Find the Latest Status about माहेर शायर मराठी फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
राज श्री
कशी सांगू तूला गं आई जीवाची माझ्या घालमेल माहेरच्या आठवणीने जीव कासावीस होई किती दिवस झाले आई तुला पाहिले नाही बाबांसोबत मनसोक्त भरभरून बोलले नाही सासर माझं असल सोन्याचा पिंजरा जरी माहेरच्या आभळमायेत घ्यावीशी वाटते गंआई मला उंच भरारी मनातल्या सारे विचार इथेच ठेवून जावेत सासरी दोन दिवसापुरतं विसरून बाईपण व्हावी तुमची लाडकी सोनपरी खूप वाटतंय गं मला आई यावं चार दिवस माहेरी माहेरच्या आठवणीने डोळ्यांत दाटतयं पाणी माहेर
ज्ञानेश्वर मुसळे
तुझी कविता तर आता माझं माहेर झालंय, अनं माहेराचा बालपण तुझ्या कवितेतल्या भावनांमधी आलयं. माहेर
Swati Mahendra Jadhav
माहेरचे अंगण.. माझ्या माहेरची वाट चालता चालता.. मनी दाटला आठवणींचा उजाळा.. लहानपणीचा खेळ अंगणी मांडला तो डाव.. मनी दाटला मायेचा तो भाव.. माझ्या माहेराच्या अंगणी या ग! सख्यानो.. खेळ लपाछपी आणि पाठशिवणीचा मांडू या.. किती किती लहानपणीच्या आठवणी आठवू ग सये आता.. मनी दाटला अश्रूंनी गळा माहेराचं गुण गाता गाता.. माझ्या घराचे अंगण आणि शाळेचे ते पटांगण.. मनी दाटला अभिमान... ऊर भरला भरला.. माझ्या अंगणी पोहचता माय उभी ती दारी.. हाती तुकडा नी पाणी आनंदाने डोळे तिचे भरी.. घरी पाऊल टाकता टाकता तिची जेवणाची घाई.. सांग तुला काय वाडू भाजीभाकरी की दुधावरची सायी.. घर माझेच ते पण आता काही वेगळेच भासे.. सारे माझेच असे पण परतीची वाट मात्र दिसे.. गोड कौतुक आणि लाड करून घेता.. विसरून गेले मी चार दिवसाचा तो पाहूणचार होता.. रात्र सरता सरता उद्या दिवस निरोपाचा.. अंगणात उभा राहून बांध फुटला आठवणींचा.. काही राहिले तर नाही ना सारे न्याहाळून झाले.. माझ्या मायेच्या माणसांना डोळ्यात साठवून झाले.. जड अंतकरणाने बाहेर पाऊल निघाले.. आईचा निरोप काळजी घे सांगून झाले.. सारे अंगण पाहता पाणी पापण्यांच्या आत दडे.. पुन्हा येण्याच्या आशेने आठवणी मागे पडे.. माझ्या माहेरचा निरोप घेता घेता.. मनी दाटला पुन्हा आठवणींचा उजाळा.. ©Swati Mahendra Jadhav माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता #stay_home_stay_safe
Sarita Sawant
माहेर जस की स्वर्गच जणू मायेने कुरवळलेला हात तिथे आहे जीवापाड असणाऱ्या प्रेमाचा स्पर्श तिथे आहे लाडात पडलेला धपाटा तिथे आहे दुडू दुडू पडलेली पाऊले तिथे आहेत बाबासवे बोललेली बडबडगीते तिथे आहेत मी आणि माझचं करणारा हट्ट तिथे आहे तू मी तू मी करणारा भाऊ तिथे आहे कधी रूसणारी कधी हसणारी बहीण तिथे आहे सुखात दुःखात साथ देणारी मैत्रीण तिथे आहे तिथे आहे प्रेम,जिव्हाळा सख्यांच्या प्रीतीचा लळा तिथे आहेत कडू गोड आठवणी तिथे आहे साठवणीतली गाणी तिथे आहे अल्लडपण तिथे आहे उमगलेले शहाणपण तिथे आहे नाळेचं नात तिथे आहे अस्तित्व अजूनही माझं माहेर जस की स्वर्गच जणू सरिता सावंत #माहेर #लग्न #सुख #कविता
vaishali
*अष्टाक्षरी काव्य : माहेर * वर्ष सरोत कितीही ओढ ही सरत नाही सासरी गेल्या शिवाय माहेर कळत नाही असे प्रेमळ माहेर जिथे मायेची ममता सदा असे पाठीवर जिथे पित्याची सावली सदा असे शिरावर असे प्रेमळ माहेर पाठीराखा भाऊराया असे मायाळू बहीण अशा प्रेमळ नात्यांची होते नव्याने गुंफण असे प्रेमळ माहेर वाटे माहेरी जाऊन बालपण हे जगावे धूसर आठवणीत पुन्हा नव्याने रमावे असे प्रेमळ माहेर माझी हरवलेली मी मला तेथे सापडते म्हणूनच माहेर हे हवे हवेसे वाटते असे प्रेमळ माहेर #अष्टाक्षरी काव्य # # माहेर #
Ajay Prakash
मैं केवल अपनी फिलिंग को छिपाने में माहेर हुं Ajpatir मैं माहेर हूँ