Find the Latest Status about झुळूक मी व्हावे मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुळूक मी व्हावे मराठी कविता.
Shruti Kurane
महाराष्ट्राचा 'म',राजर्षींचा 'रा' आणि छत्रपतींच्या जिरेटोपाची वेलांटी असणारा 'ठी' म्हणजे मराठी महाराष्ट्राचं अस्सल शंभर नंबरी सोनं म्हणजे मराठी इथल्या माणसाच्या मनामनात रुजते ती मराठी छत्रपती शिवरायांचा इतिहास अभिमानाने सांगते ती मराठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंजते ती मराठी तुळशीची माळ आणि अभंगाची टाळ म्हणजे मराठी कर्मवीर भाऊराव पाटलांची शिक्षणसंस्था म्हणजे मराठी वि. वा.शिरवाडकर यांची लेखणी म्हणजे मराठी राजर्षी शाहू महाराजांची कुस्ती म्हणजे मराठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची शान म्हणजे मराठी महाराणी ताराराणींच्या तळपत्या तलवारीची साक्ष म्हणजे मराठी सावित्रीज्योतींच्या ज्ञानाचा नंदादीप म्हणजे मराठी अहिल्यादेवी होळकरांचे कर्तृत्व म्हणजे मराठी वीरांचा इतिहास लिहिणाऱ्या या महाराष्ट्राची ही मराठी इथल्या मातीच्या कणाकणात माणसाच्या मनामनात अधिराज्य करते ती मराठी ©Shruti Kurane # मी मराठी 🚩🚩