Find the Best प्रीत_आपली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
उमा जोशी
आयुष्याच्या संध्यासमयी वर्षे मधली गळून पडली याद प्रियेची आता मजला हलके हलके छळू लागली कोण चूक अन् कोण बरोबर नकोच याची चर्चा आता सहजच नकळत ये परतूनी माझ्यापाशी जाता जाता आता कसला राग धरावा उरले बाकी काही नाही हाती मिळता हात तुझा तो बोलायाचे काहीबाही सरले माझे मीपण अवघे कळले सारे दोष मनाला अधीर हे मन आता झाले क्षमा तुझी गं मागायाला भेटशील ना एकच वेळा थोडेसे क्षण माझे उरले गोड बोल तव कानी पडता रुसवे सारे ते विरघळले जातो आता सुखानेच मी आस न काही मागे उरली डोळे सारे तुझे सांगती उरली मागे प्रीत आपली --- उमा जोशी ०६/०२/२०२१ ©उमाच्या मनातलं #प्रीत_आपली #गोदातीर्थ #पादाकुलक #moonlight
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto