Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोदातीर्थ_समूह Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोदातीर्थ_समूह Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

वृत्त :- मंदारमाला सोडून गेल्या मला पायवाटा कसा शोध घेऊ नकाशामधे माझ्याच वाटेत का गाव नाही कुठे वाट नाही विसाव्यामधे वारा जरी थंड वाटे तनाला तरी शांत नाही विचारामधे रस्ता कसा आंधळा आज झाला सुखी जीवनाच्या निवा-यामधे आहे जरा वेंधळी वाट वाटे मला माणसांची मिळावी घरे #मराठीकविता #गोदातीर्थ_समूह

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

#गोदातीर्थ_समूह 

वृत्त :- पादाकुलक
८ ८

जीर्ण गढीच्या वाड्यामधली 
नक्षत्रांची खिडकी दिसता,
युगायुगांची नाती स्मरली
रखरखणाऱ्या उन्हास बघता..

सोनपावले उजळुन येवो
उंबरठा तो मनात चिंती, 
स्वागतास ही प्रवेशद्वारी
भक्कम होत्या दगडी भिंती..

वाड्यावरची रिक्त ओसरी
बंध मनाचे जुळवत होती,
लग्नकार्य अन् सणवाराला
वऱ्हाड घाई मिरवत होती

घासामधुनी श्वास अडकता
कित्येक नाती गाठत होती,
अंतरातली प्रेम काळजी
ओठी माया साठत होती..

मंथनातला डोह उसळता
मनपटलावर उठल्या लाटा,
उजळत होत्या देवघराला
दहादिशांनी प्रकाशवाटा..

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale #City


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile