Nojoto: Largest Storytelling Platform

New आठोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठोळी.

Related Stories

    PopularLatestVideo

Gouri Shitole

माझे बाबा तुमच्यासारखं
ना कुणिच या जगात,
मन तुमचं लोण्यासारखं
वितळून जाई क्षणात.

मला वाटत राही सारखं
नशिबवान मी किती झाले,
दैवतासारखं माझे बाबा
मलाच हे लाभले.

©Gouri Shitole आठोळी

#BookLife

vaishali

अग्निपरीक्षा# अष्टाक्षरी आठोळी #

read more
अग्निपरीक्षा 

पतिव्रता नारी सीता
दिली ही अग्निपरीक्षा
चूक नसताना सुद्धा
भोगायची स्त्री ने शिक्षा

केला त्याग हा रामाने
तरी मनी त्याचा ध्यास
चौदा वर्षांनंतरही
सुरू तिचा वनवास #अग्निपरीक्षा# अष्टाक्षरी आठोळी #

vaishali

आठोळी लेखन

read more
🌹आई🌹

नऊ महिने गर्भात ठेवुनी
श्वास मला तू दिलास
माझ्या साठी आई तू
जन्म पुन्हा घेतलास

तू अथांग सागर मायेचा
दिला जीवना माझ्या आकार
तुझ्या सारखा नाही कोणी
जगात दुसरा शिल्पकार आठोळी लेखन

vaishali

निसर्ग देखावा # आठोळी

read more
🍀 निसर्ग देखावा 🍀

 पाहुनि निसर्ग देखावा
 आनंदित झाले मन 
 वसुंधरेने घातला जणू
 शालू हिरवागार छान

 हरित तृणांचे पसरले
 हिरवे हिरवे गालिचे जसे
 रिमझिम पावसात भिजण्याची
 मज्जा मात्र वेगळीच असे   निसर्ग देखावा # आठोळी

vaishali

आठोळी # पहिली भेट #

read more
 🌹 पहिली भेट 🌹

पहिली भेट तुझी माझी
आज ही मी आठवतो
दूर आज असलो जरी
काळजात तुला जपतो

आठवताच तो क्षण 
डोळ्यात पाणी दाटते 
हळूच पुसते मन मला 
सांग ती पुन्हा कधी भेटते आठोळी # पहिली भेट #

vaishali

#cinemagraph आठोळी काव्यलेखन #मराठीलेखणी

read more
♥️ पोखरलेले काळीज ♥️

काळजातील सल
कुठे कोणा दिसते
जग दुनिया फक्त
चेहऱ्यावरचे हसू बघते

पोखरलेले काळीज
रक्तबंबाळ होते
खपली काढून जखमेची
जग त्यावर मीठ चोळते  #cinemagraph आठोळी काव्यलेखन #मराठीलेखणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile