Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रलयकारी पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रलयकारी पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रलयकारी पाऊस.

Mayuri Bhosale

#रिमझिम पाऊस

read more
White रिमझिम पाऊस....

ढग आले दाटूनी आकाशी 
सुरू झाली त्यांची इकडे तिकडे धावपळ

                रिमझिम धो धो बरसला पाऊस 
                मोत्यांच्या गारांनी भरली ओंजळ 

विजांच्या कडकडाटानी नभी 
चमकुनी मांडला खेळ 

                सांज अंबरी दाटली 
                प्रकाशाची लखलखीत वेळ

मनावर उमटली काहीसी 
अंधाराची छटा निराळी 

                 ओढ लागली घरट्याची 
                  साद घाली पक्षी त्या कातरवेळी 

गवताची सुरू झाली 
जमिनीवरती चुळबूळ 

                    मातीच्या त्या गंधाची
                    मनमोहक अलगशी दरवळ

टप टप पावसाचा आला
गालावरती एक ओघळ

                     सरसर निसटूनी गेला खाली
                     ओल्या आसवांबरोबर घरंगळ 

लोकांची केली या पावसाने 
नुसती घाईघाईची पळापळ

                      रस्त्यावरती वाहनांची जमा झाली 
                      एकमेकास रेटूनी भली मोठी वर्दळ

©Mayuri Bhosale #रिमझिम पाऊस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile