Nojoto: Largest Storytelling Platform

Best maharashtra_king Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best maharashtra_king Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

milind sarkate

राजे या राज्यघटनेची प्रेरणा 
तुमच स्वराज्य आहे
या मातीच्या कणा- कणाला 
तुमच्या चरणांचा स्पर्श आहे 

पवित्र शिवनेरीला आपल्या 
आगमनाचा नवा हर्ष आहे
तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण 
या जगण्याचा उत्कर्ष आहे

माँसाहेबांची शिकवन 
संस्काराची शिदोरी आहे 
मावळ्यांचा त्याग इथल्या
बंधुत्वाचा आदर्श आहे

हिरवळीने नटलेला सह्याद्रि 
स्वराज्याचा अंलकार आहे
जिंकलेल्या गड-किल्ल्यांना
आज शौर्याचा सुगंध आहे

राज्याभिषेकाचा सोहळा 
स्वराज्याचा उत्सव आहे
शून्यातून निर्माण केलेले 
स्वराज्य आजही अखंड आहे

मराठ्यांच साम्राज्य अठरापगड 
जातीय समतेचा इतिहास आहे 
गौरवशाली मायबोलीत जन्मलो
या जन्माचा अभिमान आहे..

!!! जय जिजाऊ - जय शिवराय !!!


- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #king_of_hearts #chhatrapati_shivaji_maharaj
#maharashtra_king


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile