं, घर डुंबले पाण्यात
येता-जाता दिसणारे, ओढे झाले मदमस्त..

कुठे डोंगर खचले, कुठे माथा कोसळला
असा कसा पावसा, सारा डावच मोडला..

आला आला महापूर, गेला पसारा वाहून..
काळया मातीतलं सोनं,  गेलं मातीत विरून..

नको होऊ तू बेभान, जरा घे ना विसावा
थोड्या थोड्या अंतराने, दे मायेचा ओलावा

लडिवाळ ये असा, घाल मनाला फुंकर
तुझ्या येण्याची मला, लागुदे हुरहूर..
लागुदे हुरहूर....

अमिता✍️

©Amita ऋतू बेभान

patu

पावसाच्या भावना

read more
तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते.
प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते,

पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पावसाच्या आठवणी

read more
ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर 

ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश 

त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब 

आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब 

तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब 

आणि ती पावसाची ओली सर, 

दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, 

तेव्हा मनात हेच वाटायचं की, 

हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. 

आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, 

ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, 

अनुभवलेले हे पावसाचे क्षण 

  आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी

kavita gawari

पावसाच्या सरी #romance

read more
mute video

अरविंद कुलकर्णी

mute video

Durga Deshmukh

आल्या पावसाच्या सरी #मराठीकविता

read more
आल्या पावसाच्या सरी
हिरवी झाली डोंगर दरी 
सडा टाकुन फुलांचा 
दोन्ही हातानी सुगंध भरी 

तुझ्या आठवणीचा पाऊस 
डोळ्यातुन वहात रहाते 
धडधड वाढती ह्दयाची 
व्याकुळ होऊन वाट पहाते 

तुझ्या हाताचा रे स्पर्श 
सरीचा कोसळला थेंब 
तुझ्या प्रेमान भिजुन 
ओल झाले अंग अंग 

पुन्हा येईल भेटायला 
इतकेच मला दे दान 
आपल्या प्रेमाचा पाऊस 
फुलविल बाग छान 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh आल्या पावसाच्या सरी

STREET WRITER

वारा.... #nojotophoto

read more
 वारा....

pooja d

या बेभान क्षणी सख्या,
घे सावरून मजला
अपघात होण्याआधी ।। #बेभान  #क्षणी #सावरुनघे #तीनओळी

HANAMANT YADAV (कवीराज)

उनाड वारा... #poem

read more
उनाड वारा...

तु अवखळ पाऊस,
 मी उनाड वारा...
तु खळखळ पाणी,
 मी शांत झरा....
तु हृद्यात घुटमळलेला श्वास,
माझ्या सबंध आयुष्याचा ध्यास,
मी उन्हात तापलेली जमीन,
तु पावसाच्या वर्षावानं 
मातीचा सुटलेला वास...
तुला तुझा पाऊस बरा,
मला वार्यातला पाऊस बरा...
तु अवखळ पाऊस,
मी उनाड वारा...

कवीराज
९०२१०३४९१७. उनाड वारा...

Dr Mangesh Kankonkar

सोसाट्याचा वारा #Music

read more
आला साेसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा, 
काेसळतात चिंब धारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
आसमंत भिजला त्यात सारा... 
लाेंबकळल्या विजेच्या तारा, 
आला साेसाट्याचा वारा, 
त्यात गारपिटीचा मारा, 
शेतीला झाला ताे सहारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
चढला होता उन्हाने ताे पारा, 
पर्जन्याने पाडला फवारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा...

©Mangesh Kankonkar सोसाट्याचा वारा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile