Nojoto: Largest Storytelling Platform

Best आणि Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आणि Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआणि meaning in english, टोपीवाला आणि माकडे in english, आणिक meaning in marathi, वाढती लोकसंख्या आज आणि उद्या, मुंगी आणि ना थोड़ा,

  • 201 Followers
  • 953 Stories

Pallavi Phadnis

read more
कधी हात सुटून 
गेले कळलेच नाही,चालता 
चालता सावरत होतास उगाच
कधी माझे भार उचलत होतास,
माझ्या आयुष्यात तुझाच पहिला 
आणि  शाश्वत स्पर्श एक प्रेमळ 
धाक आणि त्याच हातांची प्रेमाची 
भरली ओंजळ, ती ओंजळ कधी 
रिकामी झालीच नाही,जादूगाराने 
आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात 
तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि
स्वतःचे मन मारून ,आमचे मन
भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा 
यायचास तेंव्हा किती घर भरून
जायचे,तू जाताना मात्र मी वाहून
जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा
किती आनंद झाला होता,पण
नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा
समवेत घेऊन आला होतास
तू जवळ असूनही ,दूर जाण्याची
मनात एक कायम भीती 
आता डोळ्यांच्या पाण्यात 
धुरकटलेली विझणारी
 दिसत होती नाती
तू माझा बाबा म्हणून आलास 
आणि स्वतः मात्र देव होवून गेलास
तू जाताना किती गळा दाटला होता
आता तुझा नी माझा ऋणानुबंध 
अलगद निसटला होता ,
तुझा शेवटचा हात माझ्या गालावर
फिरला आणि तुला पाहतानाच 
मी हुंदका गिळला,आता तू फिरून 
येऊ नकोस ,सवय झालीय मला 
आता विनाधार जगण्याची
फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू
तुझ्या हातांचा आधार दे,जे काही 
कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात
साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे
आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय

               पल्लवी फडणीस,भोर✍

Pallavi Phadnis

read more
*मन*
मन आज मोरपीस झालय
अलगद वाऱ्यावर ,तरंगणारे
हलके होवून भुरुभुरु उडणारे
किती रंग ,आणि कडेने चंदेरी
सोनेरी तरंग,हळूच अक्षांचे फुलपक्षी
होतायेत,कधी या फुलावर त्या 
फुलावर बागडतायेत किती मोहक
स्पर्श होतायेत या नजरेला ,दवबिंदूंचे
मोती ही पर्णपाचूवर बसून अलगद 
घसरतायेत ,त्यांना धरू पाहता 
लाजून विरघळतायेत,ते लाडिक मोती
कधी हातातच येत नाहीत,मात्र स्पर्श्
मात्र शितल होतायेत ,हळूच एक फुल
घेऊन मधुरस प्यावासा वाटतो,आणि 
अलगद नेता अधराजवळ ,त्यात अगोदरच 
मधुमाशीचा मुक्काम असतो
मधूनच एखादा कोळी जाळे फेकतो
आणि मग त्यातच मधुचोर गुंततो
किती ह्या जल्पना सत्यात उतरत असतात
आणि मनाचे वारू उगाचच उधळतात
त्या वादळात हि असतात अनेक 
वादळेआणि उगाच झुलणारे 
निशब्दततेचे हिंदोळे,
त्या हिंदोळ्यावर बसून सर्व 
सुर्ष्टीचे सोहळे डोळ्यात घ्यायचे साठवून
आपण व्ह्यायचे फिजा आणि जायचे
गगनात मुक्त होवून
                  पल्लवी फडणीस,भोर✍

Mohan Thepale

read more
चांदण्या तुझा हातात आणि अडकला चंद्र काट्यात
प्राजक्त फुलांचे ताटवे ओले आणि कळी गुलाबाची लाजली होती
हळुवार कानात आपले गुज सांगुन मनात लाजली होती
मी स्तब्ध तसाच उभा शहारून गेलो
मिलनाची तयारी मी मनातच करु लागलो

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

Vrishali G

..

read more
माझ्या कवेत येतेस ना तु 
तेंव्हा भान हरपून जाते माझे 
आणि डोळ्यात बघताना माझ्या 
ओठात ओठ गुंतून जातात तुझे 
कीती तरी वेळ मिठी आपली घट्ट राहते 
स्थळ काळाचे गणित इथं मात्र बदलून जाते
हे नाजुक क्षण मग मी मनात 
ठेवतो जपून 
आणि निरोप घेतो तुझा 
परत ओठात ओठ घेऊन 
 ❤ ..

अश्लेष माडे (प्रीत कवी )

भयाण शांतता

read more
आमचं तासंतास बोलणं ही कधी-कधी निष्फळ ठरतं. जेव्हा मनातलं मनातच राहून जातं. तिचं आणि माझही. 
तिने मनातलं ओळखावं, भावना समजावं, अबोल न राहता व्यक्त व्हावं. असं काहीतरी मनात असतं माझ्या, पण तेव्हा बोलणं संपून जातं, आणि मनातलं मनातच राहून जातं.. पण त्या गप्पांना अर्थ नसतोच मुळी. जिथे भावना ओळखता येत नाही.. त्या बोलण्यात एक भयाण शांतता असल्यासारखं वाटतेय. भयाण शांतता

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                                                           मित्रांनो, आपण इंद्रियाद्वारे जे जे शुध्द या अशुध्द स्वरूपात                                                                                                          ग्रहण करतो, ते आपल्या अंतरमनात आत्मसात होते. त्यात                                                                                                          जे शाश्वत आहे ते शाश्वत म्हणून आणि जे मिथ्य आहे ते मिथ्य                                                                                                         म्हणूनच जाणवत. जेव्हा आपली दृष्टी स्वच्छ/ शुध्द नसते ,                                                                                                          तेव्हा जे अशाश्वत / मिथ्या आहे तेच शाश्वत वाटते  आणि                                                                                                           दृष्टी स्वच्छ झाली तर प्रत्येक गोष्टीचे खरे मुल्य उमगू लागते.                                                                                                         तेव्हा जगण्यातल जे जे अशाश्वतहोत ते ते ओसरू लागत                                                                                                                                        ‌आणि निसर्गरूपी शाश्वताकडे आपल्या मनाची ओढ वाढून                                                                                                         आपल्यात परमपूर्ण, अतुलनीय शांती उपजते. अॅड. सूर्यवंशी

Pallavi Phadnis

read more
*त्या आभाळाला निरोप*
त्या आभाळाला द्या माझे निरोप
त्याच्यावर आज खूप झालेयत आरोप
किती वाट पाहायची त्याने भरून यायची
वाट पाहायची घराच्या दारात ,
आत्ता येईल आणि गर्द 
ओल्या मिठीत घेईल
मी आपले सावरुन बसायचे आणि
ह्याने मात्र मयसभाच उभी करायची
मग जरा बागेत जावून ,फुलांवर मोती
साठलेत का पाहायचे ,आणि 
ह्याने मात्र आत्ता येतो सांगून 
गरगर फिरायचे
ह्याला फक्त एक निमित्त असते,यायचे
म्हणून गडगडाट करतो,आधी पाठवतो
वाऱ्याला आणि त्याच्याशीच भांडतो
ह्यात मात्र हे लबाड आभाळ हळूच 
घर सोडते आणि हळूच पुढे निघून जाते
ह्याला कुठे माहितेय ,हे आभाळ दिसले
की सगळ्या सृष्टीला येते भरून ,तो 
चातक बसतो शाखेवर,आणि 
मयूर फिरतो रानभर,
छोट्या छोट्या पाखरांची घरट्यात परतण्याची घाई ,
पदर सावरुन बसलेलीअसते वनराई ,
सगळ्यांच्या डोळ्यांची होतात निरांजने,
ह्याचे मात्र आगंतुक येणे
ह्याच्या खेळात सगळेच सामवतात,
आमच्यासारखे ही लेखणी घेऊन 
कल्पनेत रमतात, किती त्याचे
लडिवाळ चालतात चाळे ,सगळीकडे
सृष्टीच्या डोहाळपणाचे सोहळे
आता ह्या आभाळाला आणखी
एक प्रेमळ निरोप ,
येशील तेंव्हा सुख घेऊन ये 
नाहीतर तुझ्यावर होतील 
सावत्रपणाचे आरोप 
तुझे नी धरतीचे नाते अनोखे
आम्ही का ठेवावे तुझे लेखेजोखे
तू कधी हि ये पण येताना अनुरागी 
आनंद घेऊन ये ,तुझ्या भरल्या
कृष्णशितल ,शाश्वत मिठीत मला 
अलगद गोजांरुन सामावून घे
                   पल्लवी फडणीस,भोर✍

Pallavi Phadnis

read more
होणा ,ती अजून बाकीच आहे
सगळे वाहिले ,उघड्या डोळ्यांनी
पाहिले, जे राहिले ते वेचले आणि
ह्यतूनच आता पुन्हा सगळे उभे
करायचे ही वेडी आशा
जे माझे नव्हते ते,मी माझे
म्हणत गेले आणि नकळत
स्वतःशीच परकी होत गेले
आता सरली उषा ,आता फक्त
सरतीय अंतिम, बाकी निशा
क्षण विरले,मन भिजले,आता
नी आता ना ह्याची ना त्याची
ना माझी, ना त्याची आता फक्त
अनोळखी ,अशी बाकी उरले

           पल्लवी फडणीस,भोर✍

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
रस्त्यावर दगड पडलेला दिसला की, लोकं त्याला लाथ मारतात, बाजूला करतात. 
पण, तोच दगड एखाद्या मूर्तिकाराने उचलून नेलं आणि त्याला आकार देऊन घडवलं तर त्याचा देव तयार होतो. 
आणि त्याच दगडापुढे लोकं नंतर झुकतात. हाथ जोडतात. अगदी माणसाचही तसंच असतं. 
जोपर्यंत तो घडत नाही लोकं त्याला पडलेला दगड समजतात आणि लाथ मारतात  आणि घडला की, पाय पडायला येतात. मागेमागे येतात.. प्रीत प्रीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile