Nojoto: Largest Storytelling Platform

Best आव्हान Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आव्हान Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआव्हान का अर्थ, आव्हान कवितासंग्रह, निसर्गाला आव्हान,

  • 1 Followers
  • 1 Stories

Mayuri Bhosale

White आयुष्याला दिले आव्हान...
संकटांनी कितीही छळले तरीही 
घट्ट पकडलेली मातीतील माझी पावले मागे हटणार नाही 
आयुष्यात येथील अनेक प्रसंग 
उरी सळसळलेली लढण्याची उमेद परत फिरणार नाही 
शरीरावरती पडू देत कितीही घाव 
जीवनाची नाव किनारीकाठी पोहोचवायची थांबणार नाही
वाटेत आले आडवे काटे कुठे जरी 
जखमी पावलांना वाकून खाली बघणार नाही 
निवडलेला मार्ग असू देत कितीही वळणावळणाचा 
एकदा धरलेला प्रयत्नांचा रस्ता पुन्हा सोडणार नाही 
वादळं  तुफान कसलेही समुद्री उसळू देत
हाताश होवूनी कधी बसणार नाही
वेदना होतील असंख्य मनावर अश्रू मुळीच गाळणार नाही 
या प्रसंगांनो या उभा मी इथे आहे 
कधीच तुम्हाला घाबरत नाही 
आव्हान हे माझे आयुष्याला 
धाडसाची तलवार जवळ बाळगीन 
रणांगणाची युद्धभूमी पार केल्याशिवाय मागे येणार नाही

©Mayuri Bhosale #आव्हान

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile