Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊस_आणि_आठवण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊस_आणि_आठवण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

सये सर पावसाची आली अवचित आज
मृदूगंध शहारतो नव्या नवतीचा बाज

थेंब टपोरी, बिलोरी घर ,आंगण भिजले
नक्षी माळता मोत्यांचे देह तरुंचे सजले

शीरशीर अलवार काटा फुटतो कोवळा
बीजं रुजता मातीत सुखं स्वप्नांचा सोहळा

देह, गात्रांत साठवं ओल  मनांच्या तळाशी
श्वास श्वासांत भारता लाट पारखी जळाशी

मोर पिसारा फुलता डोळे भरले नभाचे
शुभ्र कोंदण लाभले दान पावले मनाचे

घेई भरून ओंजळ खोल भिजू दे पाऊस
पाठशिवणीचा खेळ नको परत जाऊस

©Shankar Kamble #zindagikerang #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #सर #धारा #पाऊस_आणि_आठवण #पाऊसआला #पाऊस_आणि_प्रेम

Kunal Salve

हा पाऊस हा वारा 
आज बेभान होऊन गेले 
जुन्या आठवणीत जाऊन मग
हृदय भान हरपून बसले  #पाऊस_आणि_आठवण

pooja d

घात पावसाने केला,अन
आळ मज बिचारीवर घेतला ।
मी तर उभा होती छत्री घेऊन
तोच होता चिंब भिजलेला ।। #पाऊस_आणि_आठवण  #प्रेम #छत्री #मराठीचारोळी

yogesh atmaram ambawale

पाऊस

येतो डोळ्यातून अश्रूंचा पाऊस जेव्हा जेव्हा,
माझ्या मनात तुझ्या आठवणींचे ढग जमा झालेले असतात तेव्हा तेव्हा. #तुझीआठवण #पाऊस_आणि_आठवण #yqmarathi #yqdidi #आठवणीततुझ्या #collabwithme


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile