Find the Best कोरोनाजाना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं। जिकड तिकडं सुरु आहे,तुया गवगवा जो थो सांगे लका,फक्त तुयच गऱ्हाणं। किती दिऊ लेका,तुले शिव्या नी शाप तरी ना सुधरल, तुय हे वंगाळ वागणं। जातं का नाही,की घेऊ हातात खेटरं की लावू थोबाडाले,कायं कायं वंगण। आल्यापासन तून,पार सत्यानास केला असह्य झालं हलकटा,आम्हच हे जगणं। शेवटचं सांगतो,गड्या हातपाय जोडून तू जावा परत,आता हेच देवाले मागणं । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।
pooja d
कोरोना जा ना बाबा आता तरी काय भेटतंय तुला बसून आमच्या उरी ।। तुझ्यामुळे खायचे झालेत वांधे सुटलेत आमचे हातचे कामधंदे ।। शाळा झाली आमची ऑनलाईन सरकार म्हणते, पगार ही तुमचा अर्धा होईन ।। असा कसा तू, गेलेला परत आलास सोबत एकटा नव्हे तर भावकीला ही घेऊन आलास ।। बस झालं आता, राहू दे आम्हाला सुखाने नेहमी हात धूत राहीन सॅनिटायझर ने ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
जा ना कोरोना जा ना.. तुझा पाहुणचार काही कमी होईना. पाहूणा म्हणून आलास 9/10 महिन्याचा मुक्काम केलास. जाण्यापूर्वी कित्येक जीव नाहक खाऊन गेलास. वाटलं होतं आता काही तू परतणार नाहीस, पण तू तर कुत्र्याप्रमाणे निघालास अर्ध्या वाटेतून पुन्हा परत आलास. भूख काही तुझी भागली नव्हती, परतुनी जाण्याची ही तुझी इच्छा नव्हती. पण धुत्कार आणि हाडतुड केल्यामुळे तू परतीला निघालास, जरा आम्ही दुर्लक्ष काय केलं,तू परत माघारी आलास. जा रे बाबा जा एकदाचा कशाला नाहक छळतो आम्हाला, तू जावे निघूनी पुन्हा कधीच न येणे,हीच इच्छा प्रत्येक मनाला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto